भाजपाची १० खोक्यांची ऑफर, निवडुन आलेले उमेदवार थेट गुवाहटीला.! अकोल्याच्या मार्केट कमिटीत घोडेबाजार.!



- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

      अकोले तालुक्यातील मार्केट कमिटीच्या निवडणुकीचा निकाल दि. ३० एप्रिल २०२३ रोजी लागला. त्यात महाविकास आघाडीला ११ तर भाजपाला ०७ जागांवर समाधान मानावे लागले होते. पण, राज्य आणि देशातील कुरघोडी व फोडाफोडी प्रमाणे अकोल्यात देखील भाजपा गप्प बसायला तयार नाही. ते महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांनी ऑफर देऊ पाहत आहे, १० खोके  देतो, सभापती करतो, उपसभापती करतो असे म्हणत तिघांना फोडून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, भाजपाच्या भितीपोटी निवडुन आलेल्या ११ जणांनी गुवाहटी येथे पाटविणार असल्याची जोरदार चर्चा अकोल्यात रंगली आहे. दि. २४ मे रोजी पदाधिकार्‍यांच्या निवडी होणार आहे. त्यापुर्वी घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला आहे. आता चर्चा जरी गुवाहटीची असली तरी यांना नेमकी कोठे स्थलांतरीत करणार आहे, यावर अद्याप स्पष्टता नाही.

तोडा फोडा राज्य करा ह्या पद्धतीची रणनिती राज्यात आणि देशात भाजपाची सुरु आहे. हा एक राजनितीचा भाग असला तरी तो लोकशाहीला प्रचंड घातक आहे. त्यामुळे, विश्‍वासाने तिकीटे दिली आणि उमेदवार निवडून जरी आला तरी त्याला एखाद्या कैद्याप्रमाणे डांबून ठेवावे लागते. त्याची काळजी घ्यावी लागते. फरक इतकाच की, त्याची सगळी उठाठेव करुन त्याच्या इशार्‍यावर नाचावे लागते. हे लोकशाहीत मताधिक्याने निवडून आलेल्या मताचे मुल्य आहे. म्हणून लोकशाही धोक्यात आहे. पुर्वी कर्नाटक, आज महाराष्ट्र असे अनेक उदा. सांगता येतील. त्यामुळे, जनतेचा आणि सत्ताध्यार्‍यांचा भाजपावर विश्‍वास राहिला नाही. म्हणून अगदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांनी देखील यांच्यापासून दुर ठेवण्याची वेळ येते यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणतेच नाही.

आता अकोले बाजार समितीत महाविकास आघाडीला ११ जागा मिळाल्या आणि त्यांची एकहाती सत्ता आली. तर, भाजपाचे अपयश फार मोठे म्हणजे अगदी लाजीरवणे म्हणावे लागेल. कारण, निवडणुकीपुर्वी त्यांचे तीन सदस्य बिनविरोध झाले होते. त्यामुळे त्यांना फक्त सहा सदस्य निवडून आणायचे होते. मात्र, केवळ चार सदस्य त्यांना निवडून आणता आले. त्यामुळे, बिनविरोध तीन व निवडून आलेले चार अशी सात संख्या त्यांनी पार केली. त्यामुळे, सत्ता स्थापन करण्यासाठी जी ०९ ची मॅजीक फिगर हवी होती ती पार करता आली नाही. मग जनाधार मिळाला नाही त्यामुळे आता अर्थपुर्ण बळाचा वापर करायचा आणि वेगवेगळी प्रलोभने देऊन तिघांना फोडायचे व सत्ता स्थापन करायची अशा प्रकारचा खेळ भाजपाने मांडल्याचे बोलले जात आहे.

अर्थात भाजपात गेलेले काही पाकिस्तानी नाहीत. ते पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच आहेत. त्यामुळे, सत्तेशिवाय त्यांचा जीव गुद्मरतो. तोडा, फोडा, राज्य करा याप्रमाणे ते मार्केट कमिटीच्या काही सदस्यांना फोन करतात, त्यांना १० खोके देतो, सभापती करतो, उपसभापती करतो, अडिच-अडिच वर्षे संधी देतो असे नाना प्रकारचे अमिष दाखविण्याचे काम चालु आहे. जेव्हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये कुजबुज सुरू होती. तेव्हा त्यांच्या नेत्यांच्या लक्षात आले. की, सत्तेसाठी भाजपा काहीही करु शकते. त्यामुळे त्यांनी एक बैठक घेतली आणि सत्ता स्थापनेबाबत आढावा घेतला. तेव्हा १० खोके आणि सभापती करतो, उपसभापती करतो अशा अश्‍वासनांची प्रलोभने पुढे आली. त्यामुळे, येणार्‍या काळातील घोडेबाजार टाळण्यासाठी नेत्यांनी विजयी उमेदवारांनी बाहेर टूर साठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ही सहल गुवाहटीला जाणार अशी चर्चा होती. तर, काहींना गोवा-कोकण दौरा होणार असल्याचे सांगितले.

भाग २ :  साहेब या सहली तुम्हाला शोभतात का?