एकतर्फी प्रेमातून प्रेयसिच्या कामावर आणि घरासमोर मजनुचा फुल राडा, तू माझे प्रेम आहे, मग बोलत का नाही? बाप आणि भावास मारहाण, गुन्हा दाखल!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                  संगमनेर शहरातील टॉपटेन परिसरात एका तरुणाने 19 वर्षीय युवतीशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. 13 मे 2023 रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली. 19 वर्षीय तरुणी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन फोन केला. "तु खाली येते की, मी वर येऊ" असे बोलुन खाली बोलवले . तेथे येताच तो म्हणाला की, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशी का बोलत नाही. असे म्हणुन त्याने आपल्या प्रेयसिचे केस धरून तिला खाली पाडले व अंगातील टीशर्ट धरून ओढले. सदरचा प्रकार वॉचमनने पहिला असता वॉचमनने त्याला हटकविले. तरी देखील हा बहाद्दर एकला नाही. नंतर युवती जिथे काम करते तेथे जाऊन तो तिला भेटला आणि म्हणाला तुला मी वरून खाली फेकुन देतो अशा प्रकारची धमकी देऊन तो निघुन गेला. मात्र, घाबरलेल्या या तरुणीने मोठ्या धाडसाने घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठले. पिडीत तरुणीने घडला प्रकार पोलिसांना कथन कला असता त्यानुसार आकाश ज्ञानदेव पवार (रा. शिर्डी, ता. राहता) याच्यावर विनयभंगासह विविध कलमान्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.      

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 19 वर्षीय युवती एका ब्युटीपार्लरमध्ये काम करते. पिडीत तरुणीची ओळख तीन वर्षांपूर्वी आकाश पवार बरोबर झाली होती. मागील एक वर्षांपासून आरोपी आकाश पवार हा पिडीत तरुणीला फोन करून म्हणायचा. की, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशी का बोलत नाही. असे नेहमी फोनहून संभाषण होत असे. त्यावेळी पिडीत तरुणीने कुठलीही प्रतिक्रीया दिली नाही. नंतर आरोपी आकाश पवार हा थेट पिडीती तरुणी जिथे काम करते तेथे गेला व म्हणाला की ,तु जर माझ्याशी बोलली नाही तर मी आत्महत्या करेल अशी धमकी दिली. त्यानंतर देखील आरोपी आकाश वेळोवेळी फोन करत. तेव्हा पिडीत तरुणीने समजावुन सांगितले की, तु माझ्याशी बोलु नको. मी ही तुझ्याशी बोलणार नाही. असे समजावुन सांगितले. मात्र, याला ते मान्य नव्हते, हा तिच्या प्रेमात देवदास झाला होता.

          दरम्यान, दि. 13 मे 2023 रोजी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास पिडीत मुलगी जिथे काम करते तेथे आरोपी आकाश पवार आला व पिडीत तरुणीला फोन लावला. फोनवर म्हणाला की, तु खाली येते की, मी दुकानांमध्ये येऊ. त्यावेळी पिडीत मुलगी खाली आली. तेव्हा आरोपी आकाश म्हणाला की, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशी का बोलत नाही म्हणुन आरोपी आकाश पवारने पिडीत तरुणीचे केस धरून तिला खाली पाडले व मारहाण केली. तो पिडीत तरुणीच्या अंगावरील टीशर्ट व हात धरून वारंवार ओढत होता. त्यावेळी गेटवरील वॉचमेनने पाहिल्याने त्यांनी आरोपी आकाश पवार याला हटकविले. मात्र, त्याने त्यांना देखील शिवीगाळ व दमदाटी केली. तेथुन पिडीत मुलगी आपल्या कामावर गेली पण आरोपी आकाश पवार तिच्या मागे मागे गेला. तेथे जाऊन कामावर असलेल्या तरुणांना पिडीत मुलगी कुठे लपवुन ठेवली आहे का? तुमच्याकडे पाहतो अशी धमकी दिली. त्यावेळेस तेथील कर्मचारी यांनी समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला. तु येथे तमाशा घालु नको येथुन निघुन जा असे सांगितले असता तो म्हणाला की, ती येथे भेटली तर तिला वरूनच फेकुन देतो. असे म्हणुन आरोपी आकाश पवार तेथुन निघुन गेला.

               दरम्यान, त्यानंतर सायंकाळी सात वाजता पिडीत मुलीची कामावरून सुट्टी झाली. ती घरी गेली त्यावेळी कामावर घडलेला प्रकार आई वडीलांना व भावाला सांगितला. थोड्यावेळाने लगेच आरोपी आकाश पवार पिडीत मुलीच्या घरी आला व आरडाओरडा करायला लागला. आई, वडील व भाऊ यांनी आरोपी आकाश पवारला समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी आकाश पवारने पिडीत मुलीच्या भावाला व वडीलांना मारहाण करून निघुन गेला. पिडीत मुलीच्या कुटुंबाला राग अनावर झाला. त्यांनी पिडीत मुलगी घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले आणि तेथे घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीवरून विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.