अकोले-राजूर येथे भिषण अपघात, तीन तरुण ठार, गांजा आणि दारु घटनास्थळी, तालुक्यावर शोककळा.!

 

सार्वभौम (राजूर) :- 

                 अकोले तालुक्यातील मवेशी येथील तीन तरुण राजूर जवळील अपघातात मयत झाले. हा अपघात दुचाकी आणि साई गॅस ऐजन्सी या चारचाकी गाडी यांच्यात आज दि. 8 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झाला. यात प्रथमेश नामदेव किर्वे, प्रविण रामा भांगरे व विलास रामा कवठे (तिघे रा. मवेशी, ता. अकोले, जि. अ. नगर) अशी तिघांची नावे आहेत. या घटनेने तालुका हळहळून गेला असून तिघे अगदी तरुण मुले आहेत. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने या मुलांना दवाखाण्यात दाखल केले. तेव्हा घटनास्थळी दारुच्या बाटल्या आणि गांज्याच्या पुड्या देखील मिळून आल्याचे प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले. त्यामुळे, हा अपघात कशामळे झाला याचा तर्क वितर्क लावला जात आहे. मात्र, राजूर व अकोले हाद्दीत दारु आणि गांजा यांची बेसुमार विक्री होत असून त्यामुळे अनेक तरुणांना जीव गमवावा लागतो आहे. अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

           आज सकाळी मवेशी येथील तीन तरुण अकोल्याकडे आले होते. त्यांचे काम अटोपल्यानंतर ते राजुरच्या दिशेने निघाले होते. जाताना त्यातील काहींनी एका ठिकाणी मद्य प्राशन केले.  त्यानंतर मोटार सायकल नंबर एम. एच 17 सी.यू 9481 यावर ते भरधाव वेगात राजुरकडे निघाले होते. राजुर स्मशानभुमीच्या मागे असताना राजुरकडून एम.एच 17 बी.डी 5358 ही साई अर्पन गॅस (कळस) ही गाडी देखील भरधाव वेगात येत होती. दोघे आमने सामने आले आणि अगदी समोरा समोर धडक झाली. त्यामुळे, दुचाकीवरुन घराकडे जाणारे तिघे रस्त्यावर पडले. त्यातील एक जाग्यावर  गेला तर दुसरा बेशुद्ध होता. तिसरा देखील अत्यावस्थेत होता. त्यामुळे, त्यांना काही प्रवाशी आणि वाटसरु यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाचा अक्षरश: मेंदु बाहेर आला होता. तर, जे दोघे कुपाटात पडले होते त्यांना बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहीकेला फोन केला काही वेळाने रुग्णवाहीकेत तिघांना टाकून रुणालयात आणले होते. मात्र, तोवर फार उशिर झाला होता.

               दरम्यान, अकोले तालुक्यात बेकायदा दारु आणि गांजा यामुळे तरुणांचा मृत्यू होत असेल. तर, अवैध धंदे आणि वाहतूक नियमन यांचा फज्जा उडाला आहे. पुर्वी अकोल्यात विजय करे, मिथुन घुगे आणि राजूरमध्ये नितीन पाटील, राहुल पाटील, पप्पू कादरी यांसारखे अधिकारी होेते. तेव्हा वाहतूक सुरळीत करण्यासाठी ते रस्त्यावर उतरत होते. अवैध धंद्यावर त्यांचा बऱ्यापैकी वचक होता. आता मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे, अपघात, मारामाऱ्या आणि वाहतुकीचा फज्जा उडालेला दिसतो आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.