बाबो.! शिंदे गटाच्या बाजीराव दराडेने मागीतली ५० लाखांची खंडणी, दोघा भावांवर गुन्हा दाखल, पोलीस शोध सुरू.!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे मा. सदस्य बाजीराव दराडे याने एका ठेकेदाराकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जर ५० लाख ही रक्कम दिली नाही तर कामावर आलेल्या मशनरी जाळून टाकू, कामगारांचे हातपाय तोडून टाकू आणि तुम्ही चालवत असलेल्या टोलबुथची तोडफोड करुन जाळून टाकू अशी धमकी दिली. ही घटना शनिवार दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील पिंपळदरावाडी येथे घडली. याप्रकरणी श्रीकांत दिगांबर कवडे (रा. पाटोदा, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाजीराव शंकर दराडे आणि संजय शंकर दराडे (रा. समशेरपूर, ता. अकोले, जि. अ.नगर) अशा दोघांना आरोपी करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा गुन्हा दाखल करण्यात राजकीय दबाव येत होता. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना देखील काच लागला होता. मात्र, जलसंधारणच्या सरकारी अधिकार्यांचे पुरक जबाब आणि सबळ पुरावे यांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कवडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. की, दि. ५ एप्रिल २०२३ रोजी आमच्या हुले कन्स्ट्रक्शन प्रा.लि. कंपनीला जलसंधारण मृद विभागाकडून आदिवासी बहुल क्षेत्रातील पिंपळदरावाडी येथे लघुपाटबंधारे योजनेचे काम मिळाले होते. हे काम करण्यासाठी जलसंधारण विभाग संगमनेर यांनी देखील दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी सिमाकरण करुन दिले होते. त्यानुसार ठरल्याप्रमाणे शंभर टक्के शासनाच्या जागेत काम सुरू केले होते. शनिवार दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी कामावर तेजस हुले, गणेश रायते, सोमनाथ सवाशे, अनुरथ साळवे अशी काही व्यक्ती उपस्थित होते. तेव्हा सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तेथे एका फॉर्च्युनर गाडी आली. त्यातून खंडणीखोर बाजीराव शंकर दराडे आणि संजय शंकर दराडे ही दोघे उतरली. त्यांनी कामाची पहाणी करण्यास सुरुवात केली आणि थेट आर्वाच्च व अश्लिल भाषेत शिविगाळ सुरू केली.
दरम्यान, आरोपी दोन्ही दराडे म्हणाले. की, आम्ही या तालुक्यातील राजकारणी मानसे आहोत, त्यामुळे, येथे काही काम करायचे असेल तर तुमच्या मालकास सांगा. की, ५० लाख रुपये दिल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही. जोवर ५० लाख पोहच होत नाही, तोवर काम सुरू करायचे नाही. असे म्हणत या दोघांनी शिविगाळ दमदाटी सुरू केली. जर हा पैसा मिळाला नाही तर तुमची मशनरी बंद करुन जाळून ठाकू, काम करणार्यांचे हातपाय तोडून मारुन टाकू अशी धमकी दिली. हा सर्व राडा झाल्यानंतर मॅनेजर पदावर असणार्या कवडे यांनी तत्काळ काम बंद केले आणि ते जे काही म्हणत होते निमुटपणे ऐकण्यास सुरूवात केली. कामगार असल्यामुळे, तुर्तास कवडे आणि कामावर असणार्या व्यक्तींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान, बाजीराव दराडे म्हणाला. की, मला माहित आहे. तुमच्या कंपनीस पुणे-नाशिक हायवेवर चाळकवाडी येथील टोल नाक्याचे कन्स्ट्रक्शन मिळाले आहे. त्यामुळे, तुम्ही ५० लाख रुपयांची खंडणी दिली नाही. तर, टोलमध्ये घुसून, कर्मचार्यांचे हातपाय बांधून, पैसे वसूल केले जातील. तसेच टोलबुथ देखील जाळून टाकण्यात येईल अशी धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर साईट इन्चार्ज बारीकराव बावने यांनी कन्स्ट्रक्शनचे मालक विश्वनाथ हिले यांना फोन लावला. त्यांनी आरोपी बाजीराव दराडे आणि संजय दराडे हे काम म्हणाले याची माहिती दिली आणि त्यानंतर चालु असणारे काम बंद पडले.
दरम्यान, त्यानंतर दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी बाजीराव दराडे याने कन्स्ट्रक्शनचे मालक विश्वनाथ हिले यांना फोन लावला. मी अकोले येथून बाजीराव बोलतो आहे. मला ५० लाख रुपयांची खंडणी देईपर्यंत काम बंद ठेवा अन्यथा सर्व मशनरी जाळून टाकेल. कर्मचार्यांचे हातपाय तोडून टाकेल, तसेच तुमचे टोलबुथ देखील जाळून टाकेल अशी धमकी दिली आणि त्यानंतर फोन कट करुन टाकला. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठले होते. त्यानंतर तो अर्ज अकोले पोलीस ठाण्यात आला. येथे तक्रारदार यांचे जबाब नोंदविण्यात आले होते. मात्र, राजकीय व्यक्तींच्या दबावामुळे वरिष्ठ अधिकार्यांचे हात दगडाखाली चेंबले होते. दरम्यान, एरव्ही खंडणीची आलेली फियार्र्द काही क्षणात दाखल करुन घेणार्या पोलिसांनी गेली कित्तेक दिवस चालढकल केली. मात्र, फिर्यादी ठाम राहिले आणि काही सबळ पुराव्यांची पुष्टी देखील मिळाली. त्यामुळे, गुन्हा दाखल करावा लागला असे मत ठेकेदार व्यक्तींनी व्यक्त केले. त्यानुसार आता बाजीराव शंकर दराडे आणि संजय शंकर दराडे (रा. समशेरपूर, ता. अकोले, जि. अ.नगर) अशा दोघांवर ५० लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा अकोले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.