चौथीच्या मुलीवर नराधमाने केला अत्याचार.! लग्न समारंभातील प्रकार, आकांत वेदनांचे काहुर, गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
लग्नाला गेलेल्या एका ९ वर्षाच्या चिमुरडीला शेतात नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी परिसरात घडली आहे. लघुशंकेसाठी गेलेल्या चिमुरडीला अमिष दाखवून एका नराधमाने हे कृत्य केल्यानंतर एखाद्या जवळच्या व्यक्तींवर देखील विश्वास ठेवावा की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलीस जेव्हा त्रास होऊ लागला तेव्हा चौकशी केली आणि या घटनेतील सत्य उजेडात आले. ही घटना दि. १५ मे २०२३ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रमेश जयराम सांगळे (रा. सोनेवाडी, ता. संगमनेर, जि. अ.नगर) या नराधमावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक देविदास ढुमने यांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोनेवाडी परिसरात एका तरुणाचा विवाह होता. त्यासाठी काही पाहुणे मुंबईहून गावाकडे आले होते. दि. १५ मे २०१३ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास हाळदीला सुरूवात झाली होती. तेव्हा पीडित चिमुरडी ही आपल्या आईसोबत बसली होती. हाळद सुरू होती, गावातील मुले गाण्यावर नाचत होत्या त्यामुळे कार्यक्रम चांगलाच रंगत आला होता. तेव्हा अचानक पीडित मुलगी तिच्या आईजवळून उठली आणि बाजुला गेली. अर्थात लघुशंकेसाठी गेलेल्या पीडितेवर रमेश सांगळे या नराधमाचा डोळा होता. तो लागलीच तिच्या मागेमागे गेला.
दरम्यान, पीडित बालिकेला त्याने हाताशी धरले आणि म्हणाला. की, चल मी तुला तुझ्या आजीकडे नेतो. अर्थात मुलांना आई-वडिलांप्रमाणे आजी बाबांचा देखील प्रचंड लळा असतो. त्यामुळे, पीडित मुलगी या नराधमासोबत निघाली. मात्र, याने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेतला आणि थेट अंधार गाठला. तेथे गेल्यानंतर या नालायक मानसाने तिच्याशी अंगलट करण्यास सुरूवात केली. अवघ्या ९ वर्षाच्या बालिकेला तो नवरा बायको काय करतात असे सांगु लागला. तिच्यासोबत अश्लिल बोलणे आणि अश्लिल कृत्य करु लागला. या नराधमातील दैत्या जेव्हा शांत झाला तेव्हा त्याने या बालिकेला पुन्हा मंडपात आणून सोडले.
दरम्यान, बराच वेळ झाला तरी तु लवकर आली नाही, कुठे बसली होती? असे आईने विचारले. तेव्हा ही चिमुरडी प्रचंड घाबरलेली होती. तिच्या अंगाचा थरकाप सुटला होता. त्यावेळी आईने तिला धिर दिला. ही अशी का करते आहे? म्हणून आजी आणि अन्य नातेवाईक यांनी विचारले असता ही चिमुरडी बोलती झाली. त्यानंतर तिने सांगितले. की,आरोपी रमेश सांगळे याने तिला एका शेतात नेले होते. तेथे तो काय-काय बोलला आणि काय-काय केले हे सांगितले. तर तिला काय त्रास होतोय हे देखील कथन केले. त्यानंतर घडलेला प्रकार सर्वांच्या लक्षात आला. ही घटना इतकी गंभीर आणि अशोभनिय होती. की,ती एकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यातून पाणी आले. त्यानंतर या नराधमास कोणत्याही प्रकारे अभय न देता त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाल्यांचे संरक्षण, मोठे आव्हान.!
खरंतर, समाज इतका विकृत होत चालला आहे. की, कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही. हेच समजेनासे झाले आहे. त्यामुळे, खुद्द पालकांनी आपल्या पाल्याची प्रत्येक पावलोपावली खबरदारी घेतली पाहिजे. तर, पोलिसांनी अशा प्रकारच्या विकृत व्यक्तीचे दोषारोपपत्र अगदी प्रबळ बनवून असले खटले अंडरट्रायल कसे चालतील याकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षा ही भविष्यातील गुन्ह्यांसाठी प्रतिबंधात्मक असतेे. त्यामुळे, तशा पद्धतीने सक्षम तपास केला पाहिजे. तर, ही घटना वगळता पालकांनी आपल्या पाल्याचे पालक या व्यतिरिक्त मित्र म्हणून बोलले पाहिजे, त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे. त्यांच्या शिक्षकांशी बोलले पाहिजे. असे झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील असे मत समुपदेशक प्राची सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.