साथिदाराच्या मदतीने पत्नीने कापला पतीचा गळा.! प्रेत नदीत फेकले, लव ऍण्ड रिलेशनशिप नडली.! तिला पळुन आणले तिने त्याला संपविले.!

सार्वभौम (संगमनेर) :-

वाट्याने शेती करणार्‍या एका ४१ वर्षीय तरुणाची त्याच्या दुसर्‍या पत्नीने गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसर्‍या पत्नीचा आणखी एक साथिदार देखील यात असण्याची शक्यता असून रात्री एका मंदीराच्या जवळ असणार्‍या खडकावर ही हत्या करण्यात आली आहे. सदर घटना दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास घडली. यात मारुती आबा डामसे (वय ४०, रा. कोपरी, ता. जुन्नर, पुणे) हे मयत झाले असून दिपाली डामसे व अन्य अज्ञात व्यक्तींना यात आरोपी करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, मयत मारुती याचे सन २००९ मध्ये पहिले लग्न झाले होते. मात्र, या दोघांमध्ये फारसे काही जमले नाही. नेहमीचा वाद आणि मतभेद यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०२२ मध्ये मारुती याने दिपाली हिला पळवून आणले होते. तेव्हापासून ते लव ऍण्ड रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही दिवस त्यांच्यात देखील सर्व काही अलबेले सुरू होते. मात्र, कालांतराने यांच्यात देखील वाद होऊ लागले. उपजिविकेसाठी साधन नसल्यामुळे मारुती याने कोपरे गाव सोडले आणि संगमनेर खुर्द येथे येऊन त्याने वाट्याने शेती सुरू केली.

दरम्यान, दिपाली सुद्धा सोबत राहत होती. मात्र, याच दरम्यान दिपालीला एक मित्र देखील जोडी झाला होता. त्याबाबत मारुती यास कल्पना होता. या दोघांमध्ये कायम वाद होऊ लागले होते. त्यामुळे, किरकोळ वाद झाले तरी दिपाली ही माहेरी निघुन जात होती. तिला वाटेत तेव्हा ती यायची आणि वाट्टेल तोवर ती थांबायची. त्यामुळे, यांच्यात अधिक मतभेद आणि मनभेद झाले होत चालले होते. दरम्यानच्या काळात यांनी लग्न देखील केल्याची माहिती पोलिसांंच्या हाती लागली होती. मात्र, दिपालीच्या वागणुकीबाबत मारुती नाराज होता. ती काही दिवसांपुर्वी निमगिरी ता. जुन्नर येथे गावाकडे गेली होती. तर, रक्षाबंधनच्या दरम्यान पुन्हा संगमनेर येथे आली होती.

या दरम्यान, मयत मारुती याचा भाऊ देखील इकडे वाट्याने शेती करण्यासाठी आला होता. तेव्हा दिपाली हिचा मारुतीला फोन आला होता. ती फोनवर म्हणाली मी म्हसोबा मंदिराजवळ आली आहे. तु तेथे ये तेव्हा तो रात्री ८ वाजण्याच्या सुमारात तिकडे एकटाच गेला होता. त्यानंतर रात्री उशिर झाला तरी तो माघारी आला नाही. म्हणून त्याचा भाऊ पांडुरंग डामसे हा मारुतीच्या शोधात निघाला. मात्र, तरी देखील तो मिळून आला नाही. भाऊ त्याच्या मित्रांकडे गेला असेल असे गृहीत धरुन पांडुरंग घरी गेला. दुसरा दिवस उजाडला तरी भाऊ घरी आला नाही म्हणुन यांनी चौकशी केली. त्यानंतर काही लोकांच्या लक्षात आले. की, नदीपात्रात एक प्रेत पडलेले आहे. तेव्हा पोलिसांना खबर दिली आणि प्रेत बाहेर काढले. ते मारुती डामसे याचेच होते.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता असे लक्षात आले. की, घटनास्थळाच्या जवळ एक खडक आहे. तेथे पहिल्यांदा मारुतीचा गळा कापून खुन करण्यात आला. त्यानंतर या दरम्यान मोबाईल देखील काढून घेत तो बंद केला. त्याच वेळी खडकावर रक्ताचे थारोळे पडलेले होते. चपला अस्तव्यस्त पडलेल्या होत्या. त्यामुळे, हा प्रकार दिपाली हिनेच केला हे घरच्यांच्या लक्षात आले होते. आता तिने हा खुन कोणाच्या मदतीने केला. त्याचे मुळ कारण काय होते? ही हत्या करण्यात किती व्यक्ती आहेत, त्यांनी कशा पद्धतीने हा गुन्हा केला आहे. याची सखोल माहिती घेणे चालु आहे. तत्पुर्वी पोलिसांनी पांडुरंग डामसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.