चक्का इयत्ता ९ वी ची विद्यार्थीनी तीन महिन्याची गरोदर.! तो रोज घरी यायचा, नंतर पळवून घेऊन गेला. शेतात संसार थाटला, गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम (अकोले) :- 

                         इयत्ता ९ वीच्या वर्गातील मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातील विरगाव परिसरातून उघड झाला आहे. जवळच्या आणि विश्वासातील एका तरुणाने या विद्यार्थीनीसोबत प्रेमाचे नाटक करुन तिला गोलमाल बोलून आपल्या जाळ्यात ओढले. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणत तिचा विश्वास संपादन केला. जेव्हा पीडितेचे आई-वडिल कामाला निघून गेले तेव्हा या गड्यानं संधी साधली आणि थेट तिला पळून घेऊन गेला. मात्र, आपली समाजात इज्जत जायला नको, नातेसंबंधांमध्ये हासू व्हायला नको म्हणून पीडित मुलीच्या आई वडिलांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही. पीडित मुलीचा त्यांनी शोध घेतला असता ती मिळून आली नाही. नंतर मात्र दि. १६ जून २०२३ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या कुटुंबाला माहिती मिळाली. की, आपली मुलगी आरोपी आकाश राजू उघडे (रा. शेळके वस्ती, नांदुरी दुमाला,   ता. संगमनेर, जि. अ. नगर) याने पळवून नेली असून तो विरगाव शिवारात एका नाईकवाडी यांच्या शेतात राहतो आहे. त्यामुळे, त्यांनी पोलिसांना माहिती देऊन तेथे चौकशी केली असता आकाश व मुलगी तेथे मिळून आले. पीडित तरुणी ही त्यावेळी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे, पोलिसांनी मुलीच्या पालकांच्या फिर्यादीनुसार अकाश उघडे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.   

            याबाबत सविस्तर माहिती अशी. की, सहा महिन्यापुर्वी पीडित मुलीची आई मजुरी कामासाठी गावात गेली होती. तेव्हा पीडित बालिका ही घरी एकटी होती. तेव्हा आरोपी आकाश राजु उघडे हा घरी आला आणि मुलीस लग्नाचे अमिष दाखवून नको नको ते चाळे करु लागला. मी तुझ्यावर प्रेम करतो वैगरे सांगून तो तिला पळवुन घेवुन गेला. त्यानंतर घरच्यांनी मुलीचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. पीडितेचे पालक हे आडाणी असल्याने त्यांना कायदेशिर फार काही ज्ञान नाही. मात्र, मुलगी ही आकाश उघडे यानेच पळवून नेल्याचा त्यांना संशय होता. मात्र, शाश्वत माहिती नव्हती आणि पोलीस, कोर्ट कचेरीपेक्षा पोटाचा प्रश्न फार मोठा होता. त्यामुळे पालकांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही. इतका काळ  लोटला तरी मुलीचा शोध लागला नाही. मात्र, या दरम्यान पालकांचा शोध सुरुच होता. ते आकाश उघडे याच्या शोधात होते.

            दरम्यान, दि. 16 जून 2023 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पीडितेचे पालक विरगाव गावामध्ये गेले असत त्यांना आकाश उघडे हा विरगाव गावचे शिवारात मुलीस घेवुन राहत असल्याचे समजले. तेव्हा पीडितेच्या पालकांनी त्यांचे काही नातेवाईक यांना बोलावून घेत विरगाव शिवारात नाईकवाडी यांचे शेतात धाड टाकली. तेथे आकाश हा अवघ्या ९ वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीस घरात घेवुन राहत होता. जेव्हा हे सर्वजण तेथे पोहचले तेव्हा मुलगी प्रचंड घाबरलली होती. तिने पालकांना सांगितले. की, आकाश राजु उघडे हा आपले घरी यायचा तेंव्हा तो मला बोलला. की, तु मला फार आवडतेस, मी तुझ्या सोबत लग्न करतो असे म्हणुन तो सहा महिन्यापुर्वी आपण कोठेतरी जावुन लग्न करु असे म्हणाला. त्यानंतर तो बळजबरी येथे मला घेवून आला आहे. येथे आल्यापासून त्याने माझ्यावर वेळोवेळी शरीर संबंध ठेवले असुन मला त्याच्यापासुन दिवस गेले आहे. तसेच मी आकाशा अनेकदा म्हणाले. की, मला माझ्या आईकडे जायचे आहे. तेव्हा तो म्हणाला. की, तु जर तुझ्या आईच्या घरी गेली तर तुला व तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी त्याने दिली होती.

               दरम्यान, पीडित मुलीच्या पालकांना जो संशय होता. तो अगदी खरा ठरला. मुलगी अल्पवयीन आहे, ती नववी कक्षेत शाळेत जाते हे सर्व माहित असताना देखील आकाश उघडे याने तिला लग्नाचे अमिष दाखविले. मुलीची इच्छा नसताना तिच्यासोबत संसार थाटण्याचा प्रयत्न केला. मुलीस आई वडिलांकडे जायचे असताना देखील तिला बळजबरी डांबून ठेवले आणि तिला शिविगाळ, दमदाटी करुन धमक्या दिल्या. हा सर्व प्रकार माहित झाल्यानंतर पीडितेच्या पालकांनी आरोपी यास थेट पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पीडितेच्या पालकांच्या फिर्यादीनुसार आकाश राजु उघडे (हल्ली रा. विरगाव ता. अकोले मुळ रा. शेळके वस्ती नांदुरी दुमाला ता संगमनेर) गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून उघडे यास अटक केली आहे.