12 वी च्या मुलीवर दोघांनी केला कॅफेत अत्याचार, ती एकाच वेळी दोन मित्राची गर्लफ्रेंड, ब्लॅकमेलिंग करुन अत्याचार सहा जणांवर गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

               12 वीत शिकणाऱ्या मुलीबरोबर कॉलेजला ये-जा करताना लिफ्ट देत ओळख केली. रोजच घरी सोडवत असल्याने दोन महिन्यानंतर माझे तुझ्यावर प्रेम आहे. असे म्हणुन आशिष राऊत याने प्रपोज केला. आठ दिवसांनी मुलीने त्याच्या भावनांचा स्विकार केला. मग काय.! भेटुन बोलणे सुरू होत कोठे नाही, तेच कॅफेमध्ये घेऊन गेला. मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचे आहे असे म्हणुन बळजबरीने संभोग केला. त्यानंतर, पुन्हा मित्राच्या गळ्यामध्ये भेटुन बळजबरीने संभोग केला. आता ह्या पठ्याने सर्व प्रकार मित्र किरण राऊत याला सांगितला. आता आयत सावज जाळ्यात सापडल, मंग काय! त्याने देखील ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. कॉलेजवर जात असताना तिला आडवून ब्लॅकमेलिंग होऊ लागले. जसे आशिष बरोबर संबंध ठेवले तसे माझ्याशी सुद्धा ठेव, नाहीतर तुझ्या बापाला सर्व सांगेल. असे म्हणुन कॉलेजच्या पाठीमागे एका कॅफेमध्ये नेले तेथे बळजबरीने संभोग केला. त्यानंतर पुन्हा शिर्डी येथे एका लॉजवर व पेमगिरी येथील डोंगराच्या झाडांमध्ये अत्याचार केला. ही सर्व धक्कादायक घटना एप्रिल 2023 ते 21ऑगस्ट 2023 रोजी कॅफे, शिर्डीतील लॉज, पेमगिरी, विठ्ठल कडा, कर्हेघाट येथे घडली. यामध्ये पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आशिष राऊत (रा.मालुंजकर वस्ती, राऊतमळा घुलेवाडी, ता. संगमनेर), किरण सोपान राऊत (रा. राऊतमळा, घुलेवाडी, ता. संगमनेर) सागर मालुंजकर, कॅफे मालक, लॉज मालक यांना देखील आरोपी करण्यात आले आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी आशिष राऊत व किरण राऊत याना तत्काळ बेड्या पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी ठोकल्या आहे.   

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलगी ही नामांकीत कॉलेज मध्ये इयत्ता 12 वीचे शिक्षण घेते. आई वडील यांचा कॅबेलचा छोटासा व्यवसाय आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पिडीत मुलगी ही इयत्ता 12 वीत आर्ट्सचे शिक्षण घेते. ते पुर्वी मालदाड परिसरात राहत होते. परंतु तीन वर्षांपूर्वी त्यांनी नवीन घर घुलेवाडी परिसरात बांधल्याने ते घुलेवाडी परिसरात राहण्यासाठी आले. याच परिसरात आरोपी आशिष राऊत हा राहत होता. तो पिडीत मुलीचे कॉलेज सुटले की तो तिच्यापाठीमागे येत. यातुन त्यांची ओळख झाली. हा दररोजचा नित्यक्रम चालत. साधारणतः दोन महिन्यानंतर आरोपी आशिष राऊत याने माझे तुझ्यावर प्रेम आहे असे बोलुन प्रपोज केला. त्यानंतर आठ दिवसांनी पिडीत मुलीने त्याला होकार दिला.

                  एप्रिल 2023 मध्ये पिडीत मुलगी कॉलेजला जात असताना आरोपी आशिष राऊत आला व पिडीत सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान मुलीला दुचाकीवर घेऊन अकोलनाका परिसरातील कॅफेवर घेऊन गेला. तेथे कॅफेमध्ये गेल्यावर बोला की, तु माझ्यासोबत ऐंगेज आहे त्यामुळे मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचे आहे. असे म्हणुन आरोपी आशिष राऊत याने बळजबरीने संभोग केला. त्यानंतर पुन्हा कॉलेजला जात असताना आरोपी आशिष राऊत हा आला व पिडीत मुलीला दुचाकीवर घेऊन गेला. यावेळी आरोपी आशिष राऊत याचा मित्र सागर मालुंजकर याच्या गाळ्यामध्ये घेऊन गेला. तेथे आतमध्ये देखील तु माझीच आहे असे बोलुन बळजबरीने संभोग केला. त्याच महिन्यात शिर्डी येथे नेऊन एका लॉजवर संभोग केला. एके दिवशी कॉलेजवर जात असताना आरोपी आशिष राऊत याने पिडीत मुलीला दुचाकीवर बसवले व विठ्ठल कडा येथे नेऊन झाडी-झुडपामध्ये नेऊन जबरी अत्याचार केला.

            दरम्यान, जुलै 2023 मध्ये आरोपी आशिष राऊत याने त्याच भागात राहणारा मित्र किरण राऊत यास प्रेम संबंधाबाबत सांगितले. त्यानंतर किरण राऊत याने पिडीत मुलीला ब्लॅकमेलींग करण्यास सुरवात केली. आरोपी किरण राऊत हा नेहमी पिडीत मुलीला कॉलेजला जात असताना भेटुन बोलायचा की, तु जसे आशिष बरोबर फिरायला जाते तसे माझ्या सोबत फिरायला चल. जर तु आली नाही तर तुझ्या घरच्यांना आशिष बरोबरचे प्रेमसंबंध सांगेल असे म्हणून वेळोवेळी त्रास देत. जुलै 2023 मध्ये सकाळी कॉलेजला जात असताना आरोपी किरण राऊत हा दुचाकीवर आला व पिडीत मुलीला म्हणाला की, आज जर तु माझ्यासोबत आली नाही तर मी तुझ्या बापाला सर्व सांगेल. असे म्हणुन आरोपी किरण राऊत याने पिडीत मुलीला बळजबरीने दुचाकीवर बसवून कॉलेजच्या पाठीमागे एका कॅफेत घेऊन गेला. तेथे जबरदस्तीने पिडीत मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा पिडीत मुलगी कॉलेजला जात असताना आरोपी किरण राऊत हा आला मोठं-मोठे प्रलोभने देऊन दुचाकीवर बसुन पेमगिरीला डोंगरावरील झुडपामध्ये घेऊन गेला. तेथे देखील बळजबरीने संभोग केला. 

                    दि. 4 ऑगस्ट 2023 रोजी पिडीत मुलगी कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल करून बाहेर येत असताना आरोपी किरण राऊत हा दुचाकीवर आला व म्हणाला की, आज तुझे वडील घरी नाही आपण शिर्डीला जाऊ असे म्हणुन जबरदस्तीने पिडीत मुलीला शिर्डीला नेले तेथे एका लॉजवर नेऊन जबरी संभोग केला. सोमवार दि.21 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पुन्हा दुचाकीवर बसवून कऱ्हेघाट पाहायला जाऊ असे म्हणुन कऱ्हेरोडने निमोण येथे एका हॉटेलवर नेले तेथे रूम घेऊन जबरी संभोग केला असे वारंवार होऊ लागल्याने पिडीत मुलीला ब्लॅकमेलींग करून अत्याचार करू लागल्याने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली यावरून आरोपी आशिष राऊत (रा.राऊतमळा, घुलेवाडी, ता. संगमनेर), किरण सोपान राऊत (रा. राऊतमळा, घुलेवाडी, ता. संगमनेर) त्यांना सहाय्यकरणारे सागर मालुंजकर, कॅफे, लॉज,हॉटेल यांना देखील आरोपी करण्यात आले आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहे.