१० वीची मुलगी पळुन नेली, गिणी गावतात अत्याचार.! पाहुण्यांच्या घरुन दोघे ताब्यात प्रियकरास ठोकल्या बेड्या.!
सार्वभौम (संगमनेर) :-
लग्नाचे अमिष दाखवून इयत्ता १० वीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थीनीवर एका तरुणाने अत्याचार केला. इतकेच काय तर तिला पळवून नेत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील झोळे येथे दिड महिन्यापुर्वी घडली. यात पीडित विद्यार्थीनी व तरुणास पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील भोसले वाडी येथून ताब्यात घेतले आहे. तर मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गणेश उर्फ संकेत श्रीकांत येवले (रा. गशेणवाडी, झोळे, ता. संगमनेर, जि. अ.नगर) याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर येवले यास पोलिसांनी अटक देखील केली असता न्यायालयापुढे हजर केले. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, पीडित विद्यार्थीनीची बहिन ही गरोदर असून घरातील काही कामे करण्यासाठी इयत्ता १० वीच्या वर्गात शिकणार्या बहिनीस काही दिवस झोळे येथे आणले होते. या दरम्यान तिची ओळख संकेत येवले याच्यासोबत झाली होती. त्या दोघांमध्ये पहिल्यांदा नजरा नजर आणि नंतर तो तिच्या घरासमोरून रोज वारंवार ये-जा करत होता. तर, कधी घरी जाऊन गप्पा गोष्टी देखील करत होता. दरम्यानच्या काळात संकेत याने तिला प्रपोज केला आणि ती त्यास हो देखील म्हणाली. त्यामुळे, दोघांची पुर्वी मैत्री आणि आता एकमेकांवर जीव जडला होता.
दरम्यान, पीडित मुलगी ही संकेत यास भेटण्यासाठी चोरुन लपून जात होती. हा प्रकार घरच्यांच्या काही लक्षात आला नाही. मात्र, त्यांचे भेटणे अधिक वाढले आणि त्यानंतर संकेत याने पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तिला थेट घराच्या जवळ असणार्या गिणी गवतात नेले. तेथे तो तिला म्हणला. की, तु आता वयात नाहीस, तुझ्याशी मी लग्न करु शकत नाही, जेव्हा तुझे लग्नाचे वय होईल तेव्हा आपण लग्न करु. अशी चर्चा झाल्यानंतर संकेतने तेथेच तिच्यावर अत्याचार केला. संकेत लग्न करणार आहे असे त्याने अमिष दाखविल्यामुळे अल्पवयीन मुलीस त्याची चाल लक्षात आली नाही आणि ती त्याच्या जाळ्यात फसली.
दरम्यान, या दोघांनी गाव सोडून पळुन जाण्याचा निर्णय घेतला. ना संकेतकडे पैसा होता ना पीडित तरुणाकडे कसले घबाड होतेे. एकमेकांच्या ओढीने दोघांनी घर सोडले आणि ते दि. २२ जून २०२३ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास संगमनेर बस स्थानकावर आले. दोघेही प्रचंड घाबरलेले होते. त्यांनी कोणताही विचार न करता थेट नाशिक गाडी धरली आणि दोघे नाशिकला निघुन गेला. नाशिक बस स्थानकावर उतरल्यानंतर रहायचे कोठे? हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. संकेतचे तेथे मित्र परिवार नव्हता ना राहण्यासाठी लॉज आणि पैसा उडवता येईल असली संपत्ती नव्हती. त्यामुळे, त्यांची पहिल्याच दिवशी फरपट झाली. त्यानंतर संकेत याने ठरविले. की, आपण नाशिक येथे न थांबता पुन्हा आळेफाटा येथे जायचे.
दरम्यान, दोघांनी पुन्हा पुणे गाडी पकडली आणि नाशिक-संगमनेर ते आळेफाटा असा प्रवास केला. संकेत याचे एक नातेवाईक जुन्नर तालुक्यातील भोसलेवाडी येथे राहत होते. त्यामुळे, इकडे तिकडे न जाता त्याने थेट भोसलेवाडी गाठली. तेथे जाऊन त्याने काही दिवस वास्तव्य केले. या दरम्यान, संकेत याने पीडित बालिकेवर वारंवार अत्याचार केले. तर दुसरीकडे मुलगी कोठे गेली याची जरा देखील कल्पना घरच्यांना नव्हती. मात्र, तरी देखील पोलिसात तक्रार गेल्यानंतर पोलिसांनी संकेतचा शोध घेतला आणि थेट भोसलेवाडी गाठली. तेथून मुलगी आणि तिचा प्रेमी दोघे गाडीत घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पीडित मुलीने कायदेशीर मार्गाने तक्रार दाखल केली आणि गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संकेत येवले यास बेड्या ठोकल्या आहेत.