पेशन्ट घरी घेऊन जाताना अपघात, दोन मयत, एक जखमी.! दोेेघे सुखरुप, वाहनचालक पसार
सार्वभौम (अकोले)-
एका महिलेने औषध घेऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, डॉ. भांडकोळी यांनी तिचे प्राण वाचविले आणि तिला एका योजनेत बसवून घरी देखील पाठविले होते. मात्र, काळाचा घालला तिच्याहून चुकला आणि तिच्या परिवारातील दोघांवर गेला. यात दोन तरुण मयत झाले असून एक गंभीर जखमी आहे. ही घटना गुरुवार दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील सुगाव फाटा ते वाशेरे फाटा या दरम्यान घडली. यात काशिनाथ भानुदास डोके (रा. सावरचोळ, ता. संगमेनर) व शंकर किसन डोके (रा. पिंपळगाव खांड, ता. अकोले) अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. तर अजय रामनाथ मधे (रा. पिंपळगाव खांड) हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, डोके कुटुंबातील एका महिलेने औषध घेतले होते. तिला तत्काळ डॉ. भांडकोळी रुग्णालयात दाखल केले होते. तिची परिस्थिती नाजूक असताना देखील डॉक्टरांनी तिला जीवदान दिले. आठ दिवसानंतर महिलेस बरी करुन घरी पाठवायचे होते. त्यामुळे, सासरे, भाया आणि अन्य काही व्यक्तींनी अकोले गाठले. डॉ. भांडकोळी यांचे आभार माणून पाचजण पिंपळगाव खांडच्या दिशेने निघाले. यावेळी पेशन्टची गाडी पुढे निघुण गेली आणि हे तिघे पेट्रोल टाकण्यासाठी एका पंपावर थांबले होते.
दरम्यान, आजारी असणारी महिला पुढे सुखरूप गेली. मात्र, काशिनाथ, शंभर आणि अजय हे तिघे गाडीवरुन जात होते. हे सुगाव फाट्याच्या पुढे एक नर्सरी आहे. त्या परिसरात असताना त्यांना एका चारचाकी गाडाने जोराची धडक दिली. मात्र, हे तिघे इतके गंभीर जखमी झाले. की, ज्या गाडी चालकाने त्यांना उडविले तो तेथून पसार झाला. त्यानंतर अन्य काही व्यक्तींनी या तिघांना पाहिले. यावेळी काशिनाथ हा जाग्यावर मयत झालेला होता. तर, शंकर पुर्णत: बेशुद्ध होता, अजय मात्र सावध होता. त्यानंतर शंकर याच्यावर उपचार सुरू केले असले तरी त्याला न्युरोसर्जनची नित्तांत गरज होती. त्यामुळे, त्याला संगमनेरला हरविण्यात आले होते.
दरम्यान, शंकर डोके याच्या मेंदुला मार लागल्यामुळे त्याला संगमनेर येथे कोणीच ऍडमिट करुन घेतले नाही. तर, सर्वात महत्वाचे म्हणजे शंकर डोके याची आर्थिक परिस्थिती फार गरिबीची आहे. त्यामुळे, तो एकाच वेळी लाखो रूपये देऊ शकत नव्हता. त्यामुळे, त्याला लोणी येथे हलविण्यात आले. तेथे देखील त्याच्यावर उपचार झाले नाही. म्हणून त्यास कोपरगाव येथे आत्मा मलिक येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेथे देखील त्याच्यावर उपचार झाले नाही. अखेर या जगात पैसा नाही म्हणून उपचार मिळत नाही. याच भावनेतून कदाचित शंकर डोके या तरुणाने आपला जीव सोडून दिला. आज (दि. १७ नोव्हेंबर) त्याला अकोले ग्रामीण रुग्णालयात आणले होते.
दरम्यान, ज्या गाडीने या तिघांना उडवून दिले होते. तो गाडीचालक घटनास्थळाहून पसार झाला होता. तो जर कदाचित थांबला असता आणि उडवून दिलेल्या तिघांना तत्काळ रुग्णालयात नेले असते. तर, कदाचित कोणा एकाचा का होईना जीव वाचला असता. मात्र, अपघात करुन तो पळुन गेला. तरी देखील अद्याप त्याचा शोध लागला नाही. आरोपीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर, आज कोल्हार घोटी रोडवर मनोहरपुर फाटा येथे देखील एका तरुणाचा अपघात झाला आहे. हा अपघात आहे की घातपात यावर पोलिसांना देखील शंका आहे. यशवंत गोर्डे (रा. धांदरफळ, ता. संगमनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची पुढील चौकशी पोलीस उपनिरीक्षक भुषण हांडोरे करीत आहेत.