संगमनेरात वेश्या व्यावसायावर छापा, अकोले व संगमनेराचे तरुण वेश्यागमन करताना ताब्यात, सहा जणांवर कारवाई.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर शिवारात वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. यात चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर, वेश्या व्यवसाय करुन घेणार्या एक महिलेसह तिघे तर वेश्यागमन करताना अकोले व संगमनेर येथील चौघांना अटक केली आहे. यात पोलिसांनी ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई मंगळवार दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी १० वाजण्याच्या सुमारास पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाने केली. त्यामुळे, घारगाव पोलिस ठाण्याच्या हाद्दीत असे प्रकार चालतात आणि पोलीस उपाधिक्षकांना त्याची दखल घ्यावी लागते. तर स्थानिक पोलीस करतात काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे, घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत किती अवैधधंदे बोकाळले आहे हे न बोलेले बरे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, मंगळवारी पोलीस उपाधिक्षक यांच्या पथकाला पोखरी बाळेश्वर शिवारात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गोपनिय सुत्रांकडून मिळाली होती. त्यांनी खात्री करुन अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे छापा टाकण्यासाठी सापळा राचला. खरोखर तेथे वेश्या व्यवसाय चालतो का? यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक म्हणून तेथे पाठविले. त्यावेळी घटनास्थळी आड्ड्यावर वैशाली उत्तम फटांगरे (रा. पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर) या होत्या. त्यांनी ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तीला चार महिला दाखविल्या. त्यांचे रेट काय आहे याची देखील सविस्तर माहिती दिली. त्यातून एक चॉईस करायची आणि एका खोलीत त्यांची व्यवस्था असते असे सांगून निर्णय घ्यायला लावला. तेव्हा ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तीला खात्री पटली. की, येथे देहविक्री व्यवसाय केला जातो.
दरम्यान, त्याने आजुबाजुला लापून बसलेल्या बाकीच्या पोलिस पथकास फोन केला. आपल्याला मिळालेली माहिती खरी असून येथे वेश्या व्यवसाय सुरु आहे. तेव्हा बाकी पथकाने तेथे अचानक छापा टाकला. तेव्हा तेथे चार महिला खोलीमध्ये मिळून आल्या. तर, याच वेळी ग्राहक म्हणून वेश्यागमन करताना एस. लेंडे (रा. नांदुरखंदर माळ, ता. संगमनेर), आर. मोरे (रा. धुमाळवाडी रोड, ता. अकोले), एस. मतकर (रा. निमज, ता. संगमनेर) हे मिळून आले. तसेच हा व्यवसाय करुन घेणारी महिला वैशाली उत्तम फटांगरे, फरार झालेला सोमनाथ यादव सरोदे (रा. आनंदवाडी, ता. संगमनेर) दिपक उत्तम फटांगरे (रा. पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर) यांच्या संगनमताने सुरू होता असे अशी माहिती पोलीस निरीक्षक घारगाव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. घटनास्थळी छापा टाकला असता कुंटनखान्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि काही वाहने असा एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
यापुर्वी देखील नगर तालुका आणि घारगाव हाद्दीत पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी छापे टाकले होते. मात्र, स्थानिक पोलिसांना याची जरा देखील चुनूक लागत नाही. आज देखील शहर आणि ग्रामीण अशा ठिकाणी लॉजिंगवर राजरोस व्यवसाय चालतो. मात्र, कॅफे सोडून कोठेही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे, पोलिसांच्या बाबत अनेकदा सोशल मीडियातून नाराजीचा सुर निघताना दिसतो आहे. पुर्वी शिर्डी, श्रीरामपूर आणि नगर तालुका हे वेश्या व्यवसायाचे केंद्र होते. आता संगमनेरात देखील बर्याच ठिकाणी वेश्या व्यवसाय चालताना दिसतो आहे. विशेष म्हणजे यात अनेकांना लुटले जाते मात्र, हे ठिकाण म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार. त्यामुळे झाकली मुठ सव्वालाखाची.! काहीच करता येत नाही. पोलीस उपाधिक्षक यांच्या पथकाच्या कारवाईमुळे आजुबाजुच्या परिसरात राहणार्या व्यक्तींनी या कारवाईचे कौतुक केले असून आभार मानले आहे.