दोन तरुण ब्युटीपार्ललमध्ये घुसले, आय लव यू म्हणत पप्पी मागितली, महिलेची छेडछाड करुन धुम ठोकली, गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील पठार भागावरील साकुर परिसरात 26 वर्षीय महिलेशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि.14 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. ही महिला ब्युटी पार्लरमध्ये एकटीच काम करत असताना दोन तरुण मेकपच्या वस्तु घेण्याच्या नावाखाली ब्युटी पार्लरमध्ये गेले. तेथे जाऊन 26 वर्षीय महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशी फ्रेंडशीप कर मी तुला लॉजवर घेऊन जाईल. मला एक पप्पी दे असे बोलुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करू लागला. जेव्हा त्याचा गलिच्छ हेतु लक्षात आला तेव्हा महिलेने लगेच आरडाओरडा केला. अचानक आरडाओरड झाल्याने तरुणांनी ब्युटी पार्लर मधुन धुम ठोकली.
दरम्यान जे बोललो त्या बद्दल कोठे वाच्यता केली तर तुला येथे राहुन देणार नाही. हे जर कोणाला सांगितले तर तुझ्या नवऱ्याला संपुन टाकु अशी धमकी देऊन ते बहाद्दर पसार झाले. मात्र, घाबरलेल्या या महिलेने मोठ्या धाडसाने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला आणि 26 वर्षीय पिडीत महिलेने थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले. पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपी तुषार पोपट खेमनर व शिवाजी सयाजी खेमनर दोघे (रा.हिरेवाडी, साकुर, ता. संगमनेर) यांच्याविरुध्द विविध कलमान्वये घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जी. पी. लोंढे करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील दरेवाडी परिसरात एक छोटे कुटुंब आहे. पिडीत 26 वर्षीय महिलेला दोन मुलं आहेत. ती छोटासा ब्युटी पार्लरचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवते. पिडीत 26 वर्षीय महिलेने एक वर्षांपासून साकुर परिसरात लेडीज शॉपीचे दुकान टाकले आहे. तेथेच ब्युटी पार्लरचे मेकपचे देखील दुकान आहे. गुरुवार दि.14 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता पिडीत महिला दुकानावर असताना आरोपी तुषार खेमनर याने पिडीत महिलेला फोन केला. व म्हणाला की, मला मेकपचे वस्तु पाहिजे असे बोलला आणि मी मेकपचे वस्तु घेण्यासाठी दुकानावर येतो असे बोलुन फोन बंद केला. त्यानंतर 15 ते 20 मिनीटांनी आरोपी तुषार खेमनर व त्याचा मित्र शिवाजी खेमनर पिडीत महिलेच्या दुकानात आले. त्यावेळी पिडीत महिला दुकानात एकटीच होती. हे पाहताच त्याची वाईट नजर 26 वर्षीय पीडित महिलेवर पडली होती. आरोपी तुषार खेमनर हा पिडीत महिलेला म्हणाला की, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशी फ्रेंडशिप कर, मी तुला माझ्यासोबत लॉजवर घेऊन जातो असे बोला. त्यावेळी पिडीत महिला म्हणाली की, तु असे काही बोलु नको मी तुझ्या घरच्यांना सांगेल.
दरम्यान, आरोपी तुषार खेमनर पीडित महिलेला म्हणाला की, तु कुठेही तक्रार कर मी घाबरत नाही. तु मला एक किस दे असे बोलुन पिडीत महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी आरोपी तुषार खेमनर व त्याचा मित्र शिवाजी खेमनर हे म्हणाले की, मी जे बोललो त्याबाबत कोठे वाच्चता केली तर तुम्हाला येथे राहुन देणार नाही. तु जर कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या नवऱ्याला संपवुन टाकु अशी धमकी देऊन दुकानातून निघुन गेले. त्यानंतर पिडीत 26 वर्षीय महिला घाबरून गेली होती. तिने त्यादिवशी न सांगता दुसऱ्या दिवशी मोठ्या धाडसाने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर शनिवार दि.16 सप्टेंबर 2023 रोजी पिडीत महिलेने व पतीने घारगाव पोलीस गाठले घडलेला सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीवरून आरोपी तुषार पोपट खेमनर व शिवाजी सयाजी खेमनर दोघे (रा. हिरेवाडी, साकुर, ता. संगमनेर) यांच्यावर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.