पत्नीवर भोंदुबाबने केला अत्याचार, पतीने काढला व्हिडिओ.! नको त्या अवस्थेत बाबा पळाला, गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
जादुटोणा आणि भानामती करुन एका भोंेदुबाबाने महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. तुमच्या घराला शांती मिळावी, सर्व समस्या दुर व्हाव्यात म्हणून होम हवन करण्यात आला. इतकेच नव्हे तर कर्नाटक येथे बाळुमामाच्या दर्शनाला देखील नेण्यात आले. मात्र, जेव्हा पती घरात नव्हते तेव्ही हा नराधम आला आणि त्याने लसनाच्या कांड्या आणि उदी डोक्याला लावून काहीतरी जादु केली व पीडित महिलेवर अत्याचार केला. या दरम्यान अचानक पीडितेचे पती घरी आले आणि त्यांनी समोर घडणार्या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रण केले. त्यानंतर घटनास्थळी एकच आरडाओरड झाला आणि त्यावेळी अत्याचारी भोंदुबाबा पळुन गेला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी पांडे (रा. शिरापुर, ता. संगमनेर, जि. अ.नगर) याच्यावर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, दि. ३० जून २०२३ रोजी पीडित महिला जाखुरी येथे माहेरी आली होती. तिच्या पतीचा गेल्या दोन महिन्यांपुर्वी अपघात झाला होता, त्यामुळेे घरात वाद आणि प्रचंड अडचणी सुरु होत्या. तेव्हा पीडितेला एक सल्ला मिळाला की, शिरापूर येथे एक बाबा महाराज आहे. त्यांच्याकडे जाऊन तुमच्या समस्या सांगितल्यानंतर सर्व प्रश्नांवर मार्ग निघेल. तेव्हा पीडित महिलेने तिच्या पतीस ही बाब सांगितली आणि त्यांच्या आयुष्याला तेव्हा खर्या अर्थाने उतरती कळा लागली. यांनी आरोपी भोंदुबाबा याला फोन केला आणि आपल्या समस्यांचा पाढा वाचून दाखविला. त्यावेळी या नराधम भोंदुने सांगितले की फोनहुन काही उपचार करता येणार नाही. मला प्रत्यक्ष घरी यावे लागेल. त्यानुसार शिवाजी पांडे यास पीडितेने घरी बोलावून घेतले.
दरम्यान, दि. ३ जुलै २०२३ रोजी हा नराधम महाराज पीडितेच्या घरी सादतपुर येथे पोहचला. तेथे त्याने काही अघोरी विद्या करण्याचा प्रयत्न केला. भुतकेत, दैत्य, चेडे तुमच्या मागे लागले आहेत असे सांगून होम हवन करावा लागेल अन्यथा येणार्या काळात आणखी प्रश्न वाढतील अशी भिती घातली. त्यामुळे, त्याच दिवशी रात्री १२ ते ४ वाजेपर्यंत पांडे यांने घरात होम पेटविला. सर्व दक्षिणा आणि अन्य साहित्य घेऊन तो पहाटे निघुन गेला. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा त्याचा फोन आला आणि भोंदुने विचारले. की, आता काही समस्या सुटल्या आहेत की नाही? पण, आठ दिवसात काय इकडचे जग तिकडे होणार होते? मात्र, पीडितेच्या पतीने बाबा नाराज व्हायला नको म्हणून थोडंफार बरं बोलणं केलं.
दरम्यान, समस्या कायम आहे असे लक्षात येताच पांडे याने पीडित व्यक्तींना अधिक पांडू बनविण्याचे काम केले. दि. १५ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारात त्याने फोन केला. तो म्हणाला, की आपल्याला कर्नाटक येथील आदमपुर येथे बाळुमामाच्या दर्शनासाठी जायचे आहे. तेथे गेल्यानंतर तुमच्या अडचणी दुर होतील. हातावर पोट असणार्या व्यक्तींनी पैशाची जमवाजमव केली आणि त्याच दिवशी रात्री ९ वाजता यांची गाडी कर्नाटकच्या दिशेने रवाना झाली. दर्शन घेऊन आल्यानंतर जे ते आपापल्या घरी गेले. त्यानंतर पांडे याने पीडितेच्या घरी जाणे येणे सुरू केले. या भोंदुचा डोळा आता पीडित महिलेवर पडला होता. याच्यातील वासनांध शक्ती जागरूक झाल्याने तो पीडितेकडे वाईट नजरेने पाहत होता. मात्र, हे तिच्या फार लक्षात आले नाही.
दरम्यान, दि. ३० जुलै २०२३ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नराधम पांडे हा पीडितेच्या घरी गेला होता. तेव्हा तिचे पती एका व्यक्तीच्या शेतावर गेले होते तर मुले शाळेत गेली होती. याचा फायदा घेऊन पांडे याने पीडितेला तीन लसणाच्या कांड्या आणायला सांगितल्या. त्या कांड्या कशासाठी असा प्रश्न तिने केला असता त्याने सांगितले. की, त्या तुझ्या पतीला खायला द्यायच्या आहेत. त्या कांड्या खाल्ल्यानंतर तुझ्या घरातील अडचणी दुर होतील. तेव्हा तिने कांड्या दिल्या असता भोंदुबाबाने त्याच्या खिशातील भंडारा आणि उदी काढली व ती पीडित महिलेच्या डोक्याला लावली. तसेच तिच्या अंगावर फुकली आणि तिच्यावर अत्याचार केला असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान याच वेळी तिचा पती आला आणि त्याने घरात जो काही प्रकार चालु होता तो डोळ्यांनी पाहिला. त्यांने या दोघांना कोणताही डिस्टर्ब न करता स्वत:च्या मोबाईलमध्ये घडणार्या प्रकाराची शुटिंग काढली. त्यानंतर याने एकच आरडाओरड केली. त्याक्षणी आहे त्या अवस्थेत भोंदुबाबा घराच्या बाहेर पळाला आणि शेता शेतातून तो पळ काढून कोठे गायब झाला ते समजले नाही. त्यानंतर घडलेला प्रकार पीडितेने पतीस कथन केला आणि थेट पोलीस ठाणे गाठून भोंदु महाराज शिवाजी पांडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
जादुटोणा हा निव्वळ भ्रम आहे.!
आयुष्यात समस्या या प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या असतात. अडचणी नाही असा एकाही व्यक्ती या जगात नाही. मात्र, त्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन आणि संघर्ष यापेक्षा दुसरा कोणताच पर्याय असू शकत नाही. जादुटोणा, भानामती, बळी, अघोरी विद्या असले अंधश्रद्धेचे मार्ग तर मुळीच नाही. त्यामुळे, असल्या भोंदुंच्या नादी लागून कोणाचेही प्रश्न मिटलेले नाही. श्रद्ध असणे सहाजिक आहे. मात्र, अंधश्रद्ध असणे आणि त्यानुसार कृती करणे हा निव्वळ मुर्खपणा आहे. कोणत्याही अंगार्या धुपार्याने, धुप-उदाने मानसावर परिणाम होत नाही. त्यामुळे, अशा व्यक्तींच्या कोणी अहारी जाऊ नये असे मत अंधश्रद्धा न पाळणार्या व्यक्तींनी व्यक्त केले आहे.