गटशिक्षण अधिकारी खताळांची पदाहून उचलबांगडी, निलंबन किंवा बडतर्फीच्या प्रतिक्षेत, संशयित बदल्यांचे झाले पुन्हा समायोजन, अनेक शिक्षकांना मिळाला न्याय.!

   
सार्वभौम (अकोले) :-

    अकोले तालुक्याचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांची गटशिक्षण अधिकारी पदाहुन उचलबांगडी करण्यात आली आहे. अनेक चौकशांमध्ये दोषी आढळून येत असल्यामुळे खताळ यांची खुर्ची काढून घेत अभयकुमार वाव्हळ यांच्याकडे नव्याने चार्ज देण्यात आला आहे. यात मुख्य कार्याकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्याकारी अधिकारी राहुल शेळके, शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांनी फार महत्वाची भुमिका बजावली आहे. खताळ यांनी नियमांना हरताळ फासून ४४ शिक्षकांच्या बदल्या मनमानी पद्धतीने म्हणजे अक्षरश: बिडिओ साहेबांना देखील विश्‍वासात न घेता केल्या होत्या तर, १५ बदल्यांचे समायोजन करताना अनेक संशयित बदल्या वाटत होत्या. त्यामुळे, त्या बदल्या देखील पुन्हा तातडीने आदेश काढून घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला होता. त्यांना न्याय मिळाला असून या प्रक्रियेत ८० पेक्षा जास्त शिक्षक व संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी रोखठोक सार्वभौमचे आभार मानले आहे.

गेल्या वर्षभरापासून प्रभारी गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांच्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्यानुसार अनेकांनी लेखी तक्रारी  देखील केल्या होत्या. मात्र, तक्रार नोंदविली जाणार, आवक जावक नंबर पडणार आणि त्यानंतर म्हणतात ना.! झाकली मुठ सव्वालाखाची..! त्यामुळे, सगळे फावले जात होते. आपल्या वरिष्ठ अधिकारी बिडीओ, शिक्षण अधिकारी, सीईओ असतात याचा त्यांना विसर पडून गेला होता. नेत्यांच्या खाजगी कार्यक्रमांना शिक्षक आणि विद्यार्थी गर्दी म्हणून देणे, महिलांना भर रस्त्यात आडवून जाब विचारणे, वरिष्ठांना न विचारता अधिकार क्षेत्रात नसताना अनागोंदी बदल्या करणे, आपला जवळच्या शिक्षक नेत्यांना हव्या तशा ठिकाणी बदल्या देऊन अधिकचे शिक्षक गरज नसताना तेथे देणे, शिक्षकांशी आरेरावीच्या भाषा वापरुन त्यांना खाली पहायला लावणे अशी अनेक कारणे आहेत. मात्र, या सर्व तक्रारी भिजत घोंगडे पडल्यासारख्या होत्या. त्यावर एक ठाम भुमिका रोखठोक सार्वभौमने घेतली. अर्थात हा आजाव तमाम दाबल्या दडपल्या शिक्षकांचा होता. मात्र, अनेक आरोप प्रत्यारोप आणि विकत घेण्यापासून ते वाकविण्यापर्यंत अनेक प्रयत्न झाले. तरी सार्वभौम ठाम राहिले. त्यामुळेच आम्हा अनेक शिक्षकांना न्याय मिळाला असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

१९ शिक्षकांवर टांगती तलवार.!

सेवा शर्तीच्या नियमानुसार प्रशासनाच्या विरोधात जाऊन पत्रकार परिषदा घेता येत नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे राजकीय व्यसपिठावर तर नाहीच नाही. त्यामुळे, काल जी पत्रकार परिषद झाली. त्यात १९ शिक्षक प्रत्यक्ष पत्रकार परिषदेला हजर असल्याचे दिसत आहेत. त्यातील काही व्यक्तींना पुढे करून चुकीचे आरोप देखील करण्यास सांगितले. मुळात उंचखडक बु बाबतीत निर्माण झालेला मुद्दा होता. की, एका व्यक्तीच्या अट्टाहासापाई मला तेथून काढले. पण, अर्धवट बुद्धीच्या व्यक्तींनी हकनाक संबंधित एका माऊलीला तोफेच्या तोंडी देऊन चुकीचे बोलण्यास भाग पाडले. मुळात २३ जून २०२३ रोजी १५० नागरिक व पालकांचे लेखी पत्र ते ही मोबाईल नंबरसह बीडीओ पांडुरंग कोल्हे आणि तत्कालिक प्रभारी गटशिक्षण अधिकारी खताळ यांना देण्यात आले आहे. त्यात स्पष्ट उल्लेख आहे. की, शिक्षकांच्या अकार्यक्षमतेमुळे शाळा बंद पडली आहे. त्यामुळे, आम्हाला दुसरे शिक्षक दिले तर बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू होऊ शकते. त्यामुळे, हा एका व्यक्तीचा नव्हे तर गावाटा अट्टाहास होता. मात्र, याबाबत जर काही प्रश्‍न होता तर त्याचे लेखी स्वरुपातील म्हणणे वरिष्ठ अधिकार्‍यांकडे देणे अनिवार्य असते. मात्र, यांनी पत्रकार परिषदेत बोलुन सेवा शर्तीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असा अर्ज शिक्षणमंत्री, सीईओ, शिक्षण अधिकारी, बीडीओ यांना देण्यात आला असून तसे पुरावे देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे, १९ शिक्षकांवर शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार असणार आहे.

कारवाईत एकच गोष्टीत नाही.!

गेल्या 15 दिवसांपासून अकोले तालुक्यात शिक्षण विभागाच्या बाबत चर्चा सुरु आहे. येथील गटशिक्षण अधिकारी यांच्या अनोगोंदी कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. महिलांकडे शरिर संबंधाची मागणी करणे (याची शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांच्याकडे तक्रार आहे), महिलांना रस्त्यात आडविणे, त्यांचे स्त्रीत्व दुखावणे (याची देखील लेखी तक्रार आहे), जातीयवाद करणे (याची देखील तक्रार शासनदरबारी जमा आहे), परखतपूर सारख्या ठिकाणी जास्तीचे शिक्षक देणे, झेडपीची मुले खाजगी शाळेत आणि पटावर मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेत असणे, शिक्षकांशी आरेरावीची भाषा करणे, समशेरपूर विभागात पुढाऱ्याच्या खाजगी कार्यक्रमास शिक्षक व मुले घेऊन जाणे, ४४ बदल्या संशयात्मक करणे, समायोजन प्रक्रियेत मोठ्या शाळा ब्लॉक करुन अनोगोंदी कारभार करणे, बीडिओ साहेबांना विश्वासात न घेणे, आरोप लपविण्यासाठी स्थानिक पाहुणे आणि नेत्यांना हाताशी धरुन सीईओ, पत्रकार, तक्रार करणारी महिला आणि अन्याय सहन न करणारे शिक्षक हे एका विशिष्ट जातीचे असल्याचे भासवून त्यांच्या विरोधात मराठा कम्युनिटी एकत्र करुन त्यांना प्रेस घ्यायला लावणे. शिक्षकांना पुढे करुन पत्रकार परिषदेत आरोप करण्यास सांगणे हे सर्व सेवा शर्तीच्या नियमांचे भंग करणे आहे. त्यामुळे, यांची सखोल चौकशी करुन कॉल डिटेल्स चेक करणे वेळप्रसंगी नार्के टेस्ट करावी अशी मागणी होत आहे. कारण, एका जबाबदार पदावर बसल्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या घटनेला जातीय रंग देणे हे चुकीचे आहे. त्याचे पाकीटवाले वगळता कोणीच समर्थन करु शकत नाही. कोणताच पर्याय रहात नाही म्हणून इतक्या खालच्या पातळीवर समाज व्यवस्था नेवून ठेवणे हे शिक्षण विभागाच्या त्या जबाबदार पदाला काळीमा फासल्यासारखे आहे. त्यामुळे, सेवा शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मास्टर माईंडसह चौकशीअंती चुकीत सापडणाऱ्या सर्वांचे निलंबन करण्यात यावे. अशी मागणी अकोले तालुक्यातील सजग नागरिकांनी केली आहे.