मा.महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या PA वर गुन्हा दाखल, कामगारांच्या सेफ्टी पेट्या लुटल्या, थोरात थेट आश्वीत....
सार्वभौम (संगमनेर) :-
बांधकाम विभागाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेफ्टी पेट्या मा. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे पीए विजय उर्फ पांडूरंग जगन्नाथ हिंगे (रा. आश्वी, ता. संगमनेर) याने हडप केल्या. यात हॉगिंग बेल्ट, शुज, टॉर्च, बॅग, जेवणाचा डबा, हेल्मेट, पाणी बॉटल, मच्छर दाणी, चटई, अपरन असा मुद्देमाल कामगार विभाग आणि पोलिसांनी हस्तगत केला आहे. यात एका पेटीची अंदाजे किंमत 8 हजार 500 रुपये प्रमाणे 10 पेट्या म्हणजे 85 हजार रुपयांचा अपहार हिंगे यांनी केला आहे. जेव्हा कामगार विभागाचे अधिकारी कारवाई करण्यासाठी आले. तेव्हा हिंगे याच्या नातेवाईकांनी मोठा गदारोळ केला. कारवाई करताना सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे, हिंगे याच्यासह अन्य सहा जणांवर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, दि. 17 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:30 वाचे सुमारास ललित प्रकाश दाभाडे (दुकान निरीक्षक महाराष्ट्र शासन कामगार विभाग अहमदनगर) असे डयुटीवर असताना त्यांना सहाय्यक कामगार आयुक्त कवले यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, बांधकाम कामगारांच्या सुरक्षा संच संदर्भात तक्रार अर्ज ई-मेलद्वारे आला आहे. त्याची चौकशी तुम्ही करा असा आदेश दिला. त्यानंतर व्हॉट्सअपद्वारे काही माहिती पाठविली. सोबतीला तहसिलदार संगमनेर धीरज मांजरे यांचा फोन नंबर देखील दिला होता. तेव्हा या अधिकाऱ्यांनी भाडोत्री वाहन घेवुन थेट आश्वी गाठली. येथे गेल्यानंतर आरोपी विजय उर्फ पांडुरंग जगन्नाथ हिंगे याचे घर कोठे आहे याची माहिती घेतली. दरम्यान, रात्री 09:15 वाजण्याच्या सुमारास विजय उर्फे पांडुरंग जगन्नाथ हिंगे यांचे घरासमोर ते गेले.
दरम्यान, विजय हिंगे यांचे घराजवळ जावुन पाहीले असता घराचे दरवाजे आतून बंद होते. म्हणुन कामगार विभागाचे अधिकारी हिंगे याच्या घरामागे गेले. तेथे भिंतीलगत उसाचे शेताजवळ मोकळ्या जागेत पाहीले असता तेथे महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगारांच्या सुरक्षा संचच्या 10 पेट्या सदर ठिकाणी मिळुन आल्या. ही सर्व चौकशी चालु असताना तेथे आश्वी पोलीस स्टेशनचा स्टाफ दाखल झाला. घराभोवती नेमकी काय चालु आहे. काय आवाज येतो आहे म्हणून त्या आवाजाने घरातील वृध्द महिला बाहेर आली. तिने काय चालले आहे याची विचारणा केली. तेव्हा या महिलेस संबंधित पेट्यांबाबत विचारले. मात्र, या पेट्या कोणी व कधी ठेवल्या याबाबत मला माहीती नाही. असे उत्तर आजीने दिले. त्यानंतर संबंधित महिलेने काही व्यक्तींना फोन करणे सुरु केले. त्यानंतर हिंगे याचे नातेवाईक व गावातील नागरिक तेथे जमा झाले. यावेळी या वृद्ध महिलेचा बीपी वाढल्याने तिला त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कामगार अधिकाऱ्यांनी तेथे मिळुन आलेल्या 10 पेटया खोलुन पाहील्या. त्यात महाराष्ट्र शासन इमारत व बांध कल्याणकारी मंडळाचे बांधकाम कामगारांना दिले जाणारे साहित्य त्यात आढळुन आले. त्यात हॉगिंग बेल्ट, शुज, टॉर्च, बॅग, जेवणाचा डबा, हेल्मेट, पाणी बॉटल, मच्छर दाणी, चटई, अपरन असे एका पेटीतील साहित्य अंदाजे किंमत 8 हजार 500/- रुपयांचे आहे. अशा 10 पेट्या म्हणजे 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी व कामगार विभागाने हस्तगत केला.
कोणास व कशी सेफ्टी पेटी मिळते.!
एखाद्या कामगारास कामगार विभागात ऑनलाइन अर्ज करावा लागतो. सदरचा कामगार अहमदनगर येथील कार्यालयात आल्यानंतर अर्ज मंजुर झालेल्या कामगारास ओळख पत्र दिले जाते. त्यानंतर सदरचा कामगार सुरक्षा संच व अत्यावश्यक वाटप केंद्रात जावुन त्याचे सुरक्षा संच घेण्यासाठी गेले नंतर त्याचे बोटाचे ठसे हे कामगाराच्या आधारकार्डशी लिंक केले जाते. त्याची कागदपत्रे आधारकार्ड झेरॉक्स प्रत्येकी 2 प्रती, कामगार ओळखपत्राची झेरॉक्स प्रत्येकी 2 प्रती, मंडळाचा शुल्क असलेली पावती प्रत्येकी 2 प्रती यानुसार मंडळाच्या कार्यप्रणालीनुसार ऑनलाईन पोर्टल पद्धतीने बोटाचे ठसे व फोटो घेतले जातात. त्यानंतर ऑनलाईन पोर्टल पद्धतीने नोंद झाल्यानंतर 12 प्रती घेतल्या जातात व त्यावर प्रत्येक कामगाराची सही घेतली जाते. त्यानंतर त्याला वस्तु हस्तांतरीत करण्यात येतात. या पेटीत हेल्मेट, बॅग, शुज, फेसमास्क, सेफ्टी एअर प्लग, इत्यादी वस्तुवर इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असे नाव लिहिलेले असते.
विजय हिंगे यांच्यावर खोटा गुन्हा- आ. थोरात
नुकत्याचं झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सत्ता न मिळलेल्या विरोधाकांनी राज्यात असलेल्या सत्तेतून दडपशाहीचा वापर करून षडयंत्र रचत सामाजिक काम करणाऱ्या विजय हिंगे यांच्या घरामागील ऊसात बांधकाम कामगार योजनेतील पेट्या टाकून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांच्या जागृत व एकीमुळे तलाठ्यासह तपासणी करणारे आधिकारी तत् मम् करत बसले , यामागील सुत्रधार १५ दिवसात शोधा. अन्यथा पोलिस स्टेशन समोर सर्व ग्रामस्थ अमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त गावकऱ्यांनी दिल्या असून या खोट्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ आश्वी बुद्रुक मध्ये भव्य रॅली काढून कडकडीत बंद पाळत निषेध सभा घेण्यात आली.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय साहाय्यक विजय हिंगे यांच्या नेतृत्वाखालील नुकत्याच झालेल्या ग्रामपचायत निवडणुकीत विजयी झाल्याने जिव्हारी लागलेल्या विरोधाकांनी षडयंत्र रचत हिंगे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाल्याने सर्व ग्रामस्थ एकत्र येत दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी निषेध सभा घेण्यात आली . या निषेध सभेतून आश्वी व परिसरातून आलेल्या लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बाळासाहेब गायकवाड पुढे म्हणाले की, गलिच्छ राजकारण करुन प्रामाणिकपणे सामाजिक काम करणाऱ्या तरुणावर खोटे आरोप करणे म्हणजे अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. राजकारणात हार-जीत चालुच रहाते ज्याला हार पचवंत नाही त्यांनी गलिच्छ राजकारणातून खोटे नाटे प्रयोग करु नये. हवे असेल तर नूतन संरपचासह ही नविन इमारत सुद्धा तुम्हाला घ्या .मात्र प्रामाणिक माणसाला बदनाम करु नका ! आधिकाऱ्यांच्या माध्यमातून हिंगे यांच्या घराभोवती जे षडयंत्र रचन्यात आले ते राजकिय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना आहे . दडपशाचे राजकारण करून वयोवृद्ध महिलेला जाणून - बुजुन त्रास देण्यात आल्याने सर्व ग्रामस्थ आज एकत्र आले आहेत. यावेळी काँग्रेस नेते आ. थोरात यांनी आश्वीत भेट दिली.