योगी भोंदु बाबा घरात येतो, मुलीशी लग्न करून अत्याचार करतो, पैशाचा पाऊस पाडतो आणि गनचा धाक दाखवून लाखो रूपये लुटतो-तो भोंदु अटक.!
सार्वभौम (पारनेर) :-
आपण देवऋषी असल्याचे सांगून अनेक विद्या प्राप्त आहे. त्यामुळे, मला पैशाचा पाऊस पाडता येतो, भुत उतरविता येते, घरातील व्यक्तींचे आजारपण दुर करता येते असे म्हणून अगदी सर्वसामान्य घरात जाऊन त्यांची आर्थिक फसवणुक करणे आणि अघोर्या प्रकारे घरातील महिलांचे लैंगिक शोषण करणे. असे प्रकार पारनेर तालुक्यात वारंवार घडत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांना माहिती समजली आणि त्यांनी याप्रकरणी योगी महादेवनाथ बाबा उर्फ कांबळे (वय ४२) यास अटक केली आहे. या बहाद्दराचे कारणामे एकेल्यानंतर अनेकांना घाम फुटेल यात तिळमात्र शंका नाही. मात्र, असल्या भोंदु बाबांना लोक बळी कसे पडतात हेच समजत नाही. म्हणून दुर्गम आदिवासी भाग, अज्ञान व्यक्ती यांनी अशा प्रकारच्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, एका बाबा पारनेर परिसरात काळ्या जादुचा वापर करुन लोकांची दिशाभूल करीत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. दि. २१ जून २०२३ रोजी हा भोंदु वेगवेगळ्या भागात फिरत होता. तो सांगत होता. की, मी देवऋषी आहे, मला काही विद्या प्राप्त झाल्या आहेत. घरात शांती नांदण्यासाठी किंवा घरातील ईडा-पिडा टाळण्यासाठी मी होम हावन करुन देतो. त्यासाठी तो नाना प्रकारच्या अघोर्या विद्या करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तर, याने पारनेर येथे काही ठिकाणी हे प्रयोग देखील केले असून त्यात मुलींचे लैंगिक शोषण देखील केले आहे. म्हणून त्याच्या मुसक्या आवळणे गरजेचे होते.
दरम्यान, याप्रकरणी एका व्यक्तीने योगी बाबाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस थेट पीडित कुटुंबाच्या घरी केले. मात्र, जादुटोणा आणि भानामती याच्या भितीने त्यांनी काहीच सांगितले नाही. परंतु पोलिसांनी त्यांना विश्वासात घेतले आणि नेमकी काय घडले याची विचारणा केली. त्यावेळी त्याने सांगितले. की, योगी बाबा हे आपल्या घरातील मेंढ्या मरु नये यासाठी जादुटोणा करतात. घरातील लोकांचे आजारपण दुर करतात, त्यासाठी ते घरात होम हवन करतात, हा विधी पार पाडल्यानंतर घरात पैशांचा पाऊस पडतो असे म्हणत त्याने संबंधित व्यक्तीकडून ५ लाख ५० हजार रुपये घेतले होते.
यातील आणखी एक धक्कादायक माहीत म्हणजे. या घरातील एका मुलीला काही नैसर्गिक आजार होता. तो दुर करण्यासाठी या योगी बाबाने चक्क एखादे लग्न कसे होते. त्याप्रमाणे होम हवन करुन, त्यांने मुलीच्या गळ्यात हार आणि मंगळसुत्र घालुन, एकमेकांचे लग्न झाले आहे अशा प्रकारचे फोटो मोबाईलमध्ये काढले आणि बाबा येथेच थांबला नाही. तरी त्याने मुलीवर अत्याचार केला आणि नंतर सांगितले. की, मुलीचा आजार दुर झाला आहे. मात्र, हा सर्व प्रकार तोतया असल्याचे संबंधित कुटुंबास लक्षात आले असता त्यांनी योगी बाबाला धडा शिकविण्याचे ठरविले. मात्र, तोवर योगी बाबाने ऐअरगनचा धाक दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आणि तो पसार झाला. मात्र, हा प्रकार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी योग्य रितीने हताळला आणि योगी बाबास बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पीएसआय उगले, शिवाजी कडूस, गणेश डगळे, जालिंदर लोंढे, गहिनीनाथ यादव, सुरज कदम, अनिल रोकडे, मयुर तोरमल, सारंग वाघ, सागर धुमाळ, विवेक दळवी आदी पथकाने केली.
तुम्ही तरी सावध व्हा..!
खरंतर, नोकरी करणारे शिक्षक, पोलीस, तथा बँक आणि अन्य कर्मचारी यांनी त्यांच्या घरी याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. की, कोणी अज्ञात इसम येतो आणि जादु, हातविक्री आणि काही स्किम घेऊन घरात घुसतो. कधी वृद्धांच्या गळ्यातील सोने चोरतो तर कधी घरातील साहित्या. त्यामुळे, घरातून बाहेर पडताना घरातील सुज्ञ व्यक्तीने अशा काही सुचना दिल्यास येणार्या काळात काही अनर्थ टळु शकतात. त्यामुळे, या गोष्टीपासून अनेकांनी धडा घ्या आणि आपल्या कुटुंबासह नातेवाईकांना देखील संपर्क करुन माहिती द्या. संकट उभे राहण्यापुर्वी त्यावर मात केेलेली कधीही चांगली..!!!