अरे देवा.! सातवीच्या विद्यार्थीनीला मुलगा झाला, दहावीच्या विद्यार्थ्याची करामत.! संगमनेर आश्रमशाळेतील प्रकार.!

सार्वभौम (संगमनेर) :-

    इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थीनीचे प्रेम इयत्ता दहावीत शिकणार्‍या मुलावर जडले. त्यानंतर त्यांनी पळून जायचे ठरविले आणि दोघांनी बालविवाह देखील केला. मात्र, त्या दोघांना आणि  त्यांच्या घरच्यांना हे मान्य असले तरी ते कायद्याला मान्य नाही. त्यामुळे, दोघांमध्ये संबंध झाले आणि या विद्यार्थीनीस एक गोंडस मुलगा देखील झाला. मात्र, जेव्हा ही बाब वैद्यकीय अधिकार्‍यांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी कायदेशीर नोंद घेतली आणि त्यानुसार मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही धक्कादायक घटना बाळेश्‍वर आश्रमशाळा येथून सुरूवात झाली आणि घारगाव पोलीस ठाण्यात येऊन थांबली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो देखील बालगुन्हेगार असल्याचे लक्षात येते.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, पीडित मुलगी ही डीग्रस मालुंजे ता. संगमनेर परिसरातील असून हिला आईने बाळेश्‍वर आश्रमशाळा येथे शिक्षणासाठी पाठविले होते. पीडित विद्यार्थीनी इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असताना तिची ओळख इयत्ता ८ वीच्या वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याशी झाली होती. या ओळखीचे रुपांतर त्याच दरम्यान प्रेमात झाले होते. हा दोघांचा सिलसिला तब्बल दोन वर्षे सुरू राहिला. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात गेली असता तिला तिची आई दिवाळीच्या सुट्टीत शाळेवर न्यायला गेली होती. मात्र, या दरम्यानच्या काळात यांचा पुर्ण संपर्क तुटला होता. त्यामुळे, याचा विरह दाटून आला आणि यांनी पुन्हा शाळा जवळ केली. दोघे शाळेत येताच एकमेकांना भेटले आणि त्यांनी शाळेतून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या दोघांनी चारदोन दिवसात तेथून पळ काढला आणि ते साकूर मांडवे येथे राहणार्‍या त्यांच्या पाहुण्यांच्या घरी राहिले. तब्बल दिड ते दोन महिने यांनी तेथे एका झोपडीत गुजरान केली. या दरम्यान दोघांमध्ये शरिर संबंध आले आणि तोच त्यांच्यासाठी सर्वात घातक काळ ठरला. त्यावेळी मुलाने सांगितले. की, तु काळजी करु नको, आपण थोड्याच दिवसात लग्न करु, त्यानंतर सर्व काही प्रश्‍न मार्गी लागतील. त्यानंतर असे केव्हार बाजुला रहायचे? जे आपल्याकडून झाले ते आपण आपल्या कुटूंबाला विश्‍वासात घेऊन सांगू असे ठरले आणि ते जून २०२३ मध्ये पीडित मुलीच्या घरी गेले. तेथे यांनी त्यांच्या पुर्ण इतिहास कथन केला. मात्र, त्याच वेळी मुलीला प्रचंड मळमळ होऊ लागली होती. तेव्हा पीडितेच्या आईने तिच्याकडे सखोल चौकशी केली. पीडित मुलीची कहानी ऐकल्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात नेले.

दरम्यान, मुलगी लहान होती त्यामुळे तेथे डॉक्टरांनी वयाची विचारणा केली. तेव्हा पीडितेने तिचे वय १९ वर्षे असल्याचे सांगितले. त्यामुळे, पुढील सर्व उपचार सुरू झाले. त्यावेळी यांना समजले. की, ही मुलगी दोन महिन्यांची गरोदर आहे. त्यानंतर मुलीच्या आईने मुलाच्या आई वडिलांशी संपर्क केला. त्यांना बोलावून घेतले आणि घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर या दोन्ही कुटुंबाने सामंजस्याची भुमिका घेत आंबेगाव येथे दोघांच्या गळ्यात माळा आणि मंगळसुत्र टाकले आणि अगदी साध्या पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला. त्यानंतर ही अल्पवयीन मुले लग्नाबंधनात पडली ते एकमेकांसोबत पती पत्नी म्हणून राहू लागले. पोटातील बाळ देखील दिवसेंदिवस मोठे होत गेले. मात्र, हा एक बालविवाह होता. त्यामुळे, येणार्‍या काळात मुलगा अडचणीत येणार हे नक्की होते.

दरम्यान, दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी मुलीच्या पोटात दुखू लागले होते. त्यामुळे तिला तत्काळ वाय.सी.एम रुग्णलयात हलविण्यात आले. त्यानंतर तिची नॉर्मल डिलेवरी देखील झाली आणि तिने अल्पवयीन असताना देखील एका गोंडस मुलास जन्म दिली. मात्र, जेव्हा मुलीचे वय विचारले तेव्हा ते फार कमी असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकारला पाठीशी न घालता थेट पोलीस ठाण्यात रिपोर्टींग केली. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे तो दोन्ही बालकांमध्ये झाला तरी त्याला कायद्यात आधार नाही. त्यामुळे, पीडित मुलीची फिर्याद घेण्यात आली आणि त्यानुसार अत्याचाराचा गुन्हा पुणे ग्रामीणला नोंदविण्यात आला आहे. मात्र, घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हाद्दीत घडल्यामुळे तो गुन्हा इकडे वर्ग करण्यात आला आहे.