लव जिहाद आणि प्रक्षोभित भाषणांमुळे अशरफ शेखचा पहिला बळी, मित्रांनी केली हत्या, तिघे पोलिसांच्या ताब्यात.!
सार्वभौम (अकोले) :-
गेल्या कित्तेक दिवसांपासून दोन धर्मात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम अकोले तालुक्यात होत होते. पोलीस ठाण्यात आम्हाला न्याय मिळात नाही. त्यामुळे, आता आमचा न्याय आम्हीच देऊ, लव जिहाद करणार्यांचे हातपाय आम्ही आमच्या पद्धतीने कलम करू अशा प्रकारची प्रक्षोभीत भाषणे काही तरुणांनी पोलीस ठाण्याच्या आवारात केली होती. त्याचाच एक भाग म्हणून अशरफ अतिक शेख (वय १७, रा. शाहुनगर, ता. अकोले) याची निघृणपणे हत्या करण्यात आली. अशा प्रकारचा आरोप अकोल्यातील मुस्लिम संघटनांनी केला आहे. शेख याचे सर्व मित्र हिंदु होते, त्यास साहिल याने गाडीवर बसविले आणि थेट गर्दनी घाटात नेले. तेथे नेवून त्याची नियोजनपुर्वक हत्या करण्यात आली आहे. हा कटाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरॉत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी साहिल याच्यासह अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. तर वाडगाव लांडगा येथील दोघा संशयीतांचा शोध सुरू आहे. तर, जे कोणी खरे आरोपी आहेत त्यांना शोधा आणि त्यांना अटक करा या मागणीसाठी मुस्लिम समाजाने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, अशरफ आणि साहील ही दोघे राहण्यास शाहुनगर परिसरातच आहेत. त्यांच्यात चांगली जुनी मैत्री असून जेव्हापासून अकोले तालुक्यात लव जिहादचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हापासून हे एकमेकांना फारसे जवळीक राहिले नव्हते. मात्र, काल रविवार दि. १८ जून २०२३ रोजी सकाळी अशरफ हा घराबाहेर गेला होता. त्यासोबत साहिल हा देखील होता. मात्र, याची खबर कोणाला नव्हती. अशरफ याची हत्या ही पुर्वनियोजित होती असे एकंदर प्रक्रियेनुसार दिसत आहे. कारण, साहिल याने त्याचे दोन मित्र वडगाव लांडगा येथून बोलावून घेतले होते असे प्राथमिक माहितीतून समोर येऊ लागले आहे. तर साहिलने अशरफ यास गाडीवर बसविले आणि थेट गर्दनी घाटात नेले. तोवर वडगाव येथील दोघे तेथे येऊन थांबले होते असे तो एकीकडे म्हणतो. तर, त्याने शाहुनगर येथे राहणार्या दोघांची नावे घेतली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा या खुनात कोणताही रोल दिसून आलेला नाही. त्यामुळे, साहिल हा संदिग्ध माहिती देत असून तो एकतर पोलिसांनी दिशाभूल करतो आहे. किंवा कोणालातरी बड्या व्यक्तीला लपविण्याचा प्रयत्न करतो आहे, अशी शंका आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, काल (दि.१८) जेव्हा अशरफ हा रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे, घरचे लोक अस्वस्थ झाले. त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यांचे नातेवाईक मित्र परिवार आणि शहरात अनेक ठिकाणी पाहिले असता त्याचा शोध लागला नाही. मात्र, जेव्हा फारच उशिर झाला तेव्हा अशरफच्या नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी कोणताही उशिर न लावता अशरफ अल्पवयीन असल्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अगदी पहाटेपर्यंत त्याच्या पालकांनी मुलाचा शोध सुरू ठेवला होता. मात्र, अशरफ नेमकी कोठे गेला हे समजले नाही. पालकांना जी-जी शंका होती त्या-त्या ठिकाणी त्यांनी शोध घेतला. त्याचे कोणाशी भांडण होते का? त्याच्या कुटुंबाशी कोणाचा वाद होता का? त्याचा कोठे जीव जडला होता का? अनेक गोष्टींची चौकशी केली. मात्र, उत्तर मिळाले नाही.
आरोपी तपासात सामिल..!!
जेव्हा रात्री उशिरा पोलीस ठाण्यात कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल झाला. तेव्हा आरोपी साहिल मोहिते याने आपण त्यातले नाहीच असे भासवून बघ्याची भुमिका घेतली. इतकेच काय.! दुसर्या दिवशी जेव्हा अशरफचे पालक त्यास शोधत होते. तेव्हा इकडे शोध घ्या, तिकडे शोध घ्या, चला इकडे जाऊ, चला तिकडे जाऊ असे म्हणत स्वत: साहिल आपला मित्र अशरफ याचा शोध घेऊ लागत होता. म्हणजे, घरचा भेदी लंका दहन अशा पद्धतीने साहिलने सगळ्यांची दिशाभूल केली. मात्र, त्याची हुशारी फार काळ टिकाली नाही. एका सीसीटीव्ही कॅमेरॅत स्वत: साहिल हा अशरफ यास दुचाकीवर घेऊन तो गर्दनी घाटाने वर जाताना दिसला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.
पोलिसांनी तपासाला दिशा दिली.!
अशरफ हा अल्पवयीन असला तरी तो मोबाईल वापरत होता. तो गायब झाल्यानंतर त्याच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी रात्रीच काढले होते. मात्र, गर्दनी एक डोंगराळ प्रदेश आहे. त्यामुळे, रेंज केली किंवा मोबाईल बंद झाल्यानंतर केवळ टॉॅवरचे लोकेशन आले. परंतु, तो कोणत्या दिशेने गेला याची निच्छिती मिळाली. त्यानुसार सीसीटीव्ही तापसण्यात आले. जेव्हा एका ठिकाणी साहिल मोहिते हा त्याला घेऊन जाताना दिसला तेव्हा पोलिसांना आणि नातेवाईकांना शोधाशोध करु लागेल्या साहिला पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या. स्वत:ला हुशार समजणार्या आरोपीस कळले देखील नाही. की, आपल्याला ताब्यात का घेतले आहे. मात्र, जेव्हा त्यास सीसीटीव्ही फुटेज दाखविले तेव्हा त्याची बोलती बंद झाली. मात्र, तरी देखील तो खोटीनाटी नावे सांगून पोलिसांची दिशाभुल करीत होता.
त्या भाषणांनी बळी घेतला.!
गेल्या पंधरा दिवसापुर्वी अगस्ति मंदीर परिसरात एक मुस्लिम तरुण आणि आदिवासी तरुणी मिळून आले होते. त्यास लव जिहादचे नाव देत तरुणास बेदम मारहाण करण्यात आली होती. मात्र, याप्रकरणी तरुणीने सांगितले माझी चुक झाली आहे. आमची ही पाहिलीच भेट होती. मी अल्पवयीन असले तरी मला माझे आयुष्य या गुन्ह्यात आणि कोण्या जाती धर्मात आडकवून ठेवायचे नाही. माझी चुक झाली ती सुधारते आणि मला आयपीएस किंवा डॉक्टर व्हायचे आहे. त्यामुळे, मी गुन्हा दाखल करणार नाही. अर्थात मुलगी हुशार होती. ती निघुन गेली. त्यानंतर मात्र हिंदुत्वाच्या नावाखाली काही तरुण पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झाले. त्यांनी प्रचंड प्रक्षोभीत भाषणे केली. आम्ही आमचा न्याय आता पोलीस ठाण्याच्या बाहेरच देऊ असे म्हणत अनेकांना गुन्हे करण्यास प्रवृत्त केले. बिन्धास्त तंगडे तोडा, हत्या करा असे म्हणत जबाबदार व्यक्ती चिथावलेल्या समुदायापुढे बोलल्या. तोच आदर्श घेऊन अशरफची हत्या झाली आहे. त्यांच्यावर देखील कारवाई करा अशी मागणी मुस्लिम संघटनांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता.