जेल कापून चौघे पळाले; तीन पोलीस निलंबित, पीआयची चौकशी सुुुरु, कंट्रोल जमाची मागणी, तर आंदोलन छेडणार..!!

 

- सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) :-  

                  संगमनेर शहर पोलीस ठाण्यात असणाऱ्या कारागृहातुन चार कैदी जेलतोडुन पळाले. हे कैदी जामनेर जळगावात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. त्यानंतर, धक्कादायक माहिती समोर आली. कैद्यांकडे जेलमध्येच "गावठी पिस्तुल" होता. हा पिस्तुल आला कोठून? ह्याच पिस्तुलचा धाक पोलिसांना दाखवुन पळाले तर नाही ना? कारण जेल तोडुन बाहेर पडताच आरोपीने गाडीत बसणाऱ्या मोहन भाटि याला ह्या पिस्तुलचा धाक दाखवला होता अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता ह्या कैद्यांना मोबाईल पासुन तर गावठी कट्टा, हेक्सपान, नशेच्या वस्तु ह्या सर्व भेटत राहिल्या आणि पोलीस कर्मचारी व निरीक्षक पाहत राहिले. शहरातील रेकॉर्ड वरील आरोपी कारागृहातील कैद्यांना मदत करत होते. मोबाईल, सीम देण्यापासून तर पळुन जाण्याचा प्लॅन करत होते आणि पोलीस निरीक्षकांच्या नाईट राऊंडमध्ये कैदी पोलिसांच्या नाकावर टिचुन पळुन जातात यापेक्षा पोलीस निरीक्षकाच्या अकार्यक्षमतेचे उदा. काय असु शकते. खरंच संगमनेर शहरात प्रॉपर पोलिसिंग होतेय का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजु अनाजी गोडे (पोलीस हवालदार), राजु गंगाधर मेंगाळ (पोलीस कॉन्स्टेबल), सुषमा अशोक भांगरे (पोलीस कॉन्स्टेबल) अशी निलंबित कर्मचार्यांची नावे आहेत.

खरंतर, पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी तीन पोलिसांना तत्काळ निलंबीत केले. मात्र, पोलीस निरीक्षकांना पाठीशी का घातले.? जेव्हा राहुरीतले कैदी कारागृहातुन पळाले तेव्हा तात्काळ पोलीस निरीक्षक इंगळे यांना मुख्यालयात जमा केले. तो नियम संगमनेरला का नाही? लाचलुचपत कारवाई झाली तर इंचार्जला कंट्रोल जमा करतात इथे संगमनेरात पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या पथकाने पकडुन देखील पोलीस निरीक्षक कंट्रोलजमा नाही? इतकेच काय.! जेव्हा पासुन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा चार्ज घेतला तेव्हापासून ते वादग्रस्त राहिले. त्यांच्या कार्यकाळात सर्वात मोठी हिंदु मुस्लिम दंगल झाली. डॉ. सावंत यांच्या येथे मोठी चोरी झाली. एटीएम  फोडले, घरफोडी, चैनस्नॅचिंग, मोटारसायकल, मोबाईल हे चोरीचे सत्र सुरूच आहे. तरी पोलीस निरीक्षकांना पाठीशी घातले गेले. त्यामुळे, पोलीस निरीक्षकांना कोणाचा राजकीय आशिर्वाद आहे.? असा प्रश्न संगमनेर शहरातील सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे. जर येणाऱ्या काळात यांची बदली झाली नाही. तर, जसे देशमुख यांच्या बदलीसाठी दिवसरात्र आंदोलन केले होते. तसे आंदोलन छेडले जाईल अशी प्रतिक्रिया सामाजिक संघटनांनी दिली आहे.

          दरम्यान, बुधवार दि. 8 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटेच्या सुमारास चार कैदी जेलचे गज कापून पळाले. ते कारागृहात असतानाच त्यांनी "ओला ऍप" वरून गाडी बुक केली. मात्र, ती गाडी संगमनेर शहरातील वारंवार रेकॉर्ड असणारे आरोपी अलताफ उर्फ लाला शेख व मोहनलाल भाटी हे चालक म्हणुन पुण्यात चालवत होते. ते दिवसाआड गाडी चालवून पुण्यात आपली गुजरान करत होते. त्यांचा फोनद्वारे नेहमी संपर्क कारागृहातील कैद्यांसोबत होतं. त्यामुळे, त्यांनी पळुन जाण्याचा प्लॅन बनविला. ज्या दिवशी पळुन जाण्याचा प्लॅन कारागृहातुन झाला त्या दिवशी नेमकी मोहनलाल भाटी याचा गाडी चालवण्याचा दिवस होता. त्याचा पळुन जाण्याचा विरोध होत होता. त्यामुळे, अलताफ उर्फ लाला शेख याने मोहनलाल भाटी याला खर्च करून दारू पाजली. मोहनलाल भाटी याला नशेत ठेवले. आणि थेट संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात अलताफ उर्फ लाला शेख याने गाडी आणली. पहाटे गाडी येताच फोन द्वारे कैद्यांना संपर्क झाला त्यानंतर अनेक दिवसांपासून कुलरचा आधार घेऊन गज कापत असलेले गज काढुन घेतले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा एकाचा ही आवाज आला नाही याचे कारण फक्त गावठी पिस्तुल? कारण, जेव्हा ते चौघे बाहेर आले त्यातील एका तरी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले असते. पण तसे झाले नाही. ते चौघे ही बाहेर आले गाडीत बसले तरी देखील पोलीस काही काळ शांत बसले. कदाचित पोलिसांना पिस्तुलचा धाक दाखवला नसेल हे कशावरून? की याला मिलिजुली असे म्हणून अनेकांनी वर्दीकडे बोट केले. अर्थात जे खुन करून जेलमध्ये जाऊ शकतात तर ते काय-काय करू शकता हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे, पोलिसांनी देखील निमूटपणे पाहत राहणे पसंत केले.

           दरम्यान, जेव्हा चारही आरोपी गाडीत बसले तेव्हा मोहन भाटिया हा खडबडून उठला. मात्र, त्याला जेलमधून आलेल्या आरोपीने पिस्तुलचा धाक दाखवला तेव्हा तो देखील शांत बसला. या चौघांपैकी एक आरोपी रोशन उर्फ थापा ददेल हा नेपाळचा असल्याने आपल्याला पळुन जाण्यासाठी ही जागा सेफ असेल. त्यामुळे, ते नेपाळचा मार्ग शोधत गाडीत बसुन पळाले. जेव्हा त्यांची गाडी जीपीएस ने ट्रॅक होती हे कळाले तेव्हा त्यांनी ती जीपीएस गाडीची वायर कट करण्यासाठी गाडी थांबवली. त्यांनी ती वायर कट करताना त्यांच्याकडून दुसरी वायर कट झाली आणि गाडी धुळ्यात बंद पडली. त्यानंतर, ते चालू गाडीने जळगाव जामनेरला पोहचले हे तालुका पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला समजले. या पोलिसाने नगर स्थानिक गुन्हे शाखेला कळवले. त्यानंतर ते एका शेतात अंघोळ करताना सापडले. त्यांना सापळा रचुन नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले. त्यानंतर एक एक उलगडा बाहेर येऊ लागला. नेहमी रेकॉर्डवरील आरोपी असलेले कलीम अकबर पठाण याने काही साहित्य पुरवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तर सलीम अकबर पठाण याने  सिम व मोबाईल कारागृहातील कैदी रोशन थापा ददेल याला पुरवले. हे निष्पन्न होऊन सुध्दा तो अद्याप फरार आहे. तर प्रथमेश राऊत व हलीम अकबर पठाण हे आरोपींच्या फोनद्वारे संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. आता हा सर्व सावळा गोंधळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यालगत असणाऱ्या कारागृहात सुरू होता. 

        दरम्यान, संगमनेर शहर हद्दीत आजपर्यंत पिस्तुल वरील कारवाई झाली नाही आणि कारागृहातील कैदी पिस्तुल बाळगत असतील तर किती भोंगळा कारभार चालतो हे दिसुन येत आहे. कारागृहातील कैद्यांचे रेकॉर्डवरील आरोपीबरोबर कित्येक महिन्यापासून कॉल डिटेल मिळतात मग ही व्ही.व्ही.आयपी सुविधा जेल मधील एखाद्या आमदार खासदाराला नसेल इतकी सुविधा संगमनेर कारागृहातील कैद्यांना मिळाली तरी कशी. त्यामुळे, संगमनेरचे युपी, बिहार होण्यापासून वाचवा असा सुर जनतेतून येऊ लागला आहे. पोलीस निरीक्षक मथुरे यांना नाईट ड्युटी असताना हा सर्व प्रकार घडतो तरी कसा? कर्मचाऱ्यांच्या चौकश्या होतात मग अधिकाऱ्यांच्या का नाही.? खरंतर, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची संगमनेर शहर पोलीस ठाण्याला वर्णी लागली तेव्हापासून एकही दमदार कामगिरी नाही. संगमनेर शहरात गुटख्याच्या रेड आयजीचे पथक करते तर वेश्या व्यवसायावर शिर्डी डेप्युटी छापे टाकतात. जुगारीवर स्थानिक गुन्हे शाखा कारवाई करते अन शहर पोलीस ठाण्यात "हरिश्चंद्राचा" शुद्ध कारभार चालतोय का? याची चौकशी झाली पाहिजे. दरम्यान, जलजीवन मिशनचे लाखो रुपयांचे चोरीला गेलेल्या पाईपचा शोध स्थानिक गुन्हे शाखेने केला. काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या सोन्याचा शोध पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने लावला. मग संगमनेर शहर पोलीस ठाणे करते तरी काय? टपरीत गुटखा, जुगार, मटका हे सर्व अवैधधंदे बोकाळले. हायप्रोफाईल गुन्हे घडतच आहे. संगमनेरातील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले मांस आणि गांजा यासह नको-नको ते कारभार अगदी खुलेआम चालतात. मात्र, पोलीस काय करतात.? तर, "अर्थ"पूर्ण तडजोडी करून "मलिदा गोळा" करण्यात आणि नेत्यांच्या उटारेटा करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे, संगमनेर शहराला बेजबाबदार अधिकारी नको खमका अधिकारी द्या अन्यथा अंदोलन छेडू आशा प्रतिक्रिया उमटत आहे.

भागक्रमश :