महसुलमंत्री ना. विखेंच्या बालेकिल्ल्याला थोरात-कोल्हेंचा सुरूंग.! राहत्यात घुसून कारखाना जिंकला.! थोरातांची कॉंग्रेस- कोल्हेंची भाजपा शेतकर्‍यांसाठी एकत्र.!


- सागर शिंदे

सार्वभौम (राहता) :-

आज राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी पार पडली. त्यात सहकारात कधीच दुसर्‍याच्या तालुक्यात जाऊन हस्तक्षेप न करणारे आ. बाळासाहेब थोरात थेट ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील आणि मा. जिल्हापरिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या मतदारसंघात गेले आणि तेथे स्वत:चा पॅनल देखील उभा केला. इतकेच काय! केंद्रात आणि राज्यात सत्ता असणार्‍यांच्या विरोधात तो निवडून देखील आणला. अर्थात सत्ता स्थापन करण्याइतके यश त्यांनी मिळविले. त्यामुळे, सर्वात पहिल्या फेरीत विखे गटाचे ज्ञानदेव चोळके यांनी बाजी मारली आणि एकच जल्लोष झाला. त्यानंतर मात्र, थोरात आणि कोल्हे गटाचे डांगे आणि दंडवते यांनी यांचा विजय होताच जवळजवळ १८ बुथवर थोेरात गटाची छत्री पुढे राहिली. त्यामुळे, निवडणुकीचे सर्व चित्र तेव्हाच स्पष्ट झाले होते. 5 जागा थोरात तर १ जागा विखे आणि बाकी सर्व जागेंवर थोरात गटाचे उमेदवार आठशे ते हजार मतांनी पुढे होते. त्यामुळे, ना. विखेंच्या गडावर जाऊन त्यांच्या किल्ल्यास सुरूंग लावल्याची माहिती जिल्ह्यातील अन्य आमदारांना समजली असता त्यांनी थेट राहता गाठले. विशेष म्हणजे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघात जाऊन खरेदी विक्री संघात त्यांना धुळ चारली होती. एकही जागा त्यांची आली नव्हती. त्यामुळे, त्याचे शल्य मनी घेऊन लंके यांनी थेट थोरात-कोल्हे यांना आनंदगुच्छ दिला आहे.   

गेल्या काही दिवसांपासून ना. विखे पाटील यांनी संगमनेरात जरा जास्तच लक्ष दिले होते. त्यामुळे, थोरात यांच्या कार्यकर्त्यांवर पार उपासमारीची वेळ आल्याचे बोलले जात होते. याचे मुळ कारण म्हणजे गौणखणिज होय, वाळु आणि खडीक्रेशर यांच्यावर लावलेले निर्बंध यातून अनेकांची तस्कारी बंद झाली. शहरात जी काही दंगल झाली किंवा दोन गटात तेढ निर्माण झाली त्याचे खापर देखील थोरात साहेबांनी विखे पाटील यांच्यावरच फोडले. हे सर्व पुर्वनियोजित होते असे म्हणत त्यांनी विखे यांच्यावर जोरदार टिका केली होती. पण, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. त्यामुळे करणार काय? म्हणून विखे यांना धडा शिकविण्यासाठी विवेक कोल्हे यांना दिमतीला घेऊन थोरात साहेबांनी विखेंच्या हाद्दीतील गणेश कारखान्यावर चढाई केली. १० वर्षे विखेंच्या ताब्यात असणार्‍या कारखान्यात कोणताही नवा बदल त्यांना करता आला नाही. येथे विकास करण्यापेक्षा दहशत निर्माण करण्याचे काम यांनी केले, ते दहशत मोडीत काढून कारखान्याचा विकास करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे म्हणून अनेक ठिकाणी भावनात्मक भाषणे झाली.

दरम्यान, राज्यात आणि जिल्ह्यात विखे नावाचा डंका वाजत असताना त्यांनी मिरविलेला टेंभा खोटा कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी थोरात यांनी कंबर कसली होती. निळवंडे धरणााचे विखे यांनी कसे राजकारण केले. शेतकर्‍यांच्या शेतात पाणी सोडण्याऐवजी नको तेथे कसे पाणी ओतले यावर त्यांनी अनेकदा भाष्य केले. तर, तेथे शेतकरी सभासद यांना विश्‍वासात घेऊन गणेश कारखान्याची ही निवडणुक तुमच्या अस्मिता, स्वाभिमान व तत्वाची आहे, तुम्हाला येथील गुलामगीरी कायमची मोडीत काढायची आहे असे म्हणत जनतेला साद घातली. इतकेच काय.! भाजपाचे नेते विवेक कोल्हे यांना देखील विखे पाटील यांनी विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे, बाळासाहेब थोरात यांनी कोल्हे यांना सोबत घेऊन सहकारात कोणताही पक्ष नसतो हे पुन्हा सिद्ध केले. तर, शेतकर्‍यांच्या हितासाठी आम्ही पक्ष देखील बाजुला ठेऊ असे म्हणत विवेक कोल्हे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. आता थोरात आणि कोल्हे हे दोन्ही चेहरे अतिशय स्वच्छ असल्यामुळे आणि गेल्या १० वर्षातील गणेश कारखान्याची प्रगती पाहता थोरात-कोल्हे गटाच्या सभांना प्रचंड गर्दी झाल्याचे पहायला मिळत होते. तेथेच खर्‍या अर्थाने विजय निच्छित वाटू लागला होता.

खरंतर गणेश कारखान्याच्या निवडणुकीत लोणीच्या सरपंच घोगरेताई यांच्या भाषणाने संपुर्ण वातावरण निर्मिती झाली. विखे पाटील यांनी दहशत आम्ही २५ वर्षे जुमानली नाही आणि येणार्‍या काळात देखील आता जिल्हा परिषद आणि अन्य निवडणुकांमध्ये देखील आम्ही बाळासाहेब थोरात यांचे बाहु मजबुत करणार आहोत असे ठणकावून सांगितले. त्यामुळे, घोगरेताईच्या शैलीची जोरदार चर्चा झाली. या सर्व गोष्टी लक्षात घेता थोरात म्हणाले. की, भाजप थोडे दिवस आहे, नंतर कॉंग्रेसच आपल्या साथीला राहणार आहे. आपली परंपरा ही विरोधकांना चिरडून टाकायची नाही. तर, त्यांना सोबत घ्यायची आहे. हीच दहशत मोडीत निघणार आहे आणि आज ती निघाली. खरंतर खा. सुजय विखे पाटील म्हणाले. की, ही निवडणुक माझ्यात सात वर्षाच्या त्यागाची आहे. यात खा. विखे यांना रडू कोसळले होते. मात्र, त्यांच्या त्यागाला सभासद जनतेने नाकारले असून त्यांचा रडून काही फायदा झाल्याचे दिसले नाही. त्यावर थोरात हे विखे यांना कायम टोमणे देत म्हणत होते. तुम्ही मोडायला येतात आणि आम्ही घडवायला जातो असे म्हणून संगमनेरची दंगल आणि गणेश कारखान्याची बांधणी याची तुलना करण्यात आली. आज खर्‍या अर्थाने सभासदांनी थोरात-कोल्हे यांनी गणेश कारखाना घडविण्यासाठी दिला आहे. येणार्‍या काळात ते काय करतात हे पाहणे फार उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण, पुढे जिल्हा बँक देखील विखे पाटील यांच्या ताब्यात आहे...