संगमनेरमध्ये पुन्हा जळीतकांड, अर्धनग्न अवस्थेत मृतदेह, अनैतिक संबंधातून घडला असावा प्रकार.! चेहऱ्याचा जाळून कोळसा केला.!
सार्वभौम(संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरामध्ये पुणे नाशिक महामार्गावरील पुलाखालील म्हानोटीच्या ओढ्यात अंदाजे 55 ते 60 वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला आहे. या व्यक्तीचे गुप्तांग जाळले असुन चेहरा संपूर्ण जळालेला आहे. या व्यक्तीची ओळख पटु नये म्हणुन त्याच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकुन मारले आहे. ही घटना काही दिवसांपूर्वीची केली असावी. मात्र, एका व्यक्तीने हा मृतदेह पाहिल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर ओढ्यांच्या पाण्याचा प्रवाह अडवू नये म्हणुन अनेक छोटे-छोटे पुल आहेत. गुंजाळवाडी परिसरात देखील म्हानोटी ओढ्यावर छोटा पुल आहे. त्याच्या जवळ एक हॉटेल देखील आहे. मात्र, म्हानोटी ओढ्यावरील पुलाखाली अंदाजे 55 ते 60 वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असुन चेहरा पूर्ण जळुन खाक झाला आहे. डोक्याची फक्त कवटी दिसत असुन गुप्तांग देखील एखाद्या ज्वलनशील द्रवाणे जाळल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. ही माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी थेट घटनास्थळ गाठले. ज्या पद्धतीने सांगण्यात आले होते.ती वस्तुस्थिती होती. त्यामुळे, हा काही अकस्मात मृत्यू नसुन कोणीतरी पूर्वनियोजित केलेली हत्या आहे. त्यामुळे, पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरवात केली आहे.
दरम्यान, या गुन्ह्याची उकल होण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे या व्यक्तीची ओळख पटणे गरजेचे होते. त्यामुळे, पोलिसांनी पंचनामा आणि पीएम करण्याची प्रक्रिया पार पाडली. जो काही प्रकार घडला तो अत्यंत भयानक आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे. एखाद्या व्यक्तीची आशा पद्धतीने कृरतेने हत्या करणे म्हणजे नक्कीच या घटनेला भावनिक वळण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे, कोणाच्या घरातील, शेजारी, परप्रांतीय 55 ते 60 वयोगटातील व्यक्ती मिसिंग असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन माहिती द्यावी. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तुम्ही या व्यक्तीला ओळखता का?
या व्यक्तीच्या अंगावर फक्त हाफ काळी पॅन्ट आहे. गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. उजव्या हातामध्ये मनी असलेला धागा बांधलेला आहे. या व्यक्तीचे वय 55 ते 60 वयोगटातील आहे. बांधा सडपातळ दिसत आहे. उंची साधारण 165 सेंटीमीटर आहे. तर ही व्यक्ती संगमनेर तालुक्यातील किंवा जवळील तालुक्यातील असण्याची शक्यता आहे. जर या व्यक्तीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी कोणत्याही पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.