मी चुकलो तर पत्रकारांनी माझ्याही विरोधात लिहावं - आ. डॉ. किरण लहामटे
- सुशांत आरोटे
सार्वभौम (संगमनेर) :-
आजकाल लोकशाही धोक्यत असल्याची विधाने अनेकदा होऊ लागले आहेत. त्यासाठी देशातील प्रत्येकाने जागरुन राहिले पाहिजे. त्यात पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांनी देखील याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. मात्र, अनेक माध्यमे ही निर्भिड व निष्पक्षपणे लिखान करताना दिसत नाहीत. त्यास राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ हा अपवाद असल्याचे दिसते आहे. पुरोगामी शब्दाप्रमाणे आपले वागणे-बोलणे आहे. तसेच धर्म आणि जाती पातीपेक्षा लोकशाहीला धरुन तुमची संघटना काम करते आहे याचा आम्हाला अभिमान असल्याचे मत अकोले विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय चर्चासत्र संगमनेर येथे आयोजित केले होते त्यावेळी बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी तर प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याध्याक्ष संतोष जाधव, बाळासाहेब आडांगळे, राज्यसचिव निलेश ठाकरे, संपर्कप्रमुख रफिक सय्यद आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सागर शिंदे उपस्थित होते.
आ. डॉ. लहामटे म्हणले. की, देशात काही लोक अराजकता पसरविण्याचे काम करत आहेत. कधी जात तर कधी धर्माच्या नावाखाली वाद निर्माण करु पाहत आहेत. माझ्या गळ्यात भगवी शॉल असल्यामुळे काही लोक माझ्याकडे वेगवेळ्या दृष्टीने पाहतात. मात्र, हे भागवे कोणाच्या बापाची मालमत्ता नसून ते भगवान गौतम बुद्धांचे चिवर आहे, तेच छत्रपती शिवरायांचा भगवा म्हणुन देखील तुम्ही पाहु शकता. तुम्ही वारकर्यांचा भगवा म्हणून देखील पाहु शकता. त्याकडे जात धर्म म्हणून पाहण्याची गरज नाही. दुर्दैवाने अनेकांनी महापुरुष देखील वाटून घेतले आहेत. ते देखील कोण्या एका समाजाचे किंवा व्यक्तीची मालमत्ता नाही. त्यामुळे, सर्वच महापुरुषांचे विचार अंगिकारले पाहिजे. प्रत्येक महापुरुषांचे विचार देखील समजून घेत त्यावर चळवळी उभ्या केल्या पाहिजे. यावेळी डॉ. किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यात पत्रकार भवन निर्माण करण्याचे आश्वासन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक विजय सुर्यवंशी यांना दिले.
तर, विजय सुर्यवंशी म्हणाले की, आपल्याला लोकशाही अर्थात संविधान टिकवायचे असेल. तर, चौथ्या स्तंभाची भुमिका ही चोखपणे पार पाडावी लागणार आहे. जेव्हा माध्यमे अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवितात. तेव्हा-तेव्हा देशात एक नवी क्रांती झाली आहे. त्यामुळे, येणारा काळ हा वैचारिक तत्वांचा राहणार नसून लोकशाहीला बाधक असणार आहे. म्हणून पुरोगामी विचारांचे संघटन आपल्याला तयार करायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शस्त्राच्या विरुद्ध विचारीक लढाई केली आणि ते विजयी देखील झाले. येणार्या काळात आपल्याला देखील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, शिक्षण, आरोग्य आणि समाज विघातक कृत्यांच्या विरुद्ध वैचारिक पद्धतीने लढायचे आहे. म्हणून पुरोगामी विचारांना खतपाणी घालुन ते अधिकाधिक प्रगल्भ करायचे आहेत.
खरंतर, प्रत्येक पत्रकार हा वैचारिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचा आहे. त्या समस्या आणि पत्रकारांवर होणारा अन्याय याच्या विरुद्ध नेटाने आवाज द्यायचा आहे. देश पातळीपासून ते राज्यापतळीवर पत्रकारांसाठी कायदे आणि त्यांची अंमलबजावणी करायची आहे. पत्रकारांच्या कुटुंबापासून ते घरकुलापर्यंत असणारे प्रश्न मार्गी लावायचे आहेत. पत्रकार हा दुसर्याला चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो. मात्र, स्वत:वरील अन्याय त्याला निमुटपणे सहन करावा लागतो. अशा अनेक अनेक अदृश्य समस्या आहेत. ज्या शासन आणि प्रशासन पातळीवर सोडवायच्या आहेत. म्हणून अशा प्रकारचे चर्चासत्र आणि विचार विनिमय करुन पत्रकारांचे वैचारिक संघटन बांधण्याचे काम केले जात आहे. असे मत विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, बीड, लातुर, ठाणे, रायगड, पालघर, जळगाव, बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यातून पदाधिकारी उपस्थित होते. तर, कार्यक्रमाचे आयोजन उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सहदेव जाधव, ज्योती उगले, संदिप काळे, संतोष फापाळे, डॉ. योगेश फापाळे, नवनाथ गाडेकर, सुदर्शन खंडागळे, किरण पुरी, सुरेश फापाळे, रश्मीताई मारवाडी, वैभव रोहम, स्वाती सुंबे, प्रियंका जाधव, पुजा काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष फापाळे यांनी केले. तर आभार किरण पुरी यांनी मानले.