ये नालायक कुत्रे वर थोबाड करुन कुठे चालली.! आश्रमशाळा अधिक्षकाचे महिलेवर तोंडसुख.! तीन चापटी तोंडात मारल्या, अधिक्षक थेट जेलमध्ये.!

सार्वभौम (अकोले) :-

    जीभेला हाड नाही म्हणून काहीही बोलु नये असे वर्गात शिकविले जाते. मात्र, आश्रमशाळेत मुलांचे राखन करणार अधिक्षक जेव्हा माज आल्यासारखा बोलतो आणि वागतो तेव्हा त्याला थेट जेलची वारी करावी लागते. अशीच एक घटना शुक्रवारी (दि.१५)अकोले तालुक्यातील खडकीच्या आश्रमशाळेवर घडली. अधिक्षक महोदयांनी भर शाळेत मुले आणि शिक्षक-मुख्याध्यापक यांच्या समोर एका महिलेशी घाणेरडे वर्तन करून तिला जातीवाचक शिविगाळ केली. अतिशय खालच्या भाषेत बोलुन तिला मारहाण देखील केली. याप्रकरणी राजेश दगडू डुबे (रा. खडकी, ता. अकोले) याच्यावर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहा.पोलीस निरीक्षक दातरे यांनी तत्काळ आरोपीस अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाघचौरे करीत आहेत.

याबाबत फिर्यादीत दिलेली माहिती अशी. की, शुक्रवार दि. १५ डिसेंबर रोजी एका पीडित महिला शाळेवर गेली होती. तेथे अनेक महिला कामास असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत त्यांच्याकडे स्वयंपाक करण्याची जबादारी आहे. या महिलांनी नेहमीप्रमाणे स्वयंपाक बनविला आणि दुपारी १२ वाजण्याची वाट त्या पाहत होत्या. कारण, या टाईमात मुलांची सुट्टी होते आणि त्यांना जेवण द्यावे लागते. त्यामुळे, १२ वाजता मुलांनी देखील नेहमीप्रमाणे जेवणासाठी रांगा धरल्या होत्या. पीडित महिलेसह सर्व महिलांनी मुलांना जेवण वाढण्यासाठी घेतले. मात्र, यावेळी आरोपी राजेश डुबे हा फक्त पीडित महिलेच्या पाठीमागे हेतूपुर्वक फिरत होता. त्याला या महिलेचा राग होता त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वाद घेलणे हाच त्याचा हेतू असल्याची जाणवत होते. तो तशा पद्धतीने बोलत देखील होता.

दरम्यान, पीडित महिला जेवण वाढत असताना आरोपी राजेश डुबे हा संबंधित महिलेस म्हणाला. की, ये नालायक कुत्रे, तोंड वर करुन कोठे चालली? येथे भाकरी वाढ. तेव्हा महिलेला प्रचंड वाईट वाटले. चारदोन शिक्षक, मुले आणि सहकारी यांच्या देखत आरोपीने जो अपमान केला. तो महिलेला सहन झाला नाही. त्यामुळे, त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. त्यानंतर त्यांनी जवळच असणार्‍या मुख्याध्यापक यांना विनंती केली. की, सर या व्यक्तीला निट बोलायला सांगा. एका महिलेशी किंवा कामावर असणार्‍या व्यक्तीशी कसे बोलावे याची आपण डुबे यांना समज द्यावी.  मात्र, डुबे काही ऐकण्याचा मनस्थिती नव्हता आणि मुख्याध्यापकांचे नियंत्रण असते तर या थराला जाण्याची त्याची मजल नसती. त्यामुळे तेथे कोणालाही न जुमानता डुबे याने पुन्हा अश्‍लिल शिविगाळ व दमदाटी करीत महिलेशी जातीयवादी भाषेत बोलत बाचाबाची केली.

दरम्यान, हा वाद यावर शमेल असे वाटत असताना आरोपी राजेश डुबे याला आपण पुरुष असल्याचे भान राहिले नाही. त्याने चारचौघात महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा व्यक्ती इथेच थांबला नाही, तर त्याने पीडित महिलेच्या तोंडात तीन चापटी देखील मारल्या  तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचे केस धरुन तिचा हात देखील पिरगाळला. माझ्या नादाला लागली तर तुझे काही खरे नाही असे म्हणून तिला शिविगाळ, दमदाटी केली. त्यानंतर तेथील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी आरोपी राजेश डुबे याला कवळी मारुन बळबळ ओढत बाजुला नेले. अन्यथा जो बाईमानसावर हात उचलु शकतो. तो तिचा जीव देखील घेऊ शकतो. त्यामुळे, संबंधित महिला भेदरुन गेली होती. त्यानंतर तीने पती व मुलास फोन केला आणि थेट राजूर पोलीस ठाणे गाठले. सदर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आरोपी राजेश डुबे यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तर आम्ही रस्त्यावर उतरु.! 

संबंधित घटना ही फार भयानक आहे. एक वरिष्ठ अधिकारी चतुर्थ श्रेणीतील महिलेस केस धरुन मारहाण करतो, जातीयवादी बोलतो ही बाब खरोखर निषेधाची आहे. या व्यक्तीचे नोकरीतून निलंबन झाले पाहिजे. याची चौकशी करुन त्याला बडतर्फ केले पाहिजे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर तो संबंधित महिलेवर कायम रोष व्यक्त करेल किंवा काहीतरी नुकसान करु शकतो. एव्हाना महिलेचा जीव देखील धोक्यात जाईल असे वर्तन करु शकतो. त्यामुळे, या गोष्टीकडे संस्था प्रशासनाने गांभिर्याने पाहिले पाहिजे. तसे न झाल्यास न्यायासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.

- सुरेशराव देठे (अध्यक्ष-उत्तर महा. गवई गट)