पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याने महिलेने त्याला अत्याचार करु दिला. ब्लॅकमेल करुन आरोपीने घेतला वारंवार फायदा.! गुन्हा दाखल.!

 सार्वभौम (अकोले) :- 

                अकोले तालुक्यातील वाघापुर येथे एका विवाहीत महिलेवर गावातील एका ओळखीच्या माणसाने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. संबंधित महिलेला मुलगा असुन ते दोघे एकाच गावात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. एकमेकांची ओळख असताना सुद्धा पिडीत महिलेला एकटी काम करत असताना पाहुन ब्लॅकमेल करून नवऱ्याला ठार मारण्याची धमकी देऊन शेतात बलात्कार केल्याची घटना जुन 2021 पासुन ते 19 जुलै 2023 रोजी वेळोवेळी घडली. यावेळी पिडीत महिलेने आरोपीला पाठीशी न घातला थेट अकोले पोलीस ठाणे गाठुन तक्रार दिली यावरून महेंद्र रघुनाथ बाराते (रा. वाघापुर, ता.अकोले) याच्यावर बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खैरनार करत आहे.

               याबाबत सविस्तर माहिती अशी की, 42 वर्षीय पिडीत महिला  पती व तिचा मुलगा सासु सासरे असे एकत्रीत कुटुंब आहे. त्यांचा शेतीवर उदरनिर्वाह चालतो. 42 वर्षीय पिडीत महिला व आरोपी महेंद्र बाराते यांच्यात गेल्याकाही दिवसांपासुन मैत्री तथा ओळख होती. 42 वर्षीय पिडीत महिला आपल्या शेतात रोज काम करते तसे काम करत होती. शेतीत काम करत असताना आरोपी महेंद्र बाराते याची नेहमी तिच्यावर नजर असत. मात्र, एक ओळखीचा व्यक्ती म्हणुन त्याची पिडीत महिलेवर वाईट नजर होती. जुन 2021 मध्ये पिडीत महिला रोजच्या सारखे काम करत असताना आरोपी महेंद्र बाराते पिडीत महिलेच्या शेतीकडे आला. पिडीत महिला शेतीत एकटीच काम करत होती. ओळख असल्याने तो तिथे आला आणि लगट करू लागला. पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध आरोपी महेंद्र बाराते याने शेतात बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील व गावात तुझी इज्जत घालीन अशी धमकी दिली. त्यामुळे, पिडीत महिलेने घाबरून घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही. त्यानंतर, पुन्हा आरोपी महेंद्र बाराते याने पिडीत महिलेच्या पतीला मारण्याची धमकी देऊन पिडीत महिलेला ब्लॅकमेल करून जुन 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत पाच ते सहा वेळा पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. मागील पाच सहा महिन्यांपासुन पिडीत महिलेला भेटण्यासाठी आरोपी महेंद्र बाराते हा ब्लॅकमेल करत होता. मात्र, पिडीत महिलेने भेटण्यास नकार दिला.

          दरम्यान, दि. 19 जुलै 2023 रोजी पिडीत महिला संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास शेतात आपले काम करत होती. तिला एकटे पाहुन आरोपी महेंद्र बाराते पाठीमागुन गेला. व पिडीत महिलेला बोला की, तु मला भेटत का नाहीस तुझ्याकडे पाहून घेतो. असे म्हणुन तो पुन्हा ब्लॅकमेल करून पिडीत महिलेला मिठी मारून लगट करू लागताच पिडीत महिलेने एकच आरडा ओरडा सुरू केला. तेव्हा आरोपी महेंद्र बाराते हा पिडीत महिलेला म्हणाला की, तुझ्याकडे पाहुन घेतो. असे बोलुन तेथुन निघून गेला. त्यानंतर पिडीत महिलेने घरी येऊन घडलेला सर्व प्रकार आपल्या सासऱ्याला सांगितला. त्यानंतर, पिडीत महिलेने आरोपीला पाठीशी न घालता थेट अकोले पोलीस ठाणे गाठले व घडलेला सर्व प्रकार सांगितला. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी महेंद्र रघुनाथ बाराते (रा. वाघापुर, ता. अकोले) याच्यावर बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खैरनार करत आहेत.