इयत्ता १० वीच्या मुलीशी अश्‍लिल चाळे.! फोटो व्हायरल करण्याची धमकी, बहिनीने मैत्रीण पटवून दिली.!


सार्वभौम (संगमनेर) :-

मैत्रीणीच्या भावाने पीडित विद्यार्थीनीसोबत फोटो काढून त्याचा गौरफायदा घेत इयत्ता १० वीच्या वर्गात शिकणार्‍या मुलीचा विनयभंग केला. तिला बळजबरी एका खोलीत नेवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना दि. २७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ढोलेवाडी परिसरात घडली. संबंधित प्रकार हा पीडित मुलीस आवडला नाही. त्यामुळे तिने घडलेली घटना भावास कथन केली. त्यानंतर यांनी आरोपीस समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, झालेला अन्याय सहन न करता त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार मंडलिक (रा. गंगामाईघाट, ता. संगमनेर) व दिपक खरात (रा. ढोलेवाडी. ता. संगमनेर) अशा दोघांना आरोपी करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, पीडित मुलगी ही संगमनेर शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेते. तिच्या सोबत तिची एक मैत्रीण कायम राहते, तीने एक भाऊ मानलेला आहे. त्या भावाची ओळख मैत्रीणीने पीडित मुलीसोबत करुन दिली होती. या तिघांनी मिळून एक फोटो काढला आणि त्यानंतर या दोघांनी एक फोटो काढला. तो ओमकार याने चांगला जपून ठेवला. नंतर जेव्हा-जेव्हा पीडित मुलगी शाळेत जात होती. तेव्हा-तेव्हा ओमकार हा तिच्या मागेमागे जात होता.

दरम्यान, तीन ते चार दिवसांनी ठरल्याप्रमाणे तो तिच्या शाळेकडे गेला होता. शाळा सुटल्यानंतर ती बाहेर पडली आणि तिच्या मागेमागे हा निघाला. तिला एका ठिकाणी गाठवून तो म्हणाला. की, तुझे आणि माझे एकत्र फोटो माझ्याकडे आहे. त्यामुळे, तु आता मी जो फोन नंबर देतो आहे. त्यावर फोन करत जा. अन्यथा तु फोन केला नाही. तर, हे फोटो मी सोशल मीडियात किंवा तुझ्या आई वडिलांना पाठवून देईल. हे सर्व ऐकल्यानंतर पीडित मुलगी घाबरून गेली. जर हे फोटो घरच्यांनी पाहिले तर हे माझे शिक्षण बंद करुन टाकतील. म्हणून मुलीने त्याने दिलेल्या फोनवर फोन करणे सुरू केले.

दरम्यान, दि. २७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी सायकलहून शाळेत जात होती. तेव्हा ओमकार याचा मित्र दिपक खरात याने तिला आडविले. तो म्हणला. की, तुला ओमकारने बोलविले आहे. तेव्हा पीडित मुलगी त्याच्या गाडीवर बसली आणि थेट ओमकारच्या घरी गेली. तेथे गेल्यानंतर ओमकार याने तिला एका खोलीत नेले आणि तेथे त्याने या मुलीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पीडित मुलीने त्यास नकार दिला. याच वेळी ओमकार याने तिचे काही फोटो देखील काढले आणि या विद्यार्थीनिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केेले.

संबंधित घरात जो काही प्रकार घडला. त्यानंतर पीडित मुलगी ही घाबरुन गेली होती. तिने या दोघांना विनंती केली. की, मला येथून बाहेर घेऊन चला. त्यानंतर आरोपी व त्याचा मित्र यांनी पीडित मुलीस एका रोडवर आणून सोडले. तेव्हा मुलीने शाळेत न जाता थेट घर गाठले आणि घडलेला प्रकार तिच्या मावस भावास कथन केला. भावाने तोच प्रकार पीडित मुलीच्या  पालकांना सांगितला. त्यानंतर हे सर्व लोक आरोपींच्या घरी गेले. तेथे सामंजस्याने बैठक बसली. मात्र, आरोेपी यांना समोर आणलेच नाही. खरे काय आणि खोटे काय याचे समाधान न झाल्याने पीडित मुलीच्या पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि ओमकार मंडलिक व दिपक खरात या दोघांवर गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक माळी करीत आहेत.