मोठी ब्रेकिंग! अजित दादा पुन्हा उपमुख्यमंत्री, १० जणांचा शपथविधी.! ३५ आमदार सोबतीला.! राष्ट्रवादीचा शिंदे फडणविस यांना पाठींबा.!

   


- सागर शिंदे

सार्वभौम (मुंबई) :-

      अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी घेतल्यानंतर तो अपयशी ठरला आणि आज (दि.२) पुन्हा दुपारी त्यांनी सगळ्यांना गाफील ठेऊन परत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या १० ज्येष्ठ आमदारांनी शपथ घेतली आहे. तर पवार यांच्या दाव्यानुसार ३५ आमदारांचा त्यांना पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे, सत्तेसाठी वाट्टेल ते अशा प्रकारची भुमिका अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. तर, आम्ही पक्ष वाढीसाठी आणि विकासाच्या मुद्द्यावर शिंदे-फडणविस सरकार सोबत गेलो असे दादांनी सांगितले. तर, आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणून आम्ही सामील झालो असे मत व्यक्त केले तर शरद पवार यांनी सांगितले. की, या शपथविधी आणि आमचा काही एक संबंध नाही.

गेल्या कित्तेक दिवसांपासून अजित पवार यांच्या मनात चलबिचल चालु होती. ते भाजपात जाणार या चर्चाला वारंवार उधान उठत होते, ते वादळ आज स्थिरावले होते. अजित पवार यांनी ९ जणांना घेऊन आज पहिल्याच दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यात दिलीपराव वळसेपाटील, संजय बनसोडे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंढे, अनिल पाटील, धर्मरावबाबा अत्राम यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून ३५ आमदार दादांच्या पाठीशी आहे असा दावा करण्यात आला आहे. तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

राज्यात आणि देशात पंतप्रधान मोदी यांची क्रेझ कायम आहे. २०२४ मध्ये देखील मोदी यांची सत्ता येणार आहे. त्यामुळे, विरोधी पक्ष म्हणून काम करण्यापेक्षा राज्याचा विकास करण्यासाठी सत्तेत राहुन विकास करणे शक्य आहे. त्यामुळे, सर्व राष्ट्रवादी पक्ष घेऊन आम्ही शिंदे फडणविस सरकारसोबत जात आहोत. लोकशाहीत बहुमताला महत्व असते. त्यामुळे, राष्ट्रावादीत माझ्याकडे बहुमत आहे. मी मझ्या पद्धतीने वरिष्ठांना सांगितले आहे असे म्हणत त्यांनी शरद पवार यांना दुर्लक्षित केले. तर, येणार्‍या काळात आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावरच निवडणुक लढविणार आहोत.

डॉ. लहामटे दादांसोबत.!

अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे हे सकाळीच अजित दादा यांच्या सोबत होते. पहिल्या वेळी दादांनी बंड केले तेव्हा लहामटे हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे अगदी मंत्री पदाची शपथ घेइपर्यंत त्यांचे नाव मंत्री पदाच्या यादीत होते. मात्र, दादांचे बंड शमल्यानंतर जयंत पाटील यांनी रात्रीतून सुत्र हलविले आणि प्राजक्त तनपुरे यांना मंत्री केले. तर डॉ. लहामटे यांचे नाव यादीतून गायब झाले. त्यामुळे, यावेळी ती चुक डॉ. लहामटे यांनी केलेली दिसत नाही. त्यांनी अजित दादा यांच्यासोबत जाणे पसंत केल्याचे बोलले जात असून त्यांनी स्वत:साठी कोणतीही अभिलाशा न धरता तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी द्या अशी मागणी केल्याचे बोलले जात आहे.