दारुड्या पतिच्या वादाला कंटाळून पत्नीनेच केली हत्या.! चोरट्यांनी खून केल्याचा केला बनाव.! भयानक सत्य उघड करण्यात पोलिसांना यश.!

 

सार्वभौम (राजूर) :- 

                            अकोले तालुक्यातील वाकी येथे चोरीच्या उद्देशातून खुन झाल्याची खळबळजणक घटना दोन दिवसापुर्वी पुढे आली होती. मात्र, या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. खुद्द पतीची हत्या करणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द मयताची पत्नी असल्याचे निष्पन्न झाले आहे. वारंवार दारु पिणे, मुलांना मारहाण करणे, घरात मद्य प्राषण करुण राडा घालणे, पत्नीस मारहाण करणे अशा अनेक कारणास्तव घरचे मयत मधुकर किसन सगभोर (रा. वाकी, ता. अकोले) यास वैतागले होते. दिवसभर काम करुन आल्यानंतर देखील मुले दमली होती. तरी देखील मधुकर दारु पिवून आले आणि त्याने राडा सुरु केला. पत्नीला मारहाण केली. तेव्हा वैतागलेल्या पत्नीने त्याचे डोके भिंतीवर आदळले. यात, मधुकर सगभोर यांच्या डोक्याला मार लागला आणि त्याला भुरळ आली.  जेव्हा दोघांचे वाद झाले तेव्हा पत्नीने बटाटे शिलण्याचे धारधार यंत्र त्याच्या तोंडावर मारल्याने त्यास मोठी जखम झाली होती. त्यानंतर मधुकर न जेवता झोपी गेले. मात्र, अंतर्गत रक्तस्रावाने त्यांना झोपेतच मृत्यु आला. त्यानंतर रात्री १२ वाजता पत्नीने पाहिले असता तो मयत झाल्याचे लक्षात आले. मग, आता लोकांना काय सांगायचे? असा प्रश्न पडला असता पत्नीने बनाव केला आणि चोरट्यांनी चोरी करताना मधुकर सगभोर यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले. त्यानंतर, तालुक्यात एकच खळबळ उडाली. मात्र, राजुरचे सहा. पोलीस निरिक्षक गणेश इंगळे यांनी अगदी शांत डोक्याने या गुन्ह्याची उकल केली. आरोपी महिलेची विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीसांनी पुष्पा मधुकर सगभोर (रा. वाकी) हिला ताब्यात घेतले आहे.

         असा घडला खुनाचा प्रकार.! 

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, दि. 8 मे रोजी दिवसभर काम केल्यानंतर सगभोर कुटुंब घरी आले होते. मात्र यात मधुकर यांचा कामात हातभार नव्हता पण दारु पिण्यासाठी पैसे मागण्यात रोटा फार मोठा होता. दुपारी आपल्या मुलाने २०० रुपये मद्य पिण्यासाठी दिले नाही म्हणून त्याने मारहाण केली होती. रात्री घरी आल्यानंतर पत्नी स्वयंपाक करीत असताना मधुकर याने तिला शिविगाळ  करण्यास सुुरुवात केली. तेव्हा पुष्पा म्हणाली. की, मुलं पेंढा वाहून दमली आहेत त्यांना भुक लागली आहे. मात्र, मधुकर मद्यधुंद असल्यामुळे त्याने पत्नीस मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने तिला मारले परंतु, हे सर्व तिला अनावर झाले असता तिने पतीला जोरात ढकलून दिले. तो भिंतीवर जाऊन आदळला त्यामुळे त्याच्या डोक्याला आतून मार लागला. तो पुन्हा उठला आणि पत्नीस मारु लागला तेव्हा तिने तिच्या हातातील बटाटे सोलण्याचे यंत्र त्याच्या दिशेने भिरकविले. त्यामुळे, मधुकर यांच्या तोडाला मोठी जखम झाली. त्यामुळे, ते थेट खोलीत झोपण्यासाठी गेले. मात्र, बराच उशिर झाला तरी मधुकर यांची हलचाल झाली नाही. म्हणून पुष्पाने हलवून पाहिले. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे तिच्या लक्षात आले. की, आपल्या धरपकडमध्ये पतीचा मृत्यु झाला आहे. मग तिने चोरीचा बनाव केला.

असा केला गुन्हा उघड.!

गुन्हा घडल्यानंतर सहा. पोलीस निरिक्षक गणेश इंगळे यांच्या दोन टिम कार्यरत होत्या. एक टिम चोरीच्या दृष्टीने तपास करीत होती. तर, एक टिम कौटुंबिक संशयाने चौकशी करीत होती. तिन दिवस उलटल्यानंतर वैद्यकीय अहवाल देखील आला होता. तोंडाची जखम आणि डोक्याला मार लागून अंतर्गत रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून मधुकर सगभोर याचा कुटुंबाला त्रास, दुपारी मुलास मारहाण आणि वारंवार पत्नीवर हात उचणे अशा बऱ्याच गोष्टी परिस्थितिजन्य पुरावे म्हणून पुढे येत होते. त्यामुळे, इंगळे यांनी कुटुंबातील काही व्यक्तींशी चर्चा केली. त्यांचे जबाब देखील नोंदविले. यात बऱ्याच गोष्टी संदिग्ध वाटत होत्या. त्यामुळे, अंतीमक्षणी गणेश इंगळे यांनी पुष्पा सगभोर हिच्याकडे आपला मोर्चा वळविला. तेव्हा पहिल्यांदा तिने पोलिसांना वाकडे तिकडे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचे काही प्रश्न तिच्यासाठी अनुत्तरीत राहिले. नंतर मात्र तिने पोलिसांना जे घडले ते स्पष्टपणे सांगितले आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. केवळ, वारंवार होणारा त्रास आणि समाज काय म्हणेल म्हणून हा निर्णय घेतला. त्याला रुप चोरीच्या प्रकारातून ही घटना झाल्याचा बनाव केला.

असा केला होता बनाव.!

दि. 09 मे 2023 रोजी रात्री 01.00 वा. चे सुमारास पुष्पा यांचा अचानक मोठ्याने ओरडल्याचा आवाज आल्याने मुलगी पायल उठुन पुढे आली होती. तेव्हा तिने पाहिले. की, एका माणसाने राखाडी रंगाची पॅन्ट, राखाडी रंगाचे लाल पट्टे असलेले बनियन व तोंडास रुमाल बांधलेला होता. त्याच्या हातात कोयता घेवुन तो घरात असलेल्या कपाटातील सामानाची उचकापाचक करत होता. तर, दुसऱ्या दोन मानसांपैकी एकाने आकाशी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट व तोडांला रुमाल बांधलेला होता. दुसऱ्याने अंगात राखाडी रंगाची पॅन्ट, अंगात कमरेपर्यंत अर्धनग्न व शरिराने सडपातळ होता. यातील एकजण पुष्पा हिचे जवळ उभा होता तर एकजन त्यांना मारहाण करत होता. तेव्हा ती आईजवळ गेली असता ते आम्हाला म्हणाले की आम्ही तुम्हाला काही करत नाही, असे म्हणुन त्यांनी आम्हा दोघींना एका कोपन्यात उभे करुन त्यातील एक मानुस हा आमच्या घराच्या खिडकीजवळ जावुन माझा भाऊ व लहान मावशी व मामांच्या मुलांना दम दिला की, तेथेच उभे रहा नाहीतर तेथे येवून मारुन टाकील त्यामुळे ते तेथेच ट्रॉलीत उभे होते. त्यांचेतील एक जन आमचे कपाट व शोकेशची उचकापाचक करत होता. शोकेश मध्ये ठेवलेल्या माझ्या व माझी बहिण निलम हिच्या बेनटेक्सचे हार व बांगड्यांची पिशवी घेतली व म्हणाले की आनखी कोठे माल ठेवला आहे अशी दमदाटी करत घरातील साहित्याची उचकापाचक केली. त्यांनी मी झोपलेल्या ठिकाणी ठेवलेला मोबाईल फोन हा फेकुन देवुन त्या नुकसान केले. त्यांना काही जास्त न मिळाल्याने ते तिघेही आमच्या घराच्या मागच्या दाराने जाताने आम्हाला दम दिला की तुम्ही आरडा ओरडा केला तर आम्ही पुन्हा येईन असे म्हणून निघुन गेले. त्यानंतर आम्ही माझे वडील मधुकर यांचे जवळ गेलो असता त्यांच्या गालातुन रक्त आल्याचे पाहिले. तेव्हा आम्ही माझे चुलते तान्हाजी किसन सगभोर यांना बोलावुन घेवुन सदर माहिती दिली. आईला मारहान झाल्याने माझी मोठी चुलती लिलाबाई व गावातील काही माणसे यांनी औषधोपचार करता दवाखाण्यात घेवुन गेले. असा बनाव केला होता.