व्यापार्‍याचा चावटळपणा, प्रतिष्ठीमहिलेची छेडछाड, गुन्हा दाखल, म्हणे कर गुन्हा पोलीस काही उखडत नाही.!

 

सार्वभौम (अकोले) :- 

 भाजीपाल्याचा व्यावसाय करणार्‍या एका व्यक्तीने एका प्रतिष्ठीत महिलेची छेडछाड करुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला ग्रामपंचायत सदस्य असून एका पक्षाची जबाबदार पदाधिकारी आहे. मोठ्या संघर्षातून लोकप्रतिनिधित्व करत असून ओळखीच्या व्यक्तीकडून हा घानेरडा प्रकार घडला आहे. खंडू करवर (रा. ढोकरी, ता. अकोले, जि. अ.नगर) असे या आरोपी व्यापार्‍याचे नाव आहे. जेव्हा घडलेला प्रकार महिलेने पोलिसांना कथन केला. तेव्हा पोलिसांनी आरोपीस फोन केला. तेव्हा देखील याची मुजोरी पहायला मिळाली. काय गुन्हा दाखल करायचा तो करा, मी घाबरत नाही असे तो पोलिसांना म्हणाला. त्यामुळे, पोलिसांचा धाक आहे की नाही? असा प्रश्‍न पडतो. तर, मी पोलीस देखील मॅनेज केले आहे, मी कोणलाच घाबरत नाही असे महिलेस म्हणाला. त्यामुळे, महिला सुरक्षित आहे का?, पोलीस खरोखर मॅनेज होतात का? गुन्हेगारांना अशा पद्धतीने पाठीशी घालतात का? असे अनेक प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, गेेल्या काही महिन्यांपासून पीडित महिलेचे पती आणि आरोपी खंडू करवर यांची ओळख झाली होती. त्यानंतर हे दोघे अकोले तालुक्यातील भाजीपाला जमा करुन तो मुंबईला विकत होते. या दरम्यान, करवर हा पीडित महिलेच्या घरी ये जा करत होता. त्यामुळे, त्याची वाईट नजर तिच्यावर पडत होती. मात्र, पीडित महिला एक सामाजिक व्यक्तीमत्व असून एका पक्षाची पदाधिकारी आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य देखील आहे. त्यामुळे, नेहमी एकमेकांना सहकार्य करणे, आडल्या-नडल्यास मदत करणे हा स्थायी स्वभाव या दाम्पत्याचा आहेे. मात्र, करवर याने चुकीच्या ठिकाणी वाईट नजर टाकली आणि थेट जेलमध्ये जाण्याचा मार्ग सुखकर केला.

दरम्यान, आरोपी खंडू करवर याच्या मनात काळे असल्यामुळे तो म्हणाला. की, मला कधीतरी मटन खाण्यासाठी बोलवा. तेव्हा पीडित महिलेच्या पतीने त्यास घरी मटन खाण्यासाठी निर्मळ मनाने बोलविले होते. त्यानंतर मटन खाऊन झाल्यावर याने पीडित महिलेस बाजुला बोलाविले आणि म्हणाला की तु मला आवडतेस. तेव्हा महिलेने त्यास चांगलेच खरमरीत उत्तर देत त्याचा समाचार घेतला होता. त्यामुळे, आरोपीच्या लक्षात आले. की, येथे आपली डाळ शिजत नाही. त्यानंतर पीडित महिलेने घडलेला प्रकार पतीस सांगितला आणि पतीने देखील खंडू करवर यास समज दिली होती. ज्या ताटात खातो त्या ठिकाणी घाण करु नको अन्यथा आम्ही कायद्याला माननारे लोक आहोत तुझ्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आरोपीने माफी देखील मागितली होती.

दरम्यान, दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला अकोले बाजारतळ येथे असताना तेथे आरोपी करवर हा आला आणि तिला म्हणला, की, चल मी तुला घरी सोडवितो. तेव्हा महिला म्हणली. की, तुला सांगितले ना, माझ्या मागे लागू नको. तुला वाटते तशी महिला मी नाही. मी माझ्या मुलास बोलावून घरी जाईल. हाताने मला पोलीस ठाण्याची पायरी चढायला लावू नको. तुम्ही तुमचा व्यावसाय पहा असे कोणावर वाईट नजरा टाकू नका. मात्र, आरोपीने ऐकले नाही. उलट खंडू हा रस्त्याच्या दुसर्‍या बाजुने जाऊन उभा राहिला. त्यानंतर याने वारंवार पाटलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरी देखील पीडित महिलेने दुर्लक्ष केले आणि पतीला सांगून त्यास सजझ देण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर आरोपीने पीडित महिलेस फोन करून भेटण्यास विनंती केली. मला बोलायचे आहे असे म्हणत वारंवार त्रास दिला. मात्र, पीडित महिलेने त्यास प्रतिसाद दिला नाही. आपल्याला भाव दिला जात नाही हे लक्षात आल्यानंतर करवर याने भलतेच उद्योग सुरू केले. महिलेच्या फोनवर फोन करुन तिला शिविगाळ करणे, ठार मारण्याची धमकी देणे सुरू केले. इतकेच काय? तर खंडू याने पीडितेच्या पतीस फोन करुन त्यांना देखील ठार मारण्याची धमकी दिली. मी तुझ्या पत्नीस उचलुन नेणार आहे असे म्हणत धमक्या दिल्या. त्यानंतर हा विकृतपणाचा अतिरेख झाल्यामुळे या दाम्पत्याने थेट पोलीस ठाणे गाठले आणि थेट गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपीने पोलिसांना देखील लुटसुलट बोलणे केले. त्यानंतर पोलिसांनी थेट त्याचा शोध सुरू केला.