बाबो.! दुधगंगा पतसंस्थेत 80 कोटीचा घोटाळा, चेअरमन, मॅनेजरसह 21 जणांवर गुन्हे दाखल, चौघांना अटक, भाऊसाहेब कुटेंसह बड्या नेत्यांचा सामावेश.!

 

- सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) :-

                       संगमनेरातील बहुचर्चित दुधगंगा पतसंस्था घोटाळा आज उघडकीस आला आहे. शेकडो लोक या पतसंस्थेपुढे येऊन टाहो फोडत होते. मात्र, आज दुधगंगा पतसंस्थेचे चेअरमन, मॅनेजर यांच्यासह नातेवाईकांनी 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपये आपल्या घशात घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दि. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2021 दरम्यान कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी लेखा परीक्षक राजेंद्र फकीरा निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी काँग्रेसचे जिल्हापरिषद सदस्य संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दामोदर कुटे (रा.गणपती मळा सुकेवाडी), भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ (रा.संगमनेर), भाऊसाहेब संतु गायकवाड (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), चेतन नागराज बाबा कपाटे (रा.पैठणरोड,संभाजीनगर, औरंगाबाद), दादासाहेब भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), अमोल भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), विमल भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), शकुंतला भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), सोनाली दादासाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), कृष्णराव श्रीपतराव कदम (रा.देवळाली प्रवरा, ता. राहुरी), प्रमिला कृष्णराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), अजित कृष्णराव कदम (रा.देवळाली प्रवरा, ता. राहुरी), संदिप दगडु जरे (रा.भूतकरवाडी सावेडी, ता. नगर), लहानु गणपत कुटे (रा.सुकेवाडी, ता. संगमनेर), उत्तम शंकर लांडगे (रा.वडगाव लांडगा, ता. संगमनेर), उल्हास रावसाहेब थोरात ₹रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), सोमनाथ कारभारी सातपुते (रा. पावबाकी, ता. संगमनेर), अरुण के बुरड (रा. नयनतारा सिडको कॉलनी, नाशिक), अमोल क्षीरसागर (रा.गंगापूर रोड, नाशिक) यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात  लहानु गणपत कुटे, सोमनाथ कारभारी सातपुते, उल्हास रावसाहेब थोरात, अमोल प्रकाश क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजेंद्र निकम हे लेखापाल असुन त्यांच्याकडे दि.1 एप्रिल 2016 सालापासून दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे फेरलेखापरीक्षण करण्याची जबाबदारी शासनाने टाकली होती. संस्थेचे चेअरमन व मॅनेजर यांनी काळेबेरे काम सुरू केले असता त्यांचे लक्षात आले की, येथे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार व अपहार असल्याचे लक्षात येत होते. यात ठेवीदाराने केलेली पावतीची मुदत संपून देखील ती रक्कम ठेवीदारांना न देता बोगस सही करून  रकमा काढण्यात आल्या आहेत. ही रक्कम चेअरमन भाऊसाहेब कुटे, मॅनेजर विठ्ठल गुंजाळ अकाऊंटट भाऊसाहेब गायकवाड यांनी 3 लाख 96 हजार  425 इतकी रक्कम अपहार केली. बोगस मुदत ठेव युनियन बँक ऑफ इंडिया खाते निर्माण करून केलेला अपहार 19 कोटी 26 लाख 90 हजार 368 रुपये इतका तर व्याज नावे करून केलेला रकमेचा अपहार 2 कोटी 72 लाख 21 हजार 968 रुपये इतका संस्थेचे चेरमन भाऊसाहेब कुटे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करत संचालक मंडळाचा विरोध असताना कदम कुटुंबातील सदस्यांना 18 कोटी 30 लाख 42 हजार 901 रुपये दिले. यामध्ये देखील अपहार झाला.

            संस्थेचे चेअरमन येथेच थांबले नाही तर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कायद्याच्या चौकटीत बसत नसताना कर्ज दिले. कॅश क्रीडीट व फिक्स लोन कर्ज वितरित केले हा अपहार तब्बल 12 कोटी 4 लाख 28 हजार 866 इतका आहे. व्यक्तीगत शुभेच्छा जहिराती वर्तमान पत्रात प्रसिद्ध केल्या ते देखील 6 लाख 90 हजार 719 इतका आहे. चेतन कपाटे यांनी संस्थेचे विविध बँकेतील बचत व करंट खात्यावरून चेक व आरटीजीएस द्वारे रकमा वर्ग केल्या आहेत हा अपहार 2 कोटी 85 लाख 6 हजार 225 इतका आहे. बँक ओहरड्राफ कर्ज घेतलेला अपहार  19 कोटी 60 लाख 82 हजार 79 इतका तर संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे हे महाशय इथेच थांबले नाही तर संस्था आपल्या मालकीची असल्यासारखे वागले त्यांनी वैयक्तीक खर्च महसुली खर्चातभरीत करून 81 लाख 18 हजार 652 रुपये इतका केला. असा एक ना दोन तब्बल 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार या संस्थेत 21आरोपींनी केला.

            दरम्यान, दुधगंगा संस्थेचे चेअरमन हे काँग्रेसचे जिल्ह्यापरिषद सद्स्य होते. त्यांना आ. थोरात साहेबांचे विश्वासु मानत होते. एकीकडे थोरात साहेब अगदी सुतासारखा सरळ कारभार चालवतात तर कार्यकर्ते असा अपहार करत असेल तर हे दुर्दैव आहे. साहेब येवढा विश्वास ठेऊन गावांचा कारभार चालवायला देतात त्याचा फायदा असे लबाड लोक घेतात गोंडस नावाने पतसंस्था खोलतात. मोठे होण्यासाठी तेथील मोठ्या रकमा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात. एक वेळ अशी येते की, कुंपनच शेत खाऊ लागतात. तेव्हा घशात घातलेल्या रकमांचा ताळमेळ लागत नाही. नंतर डोईजड झालेले आकडे पाहुन मी नाही केले अशी री ओढत संचालक मंडळ नाकाराचा पाढा म्हणते. मात्र, शेतकरी, मजुर, कामगार,व्यापारी हे आपल्या घामाचे पैसे मोठ्या आशेने तेथे ठेवतात आणि नंतर  घोटाळे, अपहार, फसवणुका झाल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळु सरकते. त्यामुळे, पैश्याची गुंतवणूक करताना सावधानता बाळगली पाहिजे. आता दुधगंगा पतसंस्थेत देखील असाच घोटाळा झाला आहे. येथील मॅनेजर चेअरमन अन्य 19 जणांनी ही पतसंस्था स्वतःच्या घशात घातली आणि आजही ज्या शेतकऱ्यांनी पैसे ठेवले ते रडत आहेत.