ब्युटी पार्लरमध्ये घुसून तिच्या गालावर हात फिरविला, लवशीप कर म्हणत केले अश्लिल चाळे, सागर वाकचौरेसह तिघांवर गुन्हे दाखल.!
कळस कृषी प्रदर्शन भरविणारा युवा उद्योजक सागर वाकचौरे आणि त्याचा मित्र गोकुळ वाघ यांनी संगमनेर येथे सुरू केलेल्या हँशटँक वनकट युनी सिक्स सलोनमध्ये एका ब्युटीशीयनचे काम करणार्या महिलेची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेथेच काम करणारा अविनाश उगले हा तरुण दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास लेडीज फेशियल रुममध्ये घुसला आणि पीडित ब्युटीशीयन महिलेच्या गालावरुन हळुवार हात फिरवून म्हणाला. की, माझ्याशी लवशिप ठेवशील का? त्यानंतर ब्युटीपार्लरमध्ये एकच खळबळ माजली. मात्र, हे प्रकरण तेव्हा दडपण्यात आले होते. त्यानंतर दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हे तिघे पीडितेच्या घरी गेले आणि तिथे वाद घालुन पुन्हा लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर पीडितेने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीवर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, अकोले तालुक्यातील कळस येथे राहणारे सागर वाकचौरे आणि गोकुळ वाघ या दोघांनी हँशटँक वनकट युनी सिक्स सलोन काढले होते. तेथे मंगळापूर येथील एक महिलेसह अन्य दोन महिला ब्युटीशीयन व अविनाश उगले आणि ज्ञानेश्वर वाघ यांना कामासाठी नियुक्त केले होते. डिसेंबर २०२३ पासून सुरू झालेला हा व्यवसाय व्यवस्थित सुरू होता. मात्र, यांच्यात व्यवहाराहून कायम कचकच चालु होती. एकीकडे व्यवसाय आणि दुसरीकडून तेथे काम करणारे कामगारच तेथील ब्युटीशीयन महिलांवर वाईट नजर टाकत होते. त्यामुळे, नव्याने सुरू झालेल्या व्यवसायावर त्यांचीच वक्रदृष्टी पडल्याने पहिल्याच महिन्यात वाद निर्माण झाला होता.
दरम्यान, दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तेथे काम करणारा अविनाश उगले हा लेडीज फेशियल रुममध्ये घुसला आणि पीडित महिलेच्या उजव्या गालावरुन हळुवार हात फिरवत म्हणाला. की, माझ्याशी लवशिप ठेवशील का? त्यानंतर पीडित महिलेने त्याच्याशी वाद घातला आणि उगलेचा समाचार घेऊन ती घरी गेली. दुसर्या दिवशी तिने घडलेला प्रकार मालक सागर वाकचौरे यास कथन केला. तेव्हा वाकचौरे म्हणाला. की, उद्या मी त्या अविनाश उगले यास समज देऊन कामाहून काढून टाकतो. मात्र, झाले ते उलटेच. वाकचौरे याने दि. ८ जानेवारी २०२४ रोजी पीडित महिलेस कामाहून काढून टाकले, तेव्हापासून ती घरीच होती.
दरम्यान, या ब्युटीपार्लरमध्ये कामाला असताना जितके दिवस काम केले त्याचे पैसे देण्याचे यांच्यात ठरले होते. त्यामुळे, पीडित महिलेने सागर वाकचौरे यास फोन केला आणि कामाचा मोबदला मागितला. मात्र, तुझे कोणतेही पैसे नाही, कामाहून काढून टाकले आहे त्यामुळे पैसा मिळणार नाही असे म्हणत पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास सागर वाकचौरे, गोकुळ वाघ आणि अविनाश उगले हे पीडित महिलेच्या घरी गेले. तेव्हा सागर वाकचौरेे म्हणला की, तुझे कोणते कामाचे पैसे आमच्याकडे राहिले आहे? तुझे कोणतेही पैसे आमच्याकडे राहिले नाही असे म्हणत त्याने महिलेेस अश्लिल शिविगाळ केली.
दरम्यान, यांच्यातील वाद मिटण्यापेक्षा तो अधिक वाढत गेला. पीडित महिलेच्या घरी जाऊन या तिघांनी राडा घातला. तिच्या कुटुंबियांना देखील शिविगाळ, दमदाटी करीत धक्काबुक्की केली. विनयभंग होऊन देखील शांत राहिलेली महिला, त्यानंतर कामाचा मोबदला देखील दिला नाही वरुन घरात घुसून कुटुंबियांना शिविगाळ दमदाटी केली. त्यामुळे, पीडित महिलेने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यापुढे घडलेला प्रकार सांगितला. काही व्यक्तींनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कायद्यापुढे कोणी मोठा नाही असे सुचवत सागर वाकचौरे, गोकुळ वाघ आणि अविनाश उगले या तिघांवर गंभिर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.