पुन्हा अंगावर लघुशंका.! संगमनेरात दलित कुटुंब भेदरले.! फायटर, चॉपरने वार.! अवैध धंदावाल्यास वर्दीचे अभय.!

सार्वभौम (संगमनेर) :-

     श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे दलित मुलांना मारहाण करुन त्यांच्या अंगावर लघुशंका केल्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा संगमनेर खर्द येथे एका व्यक्तीवर मारहाण करुन त्याच्या अंगावर देखील लघुशंका केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी संबंधित व्यक्तीस चॉपर, रॉड आणि फायटरने अमानुषपणे मारहाण केली आहे. त्याच्या अंगावर सात ठिकाणी वार असून डोक्यास देखील मारहण झाली आहे. मात्र, तरी देखील पोलिसांनी त्याची दखल घेतली नसून एका अवैध धंदा करणार्‍या व्यक्तीच्या पाठीशी पोलीस ठाम उभे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आता राज्यातील काही लोकांनी दखल घेतली असून पोलीस अधिक्षक यांच्याकडे विचारणा करु लागले आहेत. त्यामुळे, संगमनेर पोलिसांची अवैध धंदेवाल्यांशी असणारी सलगी समोर आली असून या घटनेची सखोल चौकशी करुण दोषी पोलिसांवर कारवाई आणि आरोपींच्या विरोधात वाढीव कलम लावून त्यांना अटक करावी अशी मागणी होत आहे. जगन श्रावन राखपसरे (रा. संगमनेर खुर्द) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, जगन हा हमाली करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दि. २ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी जगन परदेशपुरा येथे दारु पिण्यासाठी गेला होता. तेथे मद्यपान केल्यानंतर घरी जात असताना नालकर मळा येथे आरोपी स्वप्नील कवडे व त्याच्यासोबत असणार्‍या दोघांनी त्यास आडविले. जगन याचा चुलत भाऊ याच्या सोबत संतोष याच्या सोबत कवडे याचे भांडण होते. त्यामुळे, त्याचा राग यांनी याच्यावर काढला. तर, तु देखील आम्ही गांजा विकतो अशी टिप पोलिसांना देतो असे म्हणून जगन यास चॉपर, रॉड आणि फायटरने अमानुषपणे मारहाण केली. जेव्हा जगन खाली पडला तेव्हा आरोपी यांनी त्याच्या अंगावर लघुशंका केली असे त्याचे म्हणणे आहे. त्यानंतर ते तिघे तेथून पळुन गेले.

दरम्यान, आता प्रश्‍न पडतो. की, संगमनेरात राजरोस गांजा विकला जातो. जर गांजा किंवा गुटखा आणि तत्सम नशिले पदार्थ यांची माहिती सामान्य मानसांना मिळाली आणि ती जर पोलिसांनी सांगितली. तर, पोलिसांकडून देखील अशी माहिती पुन्हा आरोपीला मिळु शकते. त्यामुळे, पोलिसांवर विश्‍वास ठेवावा कि नाही? असा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे आजकाल संगमनेर हे अवैध धंद्यांचे केंद्रबिंदु होऊ लागले आहे. येथे अल्पवयीन मुली रोजरोस भोगल्या जात आहेत. त्या ही अगदी पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर आणि भर बस स्थानकाच्या परिसरात असणारे हॉटेल आणि लॉजिंग येथे सुद्धा. मात्र, हे सर्व माहित असून देखील ते सांगायचे कोणाला? कारण, वर्दीच जर मलिदा खात असेल तर सांगण्याचे धाडस करावे कसे? खरंतर पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्यासारखे अधिकारी गाई आणि बाई यांच्या संदर्भात फार संवेदनशिल असतात. दुर्दैवाने आपल्याकडे बोलघेवडे अधिकारी फार आणि ज्ञान पाजळणारे फार जास्त झाले आहेत. त्यामुळे, उद्या अवैध धंदे आणि पोक्सोच्या प्रकरणांची माहिती वर्दीला देण्याचा प्रयत्न केला तर कोणाचाही जगन झाल्यास वाईट वाटण्याचे कारण नाही.

खरंतर, हरेगाव येथे देखील केवळ कबुतर चोरल्याच्या संशयाहून त्या तरुणास टांगून मारले होते. तर त्याच्या अंगावर लघुशंका केली होती. येथे देखील प्रकरण काही वेगळे नाही. मात्र, पोलिसांनी जगन राखपसरे यांची फिर्याद फक्त ३२४ वगळता  निव्वळ अदखलपात्र नोंदवून घेतली. त्याच्यावर झालेला हल्ला, त्याला दिलेली धमकी, त्याला केलेली जातीयवाचक शिविगाळ, त्याचा अंगावर केलेली लघुशंका आणि कॉल रेकॉर्डिंग याकडे पोलिसांनी गांभिर्याने पाहिले पाहिजे. विशेष म्हणजे संतोष याने देखील स्वप्नील कवडे याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कडक भुमिका घेतली असती तर पुन्हा त्यांनी शसस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला नसता. मात्र, वर्दी-अवैध धंदे आणि मलिदा हे समिकरण काही नवे नाही. त्यामुळे, त्यांना माहित आहे, पहिली पसंती नेमकी द्यायची कोणाला.! म्हणून तर कवडे सारखा व्यक्ती एखाद्याचा जिव घेण्याची मजल गाठू शकतो. आता जर येणार्‍या काळात राखपसरे यांच्यापैकी कोणाच्या जिवीतास काही झाले तर पोलिसांनी आरोपी करावे अशी मागणी गृहमंत्री यांच्याकडे करणार असल्याची माहिती सामाजिक संघटनांनी दिली आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी पुन्हा सक्तीच्या राजेवर जाण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीस अन्याय देण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा संघटनांनी केली आहे.