राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्वकर्तृत्वाने उंची गाठणारा युवा शिलेदार गौरव डोंगरे पा., पठारावर विकासाचा सुर्योदय होतोय.!
सार्वभौम विशेष :-
एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील सुस्वभावी व्यक्तीचा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयात स्वतःचा व्यवसाय स्थिरस्थावर करीत गौरव डोंगरे यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच भविष्यातील नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. वडील सेवा निवृत्त अभियंता मा. वसंत डोंगरे साहेब यांच्या समृद्ध स्वभावाचा आणि दानशूरतेचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी स्वतः लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची जिद्द गौरव याने वेळोवेळी दाखवली. मित्र परिवार किंवा कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवणही त्याला आपल्या आईच्या आणि वडिलांच्या कुटुंबांकडून मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेत आपल्या सार्वजनिक जीवनात सतत सक्रिय राहून आणि विशेषतः कितीही प्रतिथयश व्यावसायिक होऊनही आपल्या ग्रामीण भागातील नागरिकांच्यात उठबस करणारा पठार भागातील मातीचा अस्सल चेहरा म्हणून गौरव डोंगरे यांनी नाव कमावले आहे. म्हणतात ना.!
किसी मक्सद के लिए खडे हो तो,
एक पेड की तरह
गिरे भी तो बीज के जैसे..
ताकि दुबारा उगकर
उसी मक्सद के लिए जंग कर सके..!!
ही शायरी गौरवच्या कर्तुत्व आणि व्यक्तीमत्वला तंतोतंत जुळते. शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रस्थानाचा काळ हा तसा मुलांना घडवणारा आणि बिघडवणारा देखिल असतो, नेमक्या याच काळात गौरवने आपले भविष्य स्वतःच रेखाटले! कॉलेजला गेल्यावर आपल्या आवडत्या नेत्याच्या संपर्कात येऊन त्याने विद्यार्थी काँग्रेस मार्फत राजकीय जीवनात उडी घेतली. सोबतीला असणारे साथीदार - सहकारी हे तसे अनुभवी व वयाने मोठे तरीही सुस्वभाव, सौम्य संवाद आणि अल्पावधीतला अफाट जनसंपर्क गौरवला विद्यार्थी काँग्रेसच्या थेट तालुकाअध्यक्ष पदापर्यंत घेऊन गेला. आ. सत्यजित दादा तांबे यांच्या मित्र परिवारासोबत जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमात हिरीरीने भाग घेणाऱ्या गौरवला कुशल संघटक व उत्तम नियोजन करणारा व्यवस्थापक म्हणून देखिल जबाबदाऱ्या मिळू लागल्या. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संवाद मेळावे, करिअर मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात त्यांनी केलेली सुरुवात, परीक्षा फि वाढी विरोधात आणि एसटी बसेस संदर्भात विद्यार्थी समस्या आंदोलने तसेच विविध क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमाचे गौरवने केलेले आयोजन हे त्याच्यातील सुप्तपणे दडलेल्या एका नेतृत्वाचाच एक भाग आहे.
व्यावसायिक क्षेत्रात राजकीय गणितं न आणता आपला बांधकाम व्यवसाय संपूर्णतः व्यवहारिक आणि उत्तम दर्जाचे उत्पादन व सेवा देणारे असावे ह्याकडे त्याचा नेहमीच कौल राहिला. संगमनेर शहर व तालुक्यासह नगर जिल्ह्यात व्यवसाय विस्तारत त्याने एवढ्या कमी वयात अनेक ज्येष्ठ व यशस्वी बांधकाम व्यावसायिकांच्या यादीत स्थान मिळवले, ते केवळ मेहनत, परिश्रम आणि कामाप्रति असलेल्या आस्थेने. त्याच्याकडे असलेली व्यापक दृष्टी, झोकून देऊन काम करण्याची त्याची पद्धत आणि सदा समाधानी वृत्ती यामुळे तो व्यावसायिक - सार्वजनिक जीवनात यशस्वी होतो आहे. मा.बाळासाहेब थोरात साहेब व आमदार सत्यजित दादा तांबे यांच्यावर असलेली निष्ठा आणि पठार भागाच्या उन्नती विषयी उराशी बाळगलेले स्वप्न गौरवच्या राजकीय सामाजिक धोरणात्मक उदाहरण आहे.
राजकीय जीवनात जनसंपर्क, सातत्य, वचनबद्धता पाळायची.. लोकांना टाळायचे नाही.. गावाकडे असल्यावर गाडीच्या काचा लावून न घेता येणाऱ्या जाणाऱ्याशी संवाद साधायचा एव्हढच नाही तर अर्ध्या रात्रीही कोणाचा फोन आला तरी मदतीकरिता उभं राहायचं हे सर्व गौरवने पाळलं. एक उभरते नेतृत्व, उच्चशिक्षित- स्वावलंबी, स्वाभिमानी आणि स्वयंरोजगार या गौरवच्या जमेच्या बाजू. हे सांगणं गरजेचंय कारण आजकाल स्वतःच्या समृद्धतेच्या चौकटितून बाहेर पडून लोकांसाठी काही करायला मिळावे यासाठी कोणि फारसं पुढे येत नाही. आणि आज त्याच जीवावर संगमनेरच्या पठारभागावर स्मार्ट व्हिलेजचे स्वप्न उराशी बाळगलेला नवा सूर्योदय होतोय कि काय.! याची आस आता गौरव डोंगरे यांच्या मित्र परिवारात आणि शुभचिंतकांना लागलेली आहे. नवे क्षितिज नव्या कक्षा रुंदावत नवं सूर्योदयाची वाट पाहत आहेत. प्रिय मित्र गौरव, शुभेच्छा दोस्ता.!
- अमेय जोशी
(सिव्हील इंजिनिअर व गव्हर्मेंट कॅांट्रॅक्टर)