महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी सागर शिंदे यांनी नियुक्ती...
सार्वभौम (संगमनेर) :-
पत्रकार कसा असावा तर निर्भिड, निष्पक्ष आणि कधीही कोणाची लाचारी न करता भ्रष्टाचारावर आपल्या लेखणीतून संहार करणारा. सत्यास सत्य आणि वाईटास वाईट म्हणून आपल्या लेखणीतून मांडणारा, लोकशाहीचे रक्षण करुन अगदी सामान्य व्यक्तीला बातम्यांच्या माध्यमातून न्याय देणारा, लोकशाहीला पुरक आणि पुरोगामी विचारांचे संरक्षण करणारा असे पत्रकार आपल्याला एकसंघ करायचे आहे. त्यातून पुरोगामी पत्रकार संघ देशात उभा करायचा आहे. अशा प्रकारचे प्रतिपादन पुरोगामी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष संतोष जाधव यांनी केले. संगमनेर येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुरोगामी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी रोखठोक सार्वभौमचे संपादक सागर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीस राज्यातून नाशिक जिल्हाध्यक्ष रफीक सय्यद, प्रदेश महिला अध्यक्षा मनिषाताई पवार उपस्थित होत्या.
ते पुढे म्हणाले. की, देशातील लोकशाही टिकविण्यासाठी येणाऱ्या काळात नव्हे.! तर, अगदी आजच माध्यमांनी प्रबळ होणे गरजेचे आहे. राजकीय लोक राजरोस आपल्याला लोकशाहीचा गळा घोटत आहेत, प्रशासकीय यंत्रणा पुढाऱ्यांच्या दावणीला बांधली आहे. कालपर्यंत आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणत होतो, दुर्दैवाने सगळी वाटचाल अधोगामी दिशेने सुरु आहे. या सर्व प्रकाराला जर कोणी सुतासारखा सरळ करु शकतो. तर तो केवळ लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. दुर्दैवाने आजकाल पत्रकारीता ही व्यावसायीक आणि लाचार होऊ पहात आहे. पत्रकारीतेत जे तत्व होते, वैचारिक नैतिकता होती ती आजकाल पहायला मिळत नाही. म्हणून आपल्याला तो पुरोगामी विचारांचा वसा चालवायचा आहे. दर्पन, प्रबुद्ध भारत, मुकनायक, बहिष्कृत भारत या वृत्तपत्रांचे हेतू सत्यात उतरवायचे आहेत, म्हणून खऱ्या अर्थाने पुरोगामी पत्रकार संघाचा जन्म झाला आहे. आमच्याकडे धनबलाढ्य पत्रकार किंवा प्रशासकीय यंत्रणेच्या मुंढीवर बसून बक्कळ पैसा कमविणारे पत्रकार मुळीच नाहीत. पण, ग्रामीण मागातील सामान्य मानसांसाठी जीनाचे राण पेटविणारे पत्रकार नक्की आहेत. आमच्याकडे बुकी, आड्डे आणि सट्टेबहाद्दर नाहीत तर अवैध कृत्यांच्या मानगुटीवर लेखणीचा वार करणारे पत्रकार नक्की आहेत. त्यामुळे, संयमाने का होईना आम्ही लोकशाहीचा कोलमडलेला चौथा स्तंभ नक्की उभा करु असा आशावाद जाधव यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोखठोक सार्वभौमचे संपादक सागर शिंदे होते. तर, सूत्रसंचालन सतीश फापाळे यांनी केले, प्रस्थाविक नवनाथ गाडेकर यांनी तर आभार नवनाथ वावरे यांनी मानले.
लोकशाही बळकट करायची आहे.!
आपल्याला पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून वैचारिक मोट बांधायची आहे. छत्रपती-फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपायचा आहे. आजकाल लोकशाहीचा चौथा स्तंभ पुर्णत: कोलमडलेला आहे. त्याची धुरा आपल्याला वैचारिक पुरोगामी विचारांनी पेलायची आहे. आज पत्रकारीता कशी आणि कोणत्या दिशेला चालली आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, त्या पत्रकारीतेचा चेहरा आपल्याला पुन्हा स्वच्छ करायचा आहे. म्हणून पुरोगामी विचारांचे संघटन बांधायचे आहे. आज आपला संघ राज्यात आणि देशात नव्या जोमाने काम करत आहे. जे लोक पत्रकारीतेत चांगले आहेत त्यांना संधी देणे आणि त्यांना बळ देण्याचे काम या संघाच्या माध्यमातून सुरु आहे. या देशात लोकशाही बळकट करायची असेल तर तिचा चौथा स्तंभ मजबुत असणे गरजेचे आहे. म्हणून आपण प्रामाणिक पत्रकार एक होणे गरजेचे आहे. अन्यथा येणारा काळ अधिक भयानक असेल.
- रफिक सय्यद ( नाशिक जिल्हाध्यक्ष)
पत्रकारांच्या न्यायी हक्कासाठी लढणार.!
महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाने मला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून जी संधी दिली आहे. त्यासाठी मी सार्थ ठरण्याचा प्रयत्न करेल, पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांना व त्यांच्या कुटुंबांना संरक्षण, पत्रकारांच्या न्यायी हक्कासाठी सदैव प्रयत्न करणार आहे. पुरोगामी पत्रकार संघ अधिक बळकट होण्यासाठी प्रामाणिक पत्रकारांची मोट बांधण्याचे काम आम्ही करणार आहोत. संघात ज्या काही समित्या आहेत, त्यांची नियुक्ती करणे, त्यांना बळ देणे, अधिवेशन घेण्यासाठी पुरक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यात आणि देशात जे काही लोकशाही विरोधात षड़़यंत्र चालु आहे. त्यासाठी वैचारिक टिम उभी करुन संविधानाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पत्रकार आणि त्यांचे संरक्षण यासाठी मंत्रालय ते प्रत्येक प्रशासकीय ठिकाणी कगदोपत्री पाठपुरावा करणार आहे. मला जी संधी राष्ट्रीय व राज्य पातळीच्या कार्यकारणीने संधी दिली. त्या सर्वांचे आभार. तसेच, आमदार, खासदार, सहकारी, हितचिंतक, मित्र परिवार यांनी जो यथोचित सन्मान केला त्या सर्वांचे आभार.
- सागर शिंदे (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष)