संगमनेरात पुन्हा लव जिहादचा प्रयत्न.! फार्मसीच्या मुलीचे अपहरण करुन बिहारला नेण्याचा प्रयत्न.! दोघांवर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
राज्यात लव जिहाद सारखे प्रकारण प्रचंड तापलेले असताना पुन्हा-पुन्हा तरुणांकडून चुका होताना दिसत आहेे. विशेष म्हणजे संगमनेर शहरात हजारो सकल हिंदु बांधव रस्त्यावर उतरले असताना देखील येथे लव जिहाद सारखे प्रकार घडणे हे फार दुर्दैवी आहे. भगवा मोर्चा निघुन आजून १५ दिवस उलटले नाही. तोच पुन्हा एका हिंदु तरुणीचे अपहरण करुन तिला बिहार येथे नेण्याचा प्रयत्न झाला. केवळ पबजी आणि व्हाटसऍपच्या माध्यमातून दोन तरुण संगमनेरात येतात आणि मुलीची इच्छा नसताना तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करतात. हा किती भयानक प्रकार आहे. वेळीच मुलीने आरडाओरड केली आणि तिच्या मदतीला काही तरुण धावून आले. त्यांनी दोघां तरुणांना पकडले आणि थेट पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार आज दि. १६ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कसारा दुमाला परिसरात घडला. याप्रकरणी अकरम शहाबुद्दीन शेख व नेमतुल्ला शेख (दोघे रा. अलीनगर, दरभंग,बिहार) दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, पीडित तरुणी ही संगमनेर येथील एका नामांकीत कॉलेजमध्ये बी फार्मसी करत असून ती चौथ्या वर्षाच शिक्षण घेत आहे. ती २०१९ पासून व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम अकाउंट चालविते. त्याचा वापर देखील ती करते. त्यावर पबजी गेममधील बीजीएमआय हा खेळ खेळते. त्या पब्जीवर अकरम तिची ओळख शहाबुद्दीन शेख याच्यासोबत झाली होती. ती मैत्री अगदी दोन वर्षापूर्वीपासून होती. त्यानंतर त्याने पीडितेकडे व्हॉटसअप नंबर मागितला आणि त्यानंतर त्यांची चॅटींग व कॉलिंग देखील होत होती. अगदी पदजीवर देखील बोलणे होत होते. त्यानंतर यांच्या मैत्रीला फार विरह सहन झाला नाही. म्हणून यांनी दि. ११ जून २०२३ रोजी संगमनेर येथे भेटण्याचे ठरले.
दरम्यान, ठरल्यानुसार अकरम शेख हा आज दि. १६ जून २०२३ रोजी सकाळी ०९.३० वा. संगमनेर बस स्थानक येथे भेटण्यासाठी आला होता. तेथुन अकरम याने पीडितेस फोन करुन सांगितले कि, मी संगमनेर बस स्थानकाला आलेलो आहे. येथे मला काही माहित नाही. त्यामुळे मी गुगलवर हॉटेल सर्च केले असता मला कसारा दुमाला परिसरात एक रिसॉर्टचे ठिकाण भेटल आहे. मी आता त्या रिसार्ट थांबतो. माझे सोबत माझा मित्र नेमतुल्ला देखील असून आम्ही तेथे जाऊन आम्ही जरा फ्रेश होतो. तु मला त्या ठिकाणी भेटायला ये असे त्याने सांगितले. त्यानंतर पीडित मुलगी देखील सकाळी १० वा. चे सुमारास अकरम यास भेटण्यासाठी संबंधित रिसॉर्ट येथे गेली. तेव्हा त्याठिकाणी अकरम व त्याचा मित्र नेमतुल्ला असे दोघे आलेले होते. तेथे पीडित मुलगी आणि या दोघांनी गुलूगुलू गुप्पा मारल्या. परंतु, तेथे त्यांना फार सटीक वातावरण मिळाले नाही. म्हणून आरोपी अकरम तिला म्हणाला. की, येथे फार लोक आहेत, आपण थोडे लांब निवांत जागेवर जावुन बोलू, जेथे आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. तेव्हा पीडित तरुणी त्यास म्हणाली. की, तुला काय बोलायचे ते येथेच बोल, बाकी ठिकाणी मी येणार नाही. परंतु त्याने तिला विनंती केली. आम्ही इतक्या लांबून तुला भेटायला आलो आहे आणि तू एकांतात येऊ शकत नाही? पण तरीही मुलीने नकार दिला. मात्र नंतर हे
दरम्यान, तिघे थेट कासार दुमाला रोडकडे गेले. त्यावेळी आरोपी अकरम व पीडित मुलगी यांच्यामध्ये गप्पा चालु होत्या. तेव्हा आरोपी म्हणाला तु माझे सोबत माझ्या गावाकडे बिहारला चल, तु मला खुप आवडतेस, आपण दोघे लग्न करू. त्यावेळी पीडित तरुणीने त्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा ती म्हणाली, तुला केवळ मित्र या नात्याने भेटण्यासाठी आलेली आहे. तुझ्या सोबत लग्न करणे किंवा तुझ्या सोबत पळुन जाणे असा कुठल्याही प्रकारचा विचार माझे मनात नाही. असे ठणकावून सांगत असताना तिने दोघांच्या मनसुब्यावर पाणी सोडले आणि ती तिच्या घरी जाण्यासाठी निघाली. तोच अकरम याने बळजबरीने तिचा हात पकडला आणि म्हणाला. की, तुला माझे सोबत यावेच लागेल. मी तुझ्यावर प्रेम केले आहे. त्याने पुन्हा हात धरला आणि तिला काही अंतरावर बळजबरीने ओढत नेले. तेव्हा मुलगी प्रचंड घाबरली.
तर त्याच वेळी अकररमचा मित्र नेमतुल्ला हा देखील पीडितेला धमकावून सांगत होता. तुला आमचे सोबत यावेच लागेल. नाही तर आम्ही तुझ्या घरी येवुन तुझे व अकरम याचे प्रेमसंबंध आहे असे सांगू. या दोघांचा हेतू लक्षात आल्यानंतर पीडित मुलीशी त्यांची चांगलीच हुज्जत सुरु झाली. दोघांची धिटाई लक्षात घेऊन मुलीने एकच आरडाओरड केली. त्यानंतर रस्त्याने जाणारे काही लोक तेथे जमा झाले. त्यांनी मुलीस विचारले की काय झाले आहे? तु अशी मोठ मोठ्याने का ओरडत आहे. त्यावेळी तिने घडलेला प्रकार कथन केला. तेव्हा उपस्थित जमावाने अकरम शेख व नेमतुल्ला यांना ताब्यात घेतले व मुलीची सुटका केली. नंतर हा प्रकार पोलीसांना कळविला आणि दोघांना वर्दीच्या ताब्यात दिले. नंतर पीडितेच्या फिर्यादीनुसार संगमनेेर शहर पोलीस ठाण्यात दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.