प्रेम झाले, संबंध झाले, पण लग्न नको म्हणाला, विधवेने ठोकला गुन्हा.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर खुर्द येथे लग्नाचे अमिष दाखवून एका व्यक्तीने विधवा महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. १० वर्षापुर्वी तिचा पती मयत झाला होता. तिला एक मुल देखील होते. तुम्हा दोघांचा चांगल्या पद्धतीने संभाळ करतो असे म्हणून पीडित महिलेच्या असहायतेचा फायदा घेण्यात आला. ही घटना एक वर्षापुर्वी घडली असून आरोपी हा लग्न करत नाही त्यामुळे त्याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती रामा लोखंडे (रा. वैदवाडी, ता. संगमनेर, जि. अ.नगर) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी मारुती लोखंडे यास तात्काळ बेड्या ठोकल्या. त्याला कोर्टापुढे हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, पीडित महिला ही संगमनेर खर्द परिसरातील असून तिचा पती १० वर्षापुर्वी मयत झालेला आहे. या दरम्यान आरोपी मारुती याचे तिच्या घरी येणेजाणे कायम होते. नेहमीचा संपर्क असल्यामुळे त्यांच्यात कायम चर्चा होत होती. गेल्या वर्षात त्यांची मने जुळली आणि दोघांचे एकमेकांवर प्रेम देखील जडले. मात्र, समाज व्यवस्था आडवी येत असल्यामुळे त्यांनी याबाबत कोणतीही भुमिका घेतली नाही. मात्र, दोघांच्या प्रेमाने नैतिकतेच्या सिमा ओलांडल्या आणि दोघांनी एकमेकांच्या संमतीने शरिर संबंध ठेवले.
दरम्यान, दोघांचे प्रेम प्रकरण चार खोलींच्या आत असले तरी पीडित महिलेने त्याला लग्नाची साद घातली. त्यावेळी करु, पाहु असे म्हणत त्याने वरवर शब्द देखील दिला. मारुती हा आपल्या सोबत लग्न करणार म्हटल्यानंतर महिलेने त्यास आपले सर्वस्व देऊन टाकले. पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा देखील होता. त्याचा संभाळ करावा लागेल असे वचन तिने मारुतीकडून घेतले होते. अर्थात भावना आणि प्रेम याच्या आहारी जाऊन त्याने तिला लग्न करुन मुलाचा संभाळ करेल असा शब्द दिला होता. मात्र, जेव्हा हे प्रकरण कुटुंबाच्या कानावर पडले तेव्हा मारुतीच्या घरच्यांकडून विरोध होऊ लागला.
दरम्यान वर्षभरापासून सुरू असलेले हे प्रकरण शांत होते. मात्र, जेव्हा आरोपीने लग्न करण्यास नकार दिला त्यानंतर वादळ उठले. पीडित महिलेने मारुतीला समजुन सांगण्याचा प्रयत्न केला. तर मारुतीने देखील तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरिर सुखासाठी त्याने खोटे अश्वासन देऊन माझा उपभोग घेतला ही भावना पीडितेच्या मनाला बोचत राहीली. तिने गावातीलच फाट्यावर असणार्या आपल्या आई, वडिल आणि भावास घडलेला प्रकार सांगिलता. त्यांनी पीडित महिलेला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर मारुती रामा लोखंडे याच्यावर दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.