क्षमा करा, मी येऊ शकलो नाही, मला समजून घ्याल.! शरद पवारांनी अकोलेकरांची माफी मागितली.! पण, अमित भांगरेना प्रचंड मतांनी विजयी करा.!
सार्वभौम (अकोले)-
गेल्या तीन महिन्यांपुर्वी मी अकोले तालुक्यात आलो होतो, माझे प्रचंड उत्सहात तुम्ही स्वागत केले. त्याचा मला मनस्वी आनंद आहे. अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे त्यामुळे, तेथे गेल्या दोन वर्षापुर्वी जे झाले ते अकोले तालुक्यातील मतदार कधीच स्विकारणार नाही. अकोले तालुक्यात माझ्यावर प्रेम करणारी फार मोठी शेतकरी, व्यापारी, आदिवासी आणि आंबेडकरवादी विचारांची मानसे आहेत. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी सर्वांना विनंतीपुर्वक सांगु इच्छितो. की, निवडणुकीच्या काळात संपुर्ण महाराष्ट्रात जायचे होते. त्यामुळे, मला अकोले तालुक्यात येणे शक्य झाले नाही. मला खात्री आहे. की, हा तालुका माझे कुटुंब आहे. त्यामुळे, मला समजून घेतील. तरी उद्यावर निवडणुक येऊन ठेपली आहे. तरी अमित भांगरे यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. अमितला मत दिले ते मला दिल्यासारखे आहे. येणार्या काळात सर्वात जास्त निधी मी अकोले तालुक्याला देईल असे अश्वासन शरद पवार यांनी मतदारांना केले आहे.
एकदा तरी संधी दिली पाहिजे.!
गेल्या ७५ वर्षापासून भांगरे कुटुंब हे आदिवासी बांधवांची सेवा करीत आहेत. मा. आ. स्व. गोपाळराव भांगरे (१९५२), मा. आ. स्व. यशवंतराव भांगरे (१९६२, १९७२, १९७७), स्व. राजाराम भांगरे (१९८५), स्व. अशोकराव भांगरे (२०२३) तर आता सौ. सुनिताताई भांगरे आणि अमित भांगरे हे देखील आदिवासी बांधवांची सेवा करीत आहे. म्हणजे किमान ७५ वर्षाचा इतिहास या कुटुंबाचा आहे. १९८० पासून भांगरे कुटुंब आमदारकीसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांना संधी मिळत नव्हती. माझी अकोलेकरांना विनंती आहे. की, अनेक तप पुर्ण झाल्यानंतर आता तरी भांगरे कुटुंबाला एकदा संधी मिळाली पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी अमित भांगरे यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे शरद पवार म्हणाले.
पाच वर्षाचा अनुभव अत्यंत निराशाजनक.!
अकोले तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने फार मोठा आहे. तेथे काही जंगल क्षेत्र आहे. त्यामुळे, तेथील लोकप्रतिनिधी हा सर्वाना समजून घेणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा असायला हवा. मात्र, दुर्दैवाने गेेल्या पाच वर्षापुर्वी मीच तेथे बदल घडविण्यासाठी सांगितले होते. मात्र, पाच वर्षाचा अनुभव अत्यंत निराशाजनक दिसून आला. स्व. यशवंतराव भांगरे यांनी अकोले ऐज्युकेशन सोसायटी, अकोले तालुक्यातील दुधसंघ, अगस्ति कारखाना अशा अनेक गोष्टी त्यांच्या काळात झाल्या आहेत. त्यास दादासाहेब रुपवते यांचे देखील योगदान आहे. त्यानंतर अकोले तालुक्यात विशेष काही विकास झाला नाही. मात्र, यशवंतराव भांगरे यांच्या घराण्यातून अमित भांगरे हा विकासाचा बॅकलॉक काढेल अशी माझी खात्री आहे. त्याची मी जाणिवपुर्वक व विचारपुर्वक निवड केली आहे. त्यामुळे, त्याला प्रचंड मतांना आपण विजयी करुन विधानसभेत पाठवावे ही विनंती.
अंत:करणापासून विनंती करतो.!
अकोले तालुक्याचे व्हिजन अमित भांगरे यांच्याकडे आहे. तो तालुक्याला एक वेगळी ओळख निर्माण करुन देईल. यापुर्वी आपण पाहिले आहे. अनेकांनी वेळप्रसंगी पक्षबदल केला आहे. त्यामुळे, आता दिर्घकाळ टिकणारे नेतृत्व तालुक्याला देणे आणि तालुक्याचा विकास करणे, शेतकर्यांचे प्रश्न सोडविणे, तरुणांना रोजगार, आरोग्य, शिक्षण, पर्यटन,महिला सबलिकरण अशा अनेक गोष्टींचे व्हिजन अमित भांगरे या तरुणाकडे आहे. मी स्वत: च्याची पात्रता तपासली आहे. त्यामुळे, मी अंत:करणापासून विनंती करतो.! अकोले तालुक्याच्या विकासासाठी अमित भांगरे या उमेदवारास निवडून द्या असे शरद पवार म्हणाले.