चावटाळ कृषी अधिकाऱ्याचे अश्लिल चाळे, थेट कार्यालयाच्या गृपवर सेंड झाले.! अनैतिक संबंध बायकोने पाहिले अन गुन्हाच ठोकला.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                  संगमनेर तालुक्यातील एका कृषि पर्यवेक्षकाचे त्यांच्या स्पोर्ट्स ग्रुपवर कार्यालयीन महिलेसोबत काही अश्लील फोटो पडले. मग काय.! छी, छी म्हणत ते सोशल मीडीयावर अगदी वाऱ्यासारखे  व्हायरल झाले. हे फोटो इतके व्हायरल झाले की ते थेट कृषी पर्यवेक्षकाच्या पत्नीपर्यंत जाऊन पोहचले. यातुन दोघांमध्ये कौटुंबिक खडाजंगी झाली. तुमचे बाहेर अनैतिक संबंध आहेत हे मला समजले असून हा उपद्याव्याप कशासाठी ? असे समजावुन सांगण्यासाठी पत्नी पतिकडे गेली. त्यावर उत्तर देत कृषी पर्यवेक्षक महोदय पत्नीला म्हणाला. की, तु घरातुन बाहेर जा, आता तु म्हतारी झाली आहे. असे म्हणत तिला लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. ही धक्कादायक घटना आज 16 मे 2023 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे, नंतर हा वाद कौटुंबिक न राहता थेट कायद्याच्या दरबारात येऊन ठेपला. यात कृषी पर्यवेक्षकाच्या पत्नीने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठुन कृषी पर्यवेक्षकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, हे कृषी अधिकारी महोदय शेतकऱ्यांकडे लक्ष न देता कार्यलयात चावटाळपणा करतात की काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यलयात चौकशी प्रस्ताव पाठविला आहे.    

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील एक कृषी पर्यवेक्षकाचा काही दिवसांपूर्वी शिक्षक महिलेबरोबर विवाह झाला होता. त्यांचा संसार सुरळीत चालु असतानाच या कृषी पर्यवेक्षकाचा कार्यलयातील एका महिलेसोबत टाका भिडला. मग काय.! हाय, हॅलो, चॅटिंग सुरू झाली. यावरून बाहेर भेटणे सुरू झाले, नंतर, काय झाडी, काय डोंगर अन काय हाटील, अशा सर्वच वाऱ्या सुरु झाल्या. नंतर त्यांचे संबंध इतके वाढले की ते एका बंद खोलीत भेटु लागले. आता याच बंद खोलीतील फोटो या कृषी पर्यवेक्षकाकडुन अनावधानाने व्हायरल झाले आहेत. ते फोटो कृषीविभागीय स्पोर्ट्स ग्रुपवर पडले. त्याफोटोमध्ये एक सहकारी महिला अश्लिल कृत्य करत असल्याने अनेकांच्या भवया आश्चर्याने उंचावल्या. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते कृषी पर्यवेक्षकाच्या पत्नीला समजले. त्यातुन दोघांचा वाद विकोपाला गेला. कृषी पर्यवेक्षकाच्या पत्नीने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यावर झालेला अन्याय पोलीस ठाण्यात कथन केला. त्यावरून कृषी पर्यवेक्षकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            दरम्यान, हा कृषी पर्यवेक्षक वारंवार वादग्रस्त ठरत आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी याच कृषी पर्यवेक्षकाने सोशल मिडीयाच्या ग्रुपवर अश्लील व्हिडीओ टाकले होते. त्यावेळी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी यांनी त्या घटनेवर पडदा टाकला होता. त्यानंतर पुन्हा दीडवर्षांपूर्वी कार्यलयीन अधिकृत ई-मेलवर अश्लील व्हिडीओ टाकले होते. तेव्हा चौकशी देखील झाली होती. तरी देखील या कृषी पर्यवेक्षकावर कुठलीही कारवाई झाली नाही. एका अन्य महिलेने हा विकृत माणूस वारंवार त्रास देतो म्हणुन तक्रार देखील केली आहे.  ही तक्रार तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नगर व विभागीय कृषी सहसंचालक, पुणे येथे केली होती. त्यानंतर विशाखा समितीने चौकशी देखील केली होती. तो चौकशी अहवाल विभागीय कृषी सहसंचालक, पुणे येथे सादर केला आहे. इतके सर्व असताना या सराईत माथेफेरु कृषी पर्यवेक्षकाने आज पुन्हा आपलेच अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकले. त्यामुळे, कृषी विभाग या कृषी पर्यवेक्षकावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

             दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागाचे काम उल्लेखनिय आहे. शेतकऱ्यांसाठी पुरक भुमिका घेणारे अधिकारी तेथे आहेत. मात्र, अशा काही व्यक्तींमुळे या विभागाला बदनामीला सामोरे जावे लागत आहे. चुका एकदा, दोनदा आणि तिसऱ्यांदा होऊ शकतात. मात्र, वारंवार चुका करणारा ते ही अश्लिलतेच्या संदर्भात तर तो विकृतपणा म्हणाला लागेल. त्यामुळे, अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. खरंतर, संगमनेरात अनेक कार्यालये आहेत जेथे महिलांचे प्रचंड शोषण होत आहे. मात्र, आपले अधिकारी आहेत, त्यांच्या हाताखाली काम करायचे आहे, रोज समोर रहायचे आहे त्यामुळे हरॉशमेन्ट होण्यापेक्षा अन्याय निमुटपणे सहन केलेला कधाही चांगला. त्यात प्रामाणिकपणे आवाज उठविला म्हणजे अनेकांच्या संशयीत नजरा, त्यात संशयखोर नवरा, असहकार्य करणारे कुटुंब यातून अन्याय पचविलेला योग्य वाटतो. म्हणून तर महिलांच्या शोषणाचे प्रमाण वाढते आहे. यावर महिलांनी आवाज उठवावा असे महिला आयोगाने मत व्यक्त केले आहे.