अखेर अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय मंजूर, ६७ कोटींचा प्लॅन, ३७ कोटी मंजूर, आता लक्ष एमआयडीसी.!
सार्वभौम (अकोले) :-
गेल्या कित्तेक वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालयाची गाजरं या तालुक्याला दाखविण्यात आले आणि त्यावर कोणी आमदार झाले तर कोणी मंत्री. येथे राजरोस गोर गरिबांचे मडे पडले, पण आरोग्याच्या सुविधा झाल्या नाही. इतकेच काय.! नेत्यांची मुलं ऑक्सिजनवाचून तडफडून देवाघरी गेली. पण, त्यांना अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय असावे, त्यात अत्याधुनिक सेवा सुविधा असाव्या असे वाटले नाही. पण, इथे एक डॉक्टर आमदार झाला आणि त्यांनी चार वर्षे मंत्रालयाच्या पायर्या झिजवून आज व्हेंटीलेटरवर खितपत पडलेल्या अकोले तालुक्याला संजिवनी दिली आहे. होय.! गेली ४५ वर्षे प्रस्ताव सोडा, साधा एक कागदही नसताना डॉ. किरण लहामटे यांनी नव्याने प्रस्ताव केला आणि आज ६७ कोटी रुपयांचा प्लॅन असणारे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय मंजूर करुन आणले आहे. त्यातील ३७ कोटी रुपये आत्ता मंजूर झाले असून येणार्या काळात पुढील प्रक्रिया होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे सह सचिव अशोक अत्राम यांनी आदेशात प्रसिद्ध केले आहे.
अकोले तालुक्यात यापुर्वी फक्त ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय होते. त्यामुळे, गेली कित्तेक वर्षे अकोले तालुक्यातील जनता आरोेग्याच्या समस्यांना तोंड देत होती. त्यामुळे, डॉ. किरण लहामटे यांनी २०१९ च्या निवडणुकीत उप जिल्हा रुग्णालयाचा शब्द दिला होता. त्याची पुर्ती त्यांनी आज केली आहे. आता यावर अनेकजण श्रेय्यवाद उभा करतील. पण, या जनतेला माहित आहे. की, आमदार असताना मंत्रालयात जाऊन जे करता आले नाही ते आता घरी बसून होऊ शकते का? याचे आत्मचिंतन श्रेय घेणार्या नेत्यांनी केले पाहिजे. उगच बालिश आणि पोअर शो करुन कार्यकर्ते उताविळ होत असतील तर नेत्यांनी त्यांना समजून सांगितले पाहिजे असे मत तालुक्यातील सुज्ञ लोक व्यक्त करीत आहेत. मात्र, गेल्या ४० वर्षात शिक्षण, आरोग्य, रस्ते, रोजगार यांकडे जे दुर्लक्ष झाले होते. त्याची भर आता निघत असल्याने तालुक्यातील सामान्य जनता समाधानी दिसून येत आहे.
काय मिळणार उपजिल्हा रुग्णालयात.!
सोनोग्राफी, भुलतज्ञ, एमडी मेडिसिन, एक सर्जन, एक स्त्रीरोगतज्ञ, १५ मेडिलक ऑफिसर, शंकर कर्मचारी, आयसीयु कक्ष, स्केक बाईट कक्ष, कोणतीही सर्जरी होणार, महात्मा फुले योजना लागु होणार, शंभर खाटांची व्यवस्था, यांसह अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तर आता फक्त ३० खाटा, १० कर्मचारी, १ रूग्णवाहिका, १ डॉक्टर फक्त यावर सध्या सरकारी दवाखाना सुरु आहे. त्यामुळे, उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर अकोले तालुक्यातील आरोग्याची सुविधा बर्यापैकी सुटणार आहे. यासाठी सध्याची बिल्डींग पाडून त्याचे निर्लेखन केले जाईल आणि नव्याने बिल्डिंग उभारली जाईल. त्यासाठी पहिला हाप्ता म्हणून १० कोटी रुपये वर्ग केले जाणार आहेत. तर पहिल्या टप्प्यात ३७ कोटी ८५.११ लक्ष रुपये दिले जाणार आहेत. हा प्रोजेक्ट ६७ कोटींचा आहे. ही दोन मजली इमारत असेल, ७३२६.४८ चौरस मिटरचे बांधकाम असून त्याचा दर २८ हजार असणार आहे. हा प्रस्ताव २०२२-२३ मधील असेल, त्यासाठी सर्व मंजुर्या घेणे बंधनकारक असेल, या कामाचे तुकडे न पाडता निविदा एकसंघ होणार आहे, यात ऑक्सिजन पाईपलाईन, एअर कंडीशनर जागा, दिव्यांगांना सुविधा असणार आहेत.
म्हणून सुशिक्षित आमदार हवा.!
डॉ. किरण लहामटे हे स्वत: डॉक्टर असल्यामुळे त्यांना येथील आरोग्य, शिक्षण आणि मुलभूत सुविधांची जाणीव आहे. शिक्षण आणि वाचन किती गरजेचे आहे याचे भान असल्यामुळे, कोट्यावधी रुपये शाळेंना आणि लाखो रुपयांची वाचनालये त्यांनी उभारली आहेत. (उदा. गणोरे) इतकेच काय.! अकोले तालुक्यातील ७० टक्के रस्ते, बाजारतळ, स्मारक, बस स्थानक, पुल, पाण्याचे नियोजन अशा अनेक सुविधा त्यांच्या काळात झाल्या आहेत. विशेष म्हणजे २०१९ ते आमदार झाले आणि नंतर दिड वर्षे कोरोनाचा काळ गेला. त्यानंतर एक वर्षे विरोधी बाकावर बसण्यात गेला आणि जे काही दिड दोन वर्षे त्यांना कामासाठी मिळाली. त्यात अब्जावधी रुपये त्यांनी तालुक्यासाठी आणले. त्यामुळे, ४० वर्षाच्या तुलनेत ४ वर्षे ही फार विकासात्मक आहेत यात तिळमात्र शंका नाही. म्हणून एक सुशिक्षित आमदार काय करु शकतो याचे हे उत्तम उदा. आहे.
४० वर्षाची तुलना ४ वर्षात.!
मला आमदार म्हणून आत्तापर्यंत जे चार वर्षे मिळाले त्यात मी ४० वर्षाची तुलना करु शकतो इतके काम मी केले आहे. कोरोना काळ आणि विरोधात असताना निधी आणणे शक्य झाले नाही. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत गेल्यानंतर दोनशे कोटीच्या जवळपास कामे अकोल्यात आणली आहेत. ज्यांना काविळ आहे ते लोक सोडून तालुक्यातील भोळी भाबडी जनता विकास अनुभवत आहे. गेली ४० वर्षे तालुक्यात फक्त राजकारण चालले होते. हा बॅकलॉक भरुन काढणे माझ्यासाठी फार मोठे आव्हान होते. तो भरुन काढण्याचा प्रयत्न मी ७० ते ८० टक्के अल्पकाळात केला आहे. अकोल्यात उप-जिल्हा रुग्णालयाचा साधा प्रस्ताव देखील ४० वर्षात कोणी दाखल केला नव्हता. मी सर्व नव्याने सादर करुन त्याला मंजुरी आणली आहे. त्यात अजित दादांचे फार मोठे योगदान आहे. तालुक्यातील रस्ते, पिंपारकणे पुल, कोतुळ पुल, बाजारतळ, बस स्थानक, पाण्याचे नियोजन, लाईट, आरोग्य अशा अनेक सुविधा मी अगदी प्रतिकुल परिस्थितीत निर्माण करुन देत आहे. येणार्या काळात देखील याच मायबाप जनतेच्या हाताला काम देण्यासाठी अकोले तालुक्यात मी लवकरच एमआयडीसी आणणार आहे.
- डॉ. किरण लहामटे
(विधानसभा सदस्य, अकोले)