आज टमाटमा बोलणार्‍या रवि मालुंजकर यांनीच राष्ट्रवादी पक्षाशी गद्दारी केली.! सोशल मीडिवर जाहिर निषेध सुरुच..!



- सागर शिंदे  

सार्वभौम (अकोले) :-

      सन २०१९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अकोले विधानसभा मतदारसंघाचा गड कायम राखला आणि त्याचे श्रेय्य अनेकांनी अगदी उपकारासारखे डॉ. किरण लहामटे यांना बोलुन दाखविले. आता ही स्वयंघोषित निष्ठावंतांची नावे जाहिर करायला ती काही कमी नाही. मात्र, काल अगदी टमाटमा बोलणार्‍या रवि मालुंजकर मालुंजकर यांनी निष्ठा आणि आम्हाला काय दिले? असे वल्गना केली. तेव्हा अनेकांनी त्यावर सोशल मीडियात उत्तरे दिले. की, २०१९ नंतर जेव्हा राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष म्हणून मालुंजकर यांची नियुक्ती झाली. तेव्हा, संपुर्ण अकोले तालुक्याला रवि कोण आणि तो कुठला आहे. हेच माहित नव्हते. तरी राष्ट्रवादी पक्षाने युवा म्हणून वशिल्याने का होईना पद दिले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि आमदारांच्या जवळचे म्हणून त्यांना रुंभोडी गावाने सरपंच केले. इतके सगळे असताना देखील मालुंजकर यांच्यासह त्यांनी नेमलेल्या अनेक पदाधिकार्‍यांनी पक्षाच्या विरोधात काम केले. तरी हे म्हणतात आमची काय चुक? तरी हे म्हणतात तरुणांना संधी नाही.! मुळात यांना आमदारांनी दिलेल्या संधीचे सोने करता आले नाही. त्याऐवजी यांनी गैरवापर केला. अशा प्रकारची टिका आता मालुंजकर यांच्यावर होऊ लागली आहे.

खरंतर, गेल्या विधानसभेत अकोले तालुक्यात फार मोठे परिवर्तन झाले. मात्र, त्याचे खरे शिलेदार कोण? तर, स्व. अशोकराव भांगरे, डॉ. अजित नवलेे, विनय सावंत, एकास एक करणारे इच्छुक उमेदवार आणि महेश तिकांडे, संदीप शेणकर (मोठा) यांच्यासारखी काही तरुण मंडळी. पण, मी-मी म्हणत आमदारांवर अनेकांनी उपकाराचे बोजे चढविले आहेत. गेली तीन वर्षे हेच तुनतुने आमदारांनी ऐकले. त्यामुळे, कुत्ते भुंकते हैं, हाथी चलते हैं.! या म्हणीप्रमाणे आमदार चालत राहिले. अर्थात ज्याला जेव्हा पक्षातून जायते होते तेव्हा ते गेले. ज्याला पक्ष विरोधी काम करायचे होते त्यांनी ते केले. ज्याला बारामती ते मंत्रालय येथे जाऊन आमदारांच्या कागाळ्या करायच्या होत्या त्यांनी त्या केल्या.  ज्याला पक्ष विरहित निवडणुका लढायच्या होत्या त्या त्यांनी लढविल्या, ज्यांना निष्ठा दाखवायची होती त्यांनी बंडखोरी करुन पक्षनिष्ठेचा आव देखील आणला. हे सर्व आमदार उघड्या डोळ्याने पाहत होते. तरी देखील ते कोणाला शब्दभर बोलले नाही. प्रश्‍न येतो आता मालुंजकर यांच्यावर. कारण, त्यांनी निष्ठा आणि तरुणांना संधी यावर पोटतिडकीने वक्तव्य केले.

खरंतर या तालुक्याला राष्ट्रवादी आणि रवि मालुंजकर हे समिकरण अगदी २०१९ नंतर माहित झाले आहे. तरी देखील राष्ट्रवादी आणि पवार कुटुंब यांच्या निष्ठेवर बोलताना त्यांच्या डोळ्यासमोर अगस्ति कारखान्याची निवडणुक का येत नाही? तेव्हा अजित दादा प्रचाराला आले त्यावेळी हे परिवर्तन मंडळाचे मुकादम होते आणि यांचे नेते दादांना तथा शरदचंद्र पवार साहेबांना देखील काय म्हणत होते हे पुन्हा उकरुन काढण्यासाठी कोण्या ज्योतिष्याची गरज वाटत नाही. त्यामुळे, राष्ट्रवादी व त्यांच्या नेत्यांना घोडे टण्णे लावणार्‍या व्यासपिठावर भाषणे ठोकणार्‍या व्यक्तीला अकोले तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष राहिलाच नाही असे म्हणणे अगदी सहाजिक आहे. त्यात विशेष वाटण्यासारखे काही नाही. जे मालुंजकर पक्षनिष्ठा शिकवितात त्यांनी स्वत: पक्षाच्या विरोधात काम केलेच. मात्र, त्यांनी जे पदाधिकारी नेमले. त्यांनी देखील पक्षादेश कोलुन दिला. राजरोस बंडखोरी करुन आमदारांसह पक्ष आणि नेत्यांना बदनाम करण्याची सुपारी घेतली होती. त्यामुळे, त्यांना बळ कोणाचे होते? स्वत:च्या घरावर पक्षाचा झेंडा फडकविण्यापेक्षा कर्तुत्वाचा झेंडा फडकविण्याची संधी डॉ. लहामटे आणि पक्षाने दिली होती. त्याचे सोने करण्यापेक्षा दगड करुन ठेवला अशा प्रकारची टिका मालुंजकर यांच्यावर होत आहे.

खरंतर, एखाद्या तरुणाला सत्ता आल्यानंतर तालुकाध्यक्ष आणि त्यानंतर लगेच सरपंच व्हायची संधी मिळते. ती कशामुळे? जोवर युवा तालुकाध्यक्षपदाची झालर अंगावर होती. तोवर तालुक्यात मान सन्मान होता. आज काय परिस्थिती आहे? याचे आत्मचिंतन त्यांनी केले पाहिजे. तरुणांना संधी देण्याचे काम राष्ट्रवादी पक्षाने तुमच्यापासून केले होते. तुमच्या नंतर बबन वाळुंज यांच्यासारख्या तरुणास तालुकाध्यक्ष म्हणून संधी मिळाली त्यांचे काम काय वाईट आहे? सचिन नरवडे यांनी संधी मिळाली त्यांनी मुळा विभागात चांगले संघटन केले आहे. श्यामराव वाकचौरे यांना जिल्ह्यावर संधी मिळाली त्यांचे देखील काम सुरू आहे. त्यामुळे, आत्याबाई गेल्या अन मामुजींचे काय होईल. याची चिंता पक्षात कोणी करु नये. कारण, आदरणी बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील तितक्यात ताकतीने पक्ष मोठा केला. मात्र, पक्षातल्याच लोकांनी घात केली म्हणून आज ही वेळ आली. असेच अकोल्यात झाले आहे. वाईट विरोधक नाही तर राष्ट्रवादीचेच काही लोक पक्षाला व आमदारांना बदनाम करु पाहत आहेत हे देखील तितकेच सत्य आहे.

यात आणखी महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्ष राहिला नाही असे म्हणणार्‍या मालुंजकर यांनी एकदा मागे वळुन पाहिले पाहिजे. अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पक्षाने सत्ता स्थापन केली. खरेदी विक्री संघात देखील एक हाती सत्ता आली. अगदी काल देखील मार्केट कमिटीच्या निवडणुकीत पक्षाने मोठे यश संपादन केले. हे अशाचे द्योतक आहे? हे पक्षाचे अस्तित्व नाही का? हे कार्यकर्ते आणि नेत्यांचे तथा आमदारांच्या धावपळीचे यश नाही का? हे संघटन नाही का? की हे मतदार पाकिस्तानहून आयात केले होते? त्यांनी या सहकाराच्या संस्था निवडून दिल्या आहेत. यात विशेष म्हणजे पक्ष इतका बळकट झालाय, की लाखो रुपये खर्च करुन विजयी उमेदवारांची मौज मजा करायला समुद्र किनारी घेऊन जातो. त्यांची अलिशान व्यवस्था करतो. त्यांचा शाही थाट ठेवतो. त्यामुळे, राष्ट्रवादी पक्ष संपत नसतो हे लक्षात ठेवले पाहिजे असे मत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. तर, कारखान्यात विकासराव शेटे, ख.वि.संघात नितीन तळेकर आणि मार्केट कमिटीत ईश्‍वर वाकचौरे असे अनेक चेहरे तरुण आहेत. त्यामुळे, संधी नाही असे गुर्‍हाळ लावण्यापेक्षा ज्यांना संधी दिली त्यांना संधीचे सोने करता आले नाही हेच खरे आहे असे मत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना व्यक्त केले आहे.