ये बाबो.! अकोल्याच्या अधिकार्‍यासह ५० जणांनी २० खोके दारु, ४ बोकड आणि ४० कोंबड्यांची बिर्यानी फक्त केली. डोक्यावर बाटली ठेवून कंबरेला झटके देत भन्नाट डास, व्हिडिओ व्हायरल.!

  

सार्वभौम (अकोले) :-

      सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात असणार्‍या बीजगुण नर्सरीत कृषी विभागाच्या ५० अधिकार्‍यांची पार्टी आयोजित केली होती. एखाद्या रेव पार्टीला लाजवेल अशी ही अधिकार्‍यांची ठुमकेदार पार्टी यात २० ते २५ दारुचे खोके, ४ बोकड आणि ४० कोंबड्यांची बिर्यानी या बहादरांनी रिचविली. ही पार्टी ११ जून २०२३ रोजी आयोजित केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यात कृषी विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांचा सामावेश होता. तर, विशेष म्हणजे अकोले तालुक्यातील कृषी विभागात जबाबदार पदावर असणार्‍या एका अधिकार्‍याचा देखील सामावेश होता. यात याहुन रंजक गोष्ट म्हणजे हे अधिकारी महोदय उतरतीला असले तरी यांनी अगदी तरर्र होऊन आपल्या डोक्यावर दारुची बाटली ठेवली आणि एखाद्या नाच्या बाईसारखे कंबरेला ठुमके देत लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखर्‍याचं अशा गाण्यावर ठेका धरला. त्यामुळे, कृषीप्रधान देशात अशा प्रकारचे कृत्य, त्यात वादळी वार्‍याने झालेले नुकसान, शेतकर्‍यांनी मदत याची काही तमा यांना आहे की नाही? असा प्रश्‍न पडला आहे. ही पार्टी एका पत्रकारास समजली असता त्याच्या हाती सर्व पुरावे लागले असून या प्रकरणाची चौकशी आता सुरू झाली आहे. तर अकोले तालुक्याचे "हासे" करणाऱ्या व्यक्तीस खात्यातून बडतर्फ करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, मुसळगाव परिसरात एका नर्सरीत आजी-माजी कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीसाठी दुसरे तिसरे कोणी नव्हे.! खुद्द एक सहायक संचालक सहमत होते. असे बोलले जाते. की, हे महाशय सरकारी निधीमध्ये फार मोठा मलिदा खातात, त्यांची एक मोठी साखळी असून त्या साखळीत संलग्न असणारे सर्व मेंबर पार्टीला निमंत्रीत केले होते. यात काही अपवाद असतीलही मात्र ज्यांची चलती आहे त्यांनी यात चांगलाच पुढाकार घेतला होता. त्यामुळे, नाशिक जिल्ह्यासह अजाबाजुच्या अधिकारी कर्मचार्‍यांना देखील बोलविण्यात आले होते.

अर्थात गेट टुगेदर नक्की असावे, पण त्यास एक सामाजिक किनार देखील असावी. जसे की, आजी माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर केले तर ते सर्वजण मिळुन शाळेला निधी देतात, काहीतरी भेटवस्तु देतात, गरिब विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करतात. येथे मात्र, भलतेच गेट टुगेदर झाले. सुत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार या पार्टीत २० ते २५ दारुचे खोके आणले गेले होते. तर, त्यात काही वेळा चकना देखील होता. तोंडी लावण्यासाठी सुके मटन आणि ४ बोकड त्याची भाजी देखील होती. या व्यतिरिक्त यांनी ४० कोंबड्या घेऊन त्याची स्पेशल बिर्यानी देखील करण्याची ऑर्डर दिली होती. हा खेळ येथेच थांबला नाही. तर, खाना पिना, गाना बजाना और गाडीमे होगा सनम, पॅम्पॉम..!! या गाण्याप्रमाणे सर्व सुविधा करण्यात आली होती.

खरंतर, मुसळगाव येथे पार्टी झाली म्हणजे तिला काहींनी अक्षरश: रेव पार्टी म्हणून संबोधीत केले. या पार्टीतील प्रमुख आकर्षण ठरले ते अकोले तालुक्यातील एक जबाबदार पदावर असणारे एक कृषी अधिकारी. यांनीतर इतके मद्य प्रशान केले होते. की, त्यांना आपण अधिकारी आहोत हेच सुधरले नाही. एखाद्या नाच्या प्रमाणे त्यांनी एका गाण्यावर ठेका तर धरलाच.! मात्र, दारुची बाटली डोक्यावर घेऊन त्यांनी अप्रतिम ठुमके लावले. कंबरेला झटके देत डोक्यावरील दारूची बाटली नाचवून उपस्थितांचे मनोरंजन केला. या अधिकार्‍याने मस्तानीला लाजवेल असे नृत्य केल्याने तेथील उपस्थितांनी वा..! वा..! पेश किया जाय असे म्हणत प्रचंड दाद दिली. आता सगळेच तरर्र असल्यामुळे तेथे काय परिस्थिती असेल याची कल्पना न केलेली बरी.

खरंतर, शेतकरी आज प्रचंड संकटात आहे. रोज वादळ सुुरू आहे. उद्या देखील वादळी वार्‍याची शक्यता आहे. गुजरातमध्ये वादळ दाखल झाले असून केरमध्ये मानसुन दाखल झाला आहे. अशात शेतकर्‍यांची चिंता करण्यापेक्षा हे लोक अशा पद्धतीने नाचगाणे करुन नंगानाच करीत असतील तर यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे. यांची सखोल चौकशी यांना खात्यातून बडतर्फ केले पाहिजे. तर, यास कोणत्या अधिकार्‍याची फुस होती. त्याची देखील चौकशी करुन त्यांना देखील अशाच प्रकारचे ठुमके लावण्यासाठी कामातून कायमचे काढून टाकले पाहिजे. अशा प्रकारची मागणी होऊ लागली आहे. तर, या घटनेची चौकशी सुरू झाल्याचे देखील बोलले जात आहे.