वा रं गड्या.! बिबट्याच्या मिशा व नख्यांची तस्करी.! हिवरगावात बिबट्या मयत, चंदनापुरीची टोळी गजाआड.! जादुटोण्याचा संशय.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील बिबट्याचे अवयव विकणारी टोळीच्या वनविभागाने मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून बिबट्या मृगया या जातीच्या जनावराचे दात, सुळे, मिशा आशा पंचवीस अवयवांची खरेदी विक्री करताना दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे तर एक फरार झाला आहे. ही घटना शुक्रवार दि.19 मे 2023 रोजी हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ रात्री 9:45 च्या सुमारास घडली. यात आरोपी श्रीराम यादव सरोदे (रा.चंदनापुरी, ता. संगमनेर), सुधीर विजय भालेराव (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) हे अटक केले आहे. तर संगमनेर भाग एकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी ही दमदार कामगिरी केली आहे. आता अटक केलेले आरोपी यांनी हे अवयव आणले कुटून. कुठल्या बिबट्याचे हे अवयव आहे. यामध्ये आणखी कोण-कोण आहेत. याची कसुन चौकशी वनविभाग करत आहेत. याचा पुढील तपास उपविभागीय वनअधिकारी संदिप पाटील करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावातील तीन तरुण बिबट्याच्या अवयवांची तस्करी करत असल्याची माहिती वनविभागाचे अधिकारी सचिन लोंढे यांना लागली. त्यांनी यासाठी w.c. c. b यांच्या टीमच्या साहाय्याने एक पथक तयार केले. या पथकाने या चंदनापुरीतील तरुणांचा फोन नंबर शोधला. त्यांच्याशी संपर्क केला. संपर्क केला असता तुमच्याकडे बिबट्याचे अवयव असतील तर आम्हाला पाहिजे असे बोलणे झाले. त्यांना पैश्याचे अमिश दाखवुन हिवरगाव पावसा मधील टोलनाका परिसरात बोलावुन घेतले. हे चंदनापुरीतील युवक पैश्याच्या आमिषाला भाळले. आपला व्यवहार होईल या अपेक्षा ठेऊन ते आले. तेथे वनविभागाने सायंकाळी 6:30 वाजल्यापासून सापळा रचला होता. हा नाही करता करता रात्रीचे पावणे दहा वाजता आरोपी श्रीराम सरोदे, सुधीर भालेराव, सुशांत भालेराव हे बिबट्याचे अवयव घेऊन आले. ते तेथे येताच वनविभागाच्या पथकाने आरोपी श्रीराम सरोदे व सुधीर भालेराव याना ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे मृगया या जातीच्या जनावराचे दात, सुळे, मिशा आशा पंचवीस बिबट्याचे अवयव आढळुन आले.
दरम्यान, हे बिबट्याचे अवयव कुटून आले. की, या बिबट्यांच्या अवयवाच्या तस्करीत आणखी कोण-कोण आहेत याचा तपास करणे वनविभागापुढे आव्हान आहे. तर याच हिवरगाव पावसा टोल नाका परिसरात काल बिबट्या मयत आढळला आहे. तो वाहनाच्या धडकेत मयत झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, चंदनापुरी ते हिवरगाव परिसरात नेहमीच वाहनांच्या धडकेत बिबट्या मयत होत आहे. नाशिक पुणे महामार्गवरील चंदनापुरी घाट हा बिबटेप्रवण क्षेत्र म्हणुन ओळखला जातो. येथे बिबट्या मयत होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. आणि याच परिसरातील हे तीनही आरोपी आहे. त्यामुळे संशयाची सुई या परिसरात आहे. ही कारवाई वनआधिकारी सचिन लोंढे, वनविभाग जुन्नर व w.c. c. b यांची टीम,रईस मोमीन, संदिप येवले,कुणाल घुले,तन्मय बागल,हारून सय्यद,विक्रांत बुरांडे,अरुण देशमुख,गजानन पवार यांनी केली.
दरम्यान, राज्यात नव्हे देशात जे काही लोक जनावरांची तस्करी करतात, त्यांचे अवयवांची तस्कारी करतात ते काही औषधी म्हणून उपयोगात आणतात तर काही जादुटोणा, भानामती तथा अघोरी विद्या हस्तगत करण्यासाठी वापर करतात असे बोलले जाते. तर काही तरुणांच्या किंवा व्यक्तींच्या गळ्यात, हातात अशा प्रकारचे अवयव दिसून येतात. या वस्तु दुर्मिळ असल्यामुळे त्यासाठी वाट्टेल तो भाव देखील मंजुर असतो. विशेष म्हणजे अकोले आणि संगमनेर या भागात वन्य प्राणी मयत होण्याची संख्या जास्त आहे. मात्र कधी वाहनांच्या धडकेत तर कधी अकस्मात मृतदेह आढळतात. मात्र, तरी देखील वन विभाग याकडे कटाक्षाने लक्ष देत असतो. आज देखील त्यांनी फिल्मी स्टाईल प्रमाणे सापळा रचून ही टोळी अटक केली आहे.