अखेर कृषी पर्यवेक्षक सुरेश घोलप यांचे निलंबन, रोखठोक सार्वभौमच्या बातमीचा इम्पॅक्ट, ते चावटळ फोटो गृपवर टाकणे पडले महागात.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                   संगमनेर तालुक्यातील कोकणगाव परिक्षेत्रातील कृषी अधिकारी सुरेश कांतीलाल घोलप यांनी कायद्याचे पालन केले नाही. शासकीय नियमांचा भंग केला म्हणुन त्यांना तात्काळ निलंबन करण्यात आले आहे. वारंवार चुका होऊन देखील तत्कालीन अधिकाऱ्यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रोखठोक सार्वभौमने यावर प्रकाश टाकला तेव्हा प्रशासन खडबडून जागे झाले. या एका कृषी अधिकाऱ्यामुळे कृषी विभागाची प्रतिमा डागाळली होती. हे सार्वभौमने दाखवले त्यानंतर त्यांचा कसुरी अहवाल तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी विभागीय कृषी सहसंचालक पुणे येथे पाठवला होता. त्यानंतर, कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी यांनी सुरेश घोलप यांना तात्काळ निलंबीत करून मुख्यालय उपविभागीय कृषी विभाग, राजगुरूनगर येथे जमा केले आहे. जो पर्यंत वरिष्ठ आदेश देत नाही तो पर्यंत सुरेश घोलप याना मुख्यालय सोडता येणार नाही असे आदेशात म्हटले आहे.

          खरंतर घोलप यांचे कारणामे चव्हाट्यावर मांडावे असे नाहीत. मात्र, त्यांनीच स्वत:चे चावटाळ चाळे स्वत: सोशल मीडियावर टाकले. ते एकदा, दोनदा नव्हे तर अनेक वेळा टाकून आपण काय करतोय हे अनेकांना दाखवून दिले आहे. हे कृत्य सर्व अक्षेपहार्य होते, आज उद्या त्यांच्याकडून असे प्रकार थांबेल असे वाटत होते. मात्र, यांची खोडकरवृत्ती काही थांबली नाही. कृषी विभागातील तत्कालिन अधिकारी यांनी देखील घोलप यांना वारंवार तंबी दिली होती. परंतु, त्यांनी त्यांचे बे चे पाढे कायम ठेवले. गेल्या काही दिवसांपुर्वी घोलप यांच्याबाबत कार्यालयातील काही व्यक्तींनी वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावर कोणताही परिनाम झाला नाही. उलट तत्कालिन अधिकारी यांनी घोलप यांना कायम पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, काही होत नाही, काहीही केलं तरी आपलं कोणी काही करत नाही अशी धारणा झाली होती.

         दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. की, घोलप यांनी कर्तव्यात कसुर केली. असे म्हणत तत्पुरती झाकाढाली करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, वास्तव काय आहे हे संपुर्ण संगमनेर तालुक्याला माहित आहे. यात एकच महत्वाचा विषय आहे. की, कृषी विभागाच्या तत्कालिन अधिकाऱ्यांनी स्वत: कर्तव्यत कसुर केल्याचे लक्षात येते. कारण, घोलप यांच्याविषयी तक्रार असून देखील त्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्या विरोधात शिस्तभंगाचा प्रस्ताव सादर केला नाही. याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. मात्र, कौतुक या गोष्टीचे आहे. की, विद्यमान कृषी अधिकारी यांनी घोलप यांच्या कृतीचे समर्थन केले नाही. कार्यालयाच्या गृपवर काही महिला असतात, पुरुष आणि अधिकारी असतात, त्यावर अशा पद्धतीने नको त्या पोष्ट टाकणे कितपत योग्य आहे.? हे सांगण्यासाठी घोलप यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना कोण्या ज्योतिष्याची गरज होती का? आपण अधिकारी आहोत की शिपाई याचे भान त्यांना नाही का? अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.           

दरम्यान, घोलप यांच्यावर त्यांच्या पत्निने देखील अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यातील हा वाद कौटुंबिक नाही. तर, कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीमुळे वाद झाल्याचे पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे, आपण अधिकारी आहोत, आपण शासनाने घालुन दिलेले नियम व अटींचे पालन केले पाहिजे हे त्यांना सामान्य व्यक्तींनी सांगणे कितपत योग्य आहे.? आपण अधिकारी आहोत, समाज आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतो, तरुण आपल्याकडे आदर्श म्हणून पाहतो आहे, आपण शेतकरी राजाचे मार्गदर्शक आहोत त्यामुळे कसे जबाबदारीने वागावे हे त्यांना सांगण्याची गरज निर्माण व्हावी हे फार दुर्दैवी आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.