राजकीय सुडाने संगमनेरला अस्थिर करण्याचा प्रयत्न.! थोरातांचा विखेंना टोला, बंद आणि मोर्चे कशासाठी?
सार्वभौम (संगमनेर) :-
जोर्वे नाक्यावर दोन गटांमध्ये कायम खदखद व्यक्त होत होती. त्याची अनेक कारणे असतील मात्र, त्यावर प्रशासन कधीही तोडगा काढू शकले नाही. नंतर त्याचे रुपांतर इतके रौद्र रुप धारण करेल असे कोणाला वाटले नाही. आता जे घडले त्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. गुन्हे दाखल झाले, अतिक्रमण हटले आणि जोर्वे नाक्यावरील दहशत देखील मोडीत काढली. मग आता बाकी स्टण्ट आणि मोर्चेगिरी काशासाठी? तर हा केवळ जातीय तणाव वाढविणे, संगमनेर शहराला अस्थिर करणे, राजकीय दृष्ट्या शहरात स्थैर्य मिळविणे अशी नाना करणे दिसत असल्याचे बोलले जात आहे. खरंतर हे संगमनेरच्या संस्कृतीला शोभा देणारे नाही, येणार्या भविष्यकाळाला पुरक नाही, येथील जातीय आणि धार्मिक परंपरेला देखील साधक नाही. त्यामुळे, जोर्वे नाका प्रकरण आता तरी थांबविले पाहिजे असे येथील सुज्ञ नागरिकांना वाटते आहे.
मोर्चाने काय होईल.!
कत्तलखाने बंद व्हावे म्हणून २०२१ मध्ये प्रांत कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. झाले काय? संगमनेरात आजही कत्तलखाने चालुच आहेत. अगदी जमजम कॉलनीत सुद्धा. त्यातून नवे कट्टर जात आणि धर्मनिष्ठांनी जन्म घेतला. तर, अनेकांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. त्यानंतर पुन्हा मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढला. त्यातून तोडीस तोड उत्तर सोडता काय होते? मग उत्तराला प्रतिउत्तर असेच सामाजिक वातावरण दुषित करायचे आहे का? राज्यात आणि देशात काय होतय त्याची तुलना आपल्या भागात करुन चालणार नाही. कारण, एका भागात योगी जन्मतात तर दुसर्या भागात एपीचे अब्दुल कलाम त्यामुळे, संगमनेरात तरी राजकीय हितासाठी जात आणि धर्माची कट्टरता निर्माण होणार नाही. यासाठी काळजी घेतली पाहिजे. हे काम विशेेत: प्रशासनाचे आहे. लोकशाहीने अधिकार दिला हे अनेकांना समजते मात्र, लोकशाहीने जबाबदारी दिली. त्याची जाणिव अनेक समाजकंठक तथा राजकारण करु पाहणार्यांना होत नाही.
सुपातील उद्या जात्यात येतील.!
खरंतर, भारतीय समाज व्यवस्था फार उत्तम संस्कृतीने उभी राहिली आहे. मात्र, तिला राजकारणी आणि काही समाजकंठकांनी गालबोट लावले आहे. कधी जातीचे, कधी धर्माचे तर कधी सत्तेचे कार्ड वापरुन सामाजिक वातावरण दुषित केले आहे. म्हणजे, जेव्हा मुस्लिम व्यक्तीवर अन्याय होतो तेव्हा हिंदुंच्या विरोधात मोर्चे, आंदोलने होतात. मग हा कड काढण्यासाठी कधी हिंदुंच्या व्यक्तीवर अन्याय झाला की मुस्लिम बांधवांच्या विरोधात मोर्चे, आंदोलने होतात. मुळ अन्याय ज्याच्यावर झाला त्याला जाळपोळ, दगडफेक, गुन्हे, जेलवारी आणि कोर्टाच्या पायर्या चढण्यास बिल्कुल स्वरस्य नसते. मात्र, कोणी एक नेता, युवा, भाई, दादा स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी डोंगर पेटवून शेकोटी करण्याचा घाट घालत असतो. त्यानंतर तो समाज्याच्या दृष्टीने मसिहा, आधारस्तभं आणि मग नेता होऊन नगरसेवक, आमदार खासदार होतो. त्यामुळे, असल्या समाजकंठकांच्या नादी न लगता वाद झाल्यानंतर समोपचाराने बसले पाहिजे, पुन्हा एकत्र रहाचे आहे तर मतभेद व मनभेद कशासाठी? म्हणून या लबाडांच्या नादी लागुन सामाजिक वातावरण खराब होणार नाही याची सुज्ञ नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.
संगमनेरात राजकाणाची एन्ट्री.!
दि. ३ आक्टोबर २०२१ रोजी संगमनेरात पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी छापा टाकला होता. त्यात १ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात सलग १८ तास आंदोलन केले होते. तेव्हा तत्कालिन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या बदलीची मागणी करण्यात आली होती. मात्र, तत्कालिन महसलमंत्री आ. थोरात साहेब यांनी देशमुख यांना पाठीशी घातले. त्यामुळे, आंदोलकांनी आपला मोर्चा विद्यमान महसुलमंत्री विखे पा. यांच्याकडे वळविला होता. त्यांनी आंदोलकांनी प्रचंड साथ दिली. तेव्हापासून येथील कार्यकर्त्यांचे बळ अधिकाधिक वाढत गेले. इतकेच काय.! तर संगमनेरात थेट विखे पाटील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. नंतरच्या काळात देशमुख यांची देखील बदली करण्यात आली. आता ना. विखे पा. हे येथील कार्यकर्त्यांना वाळु ते हिंदुत्व अशा अनेक कारणांना चांगले बळ देतात. त्यामुळे, येणार्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संगमनेरातील राजकारण हे फार भयानक पद्धतीने तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक ठिकाणी जातीयवाद निर्माण होईल अशा पद्धतीचे स्टेटस आणि मेसेज सेंड केले जात आहेत. त्यामुळे, दोन गटात प्रचंड मनभेद निर्माण होत असून जो तो आपापल्या पद्धतीने जात आणि धर्माचे समर्थन करताना दिसत आहे. त्यामुळे, समाजात फार विघातक पद्धतीने वातावरण बदलत चालले आहे. त्यामुळे, पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी फार महत्वाची भुमिका बजावली आहे. ज्या व्यक्तींचे स्टेटस आणि समाजात तेड निर्माण होईल असे मेसेज असेल. त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर, सामाजिक वातावरण दुषित होणार नाही यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.