४२ वर्षाच्या व्यक्तीचा १९ वर्षीय विद्यार्थीनीला प्रपोज.! तो ग्रामपंचायत सदस्य आणि मनसेचा पदाधिकारी.! गुन्हा दाखल, तो पसार.!
सार्वभौम (अकोले) :-
मला तु फार आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करेल, तु माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही. अन्यथा मी आत्महत्या करेल अशा प्रकारच्या धमक्या देत एका विवाहीत व्यक्तीने कॉलेजच्या विद्याथींनीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही घटना दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हिवरगाव आंबरे येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय बाळासाहेब सहाणे (वय ४२, रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले) असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे सहाणे हा ग्रामपंचायत सदस्य असून तो मनसेचा पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, दोन जबाबदार पदावर असणार्या व्यक्तीने असे प्रकार केल्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, हिवरगाव आंबरे परिसरातील एक १९ वर्षीय विद्यार्थीनी ही संगमनेर येथील एका नामांकीत कॉलेजमध्ये शिक्षण घेते आहे. रोज घरी अल्यानंतर घरची कामे करुन अभ्यास करणे हा तिचा नित्याचा उपक्रम होता. मात्र, यात विघ्ने होते ते म्हणजे दत्तात्रय सहाणे याचे. पीडित मुलगी ही तिच्या जनावरांच्या गोठ्यात गेली. की, दत्ता हा तेथे नेहमी अवतरत होता. मात्र, इतका वयस्क माणूस आल्या बापाच्या वयाचा असल्यामुळे त्याचे येणे-जाणे हे मुलीने फारसे मनावर घेतले नाही.
दरम्यान, सहाणे याचे चलिंत्र फार काही चांगले दिसत नव्हते. एकदा तो गोठ्यात आला आणि थेट म्हणाला. की, तु मला खुप आवडते. तेव्हा पीडित मुलगी घाबरुन गेली. तिने आरोपीचा हेतू ओळखला आणि त्या क्षणी खडे बोल सुनावले. मात्र, त्यानंतर देखील आरोपीने त्याची लगट सोडली नाही. तो नेहमी गोठ्यात येऊन पीडित तरुणीची छेडछाड काढण्याचा प्रयत्न करत होता. तु माझ्याशी बोलत जा, मी तुझ्याशी लग्न करेल, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून दत्ताकडून कायम पाठलाग होत होता. मात्र, घरी सांगावे तर वाद होतील किंवा आपले शिक्षण बंद होईल म्हणून पीडित मुलगी हे सर्व निमुटपणे सहन करत होती.
दरम्यानच्या काळात पीडित मुलीच्या एका भावाची माळ झाली होती. तेव्हा हे जोडपं देव दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी पीडित मुलगी देखील सोबत होती. दत्ता हा त्यांच्या मागेमागे गेला आणि पीडित मुलीसोबत त्याने देवाच्या परिसरात फोटे देखील काढले. त्यानंतर जेव्हा पीडित मुलगी गोठ्यात स्वच्छता करण्यासाठी गेली. तेव्हा दत्ता तेथे आला आणि म्हणाला. की, आता तुझे फोटो माझ्याकडे आहे. तु माझ्याशी बोलली नाही तर तुझे फोटो मी सोशल मीडियात व्हायरल करेल अशी धमकी दिली. मात्र, पीडित मुलीने त्यास कोणतीही भिक घातली नाही. फोटे हे त्याने काढले, ते ही देवाच्या ठिकाणी आणि वरुन तेच व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यामुळे, पीडित मुलीने त्याच्या धमक्या थेट आपल्या घरच्यांना सांगितल्या.
दरम्यान, गाव, पाहुणे, एकोपा म्हणून यावर एक बैठक बसली. त्यात दत्ता सहाणे यास समजून सांगण्यात आले. त्याने देखील माफी मागत जे काही झाले ते विसरुन पुन्हा त्रास देणार नाही असा शब्द दिला. त्यानंतर मात्र, थोडे दिवस सर्व काही ठिक झाले होते. मात्र, दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी ही गोठ्यात शेण उचलण्यासाठी गेली होती. तेव्हा तेथे दत्ता आला आणि तो म्हणला. की, मी तुझी त्र्यंबकेश्वर येथे शांती घातली आहे. त्याचा तेथून मी प्रसाद आणला आहे. तो फक्त तू खा. यानंतर मी तुला त्रास देणार नाही. एकापरचा प्रसाद खावून याच्यापासून मुक्ती मिळवू या भावनेने पीडित मुलीने प्रसादासाठी हात पुढे केला. मात्र, तेथे पुन्हा त्याचे प्रेम उफाळुन आले.
पीडित मुलीने हात पुढे करताच दत्ताने तिचा हात पकडला आणि म्हणला. की, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशी लग्न कर असे बोलुन तो पीडित तरुणीशी अंगलट करु लागला. तिची ओढणी ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करु लागला. तु जर माझ्याशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेल, तुझे कोठेही लग्न होऊ देणार नाही, झाले तरी तुला बाहेरुन त्रास देईल, नाहीतर तुला ठार मारुन टाकेल. तेव्हा पीडित मुलीने त्यास पुन्हाा सुनावले. की, तु मला त्रास देऊ नको. अन्यथा मी पुन्हा घरी सांगेल. असे बोलताच तो तेथून निघुन गेला. त्यानंतर पीडित मुलीने थेट घर गाठले आणि घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी अकोले पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस निरीक्षक विजय करे यांची भेट घेत सविस्तर प्रकार कथन केला. त्यानंतर पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार दत्तात्रय बाळासाहेब सहाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.