अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, स्टँम्पवर लेखी दिले मी अत्याचार करणार नाही तरी तो तिच्या घरी गेला.!
सार्वभौम (अकोले) :-
नग्न फोटो काढून ते सोशल मीडियात शेअर करण्याची धमकी देत एका महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल होणार होता. मात्र, गावातील पुढार्यांच्या मध्यस्तीने आरोपीपे लेखी दिले. की, मी पुन्हा अत्याचार करणार नाही. मात्र, गडी लेखी देऊन सुद्धा काही हटला नाही. महिलेचा पती बाहेर गेला की याचे पाय तिच्या घराकडे ओढत होते. त्यामुळे, वैतागून महिलेेने पोलीस ठाणे गाठले आणि हरिदास कोंडीबा लांडे (रा. वाघापुर, ता. अकोले, जि. अ.नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अकोले तालुक्यातील वाघापूर येथे दि. १६ जुलै २०२३ रोजीपुर्वी घडली. याप्रकरणी आरोपी लांडे यास पोलिसांनी अटक करावी अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, एप्रिल २०२२ मध्ये पीडित महिला आणि तिची मुले घरात जेवण करुन झोपले होते तर पती हे शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. जेव्हा पीडित महिला ही नैसर्गिक विधीसाठी बाहेर आली तेव्हा आरोपी हरिदास लांडे हा पठ्ठ्या घराबाहेर दबा धरुन बसला होता. पीडित महिला बाहेर येताच त्याने तिला पकडले आणि तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या दरम्यान त्याने पीडित महिलेचे काही नग्न फोटो काढले होते. त्यामुळे तो या फोटोच्या माध्यमातून तिला वारंवार ब्लॅकमेल करणार होता.
दरम्यान, त्या दिवसानंतर आरोपी हरिदास लांडे याने पीडित महिलेला वारंवार बोलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती त्यास नकार देत होती. म्हणून त्याने सांगितले की तु जर मला भेटायला आली नाही तर मी तुझे काही फोटो माझ्याकडे आहे ते सोशल मीडियावर टाकून देईल किंवा गावातील काही लोक आणि नातेवाईकांना दाखवेल. त्यामुळे, पीडित महिला त्यास भेटण्यासाठी पुन्हा गेली. आता हा प्रकार वारंवार होत होता. मात्र, जे होतय ते योग्य नाही याची जाणिव महिलेस झाली असली तरी आरोपी आता चटावल्यामुळे त्याने पीडितेला धमक्या देणे सुरू केले.
आता काही झाले तरी त्याला भेटायचे नाही असे तिने ठरविले होते. मात्र, आरोपी म्हणाला की मी तुझ्या नवर्याला ठार मारीन आणि तुझ्या मुलांना देखील जिवंत सोडणार नाही. त्यामुळे, पीडित महिला वैतागून गेली होती. आरोपीचा अतिरेख झाल्यानंतर तिने जे काही झाले ते पती आणि भावास सांगितले. मात्र, गावातील काही चारदोन राजकीय व्यक्तींनी एकत्र येऊन यावर सलोखा करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे एखाद्या महिलेवरील अन्याय दाबण्यासाठी स्टॅॅम्पवर लेखी दिले जाते हिच मुळात शरमेची बाब आहे.
दरम्यान, मी आता पीडित महिलेवर अत्याचार करणार नाही. तिच्या वाटेवर जाणार नाही, तिला त्रास देणार नाही. असे लेखी दिलेले असताना देखील आरोपी हरिदास लांडे याने पुन्हा महिलेचे घर गाठले. पीडित महिलेचा पती गावात रेशन आणण्यासाठी गेला होता. तेव्हा आरोपी हरिदास लांडे तेथे आला व म्हणाला. की, तु आजकाल मला भेटत नाही नाही? तुझ्याकडे मी पाहुन घेतो असे म्हणून तो निघुन गेला. मात्र, त्याची मुजोरी महिलेने खपून न घेता तिने लगेच आपल्या भावास बोलावून घेत घडलेला प्रकार पतीला देखील सांगितला. त्यानंतर त्यांनी थेट अकोले पोलीस ठाणे गाठले आणि हरिदास कोंडीबा लांडे (रा. वाघापुर, ता. अकोले, जि. अ.नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भुषण हांडोेरे करीत आहेत.