अरे देवा.! पुन्हा इयत्ता १० वीच्या विद्यार्थीवर अत्याचार, पुस्तक मागायला गेली अन गरोदर होऊन आली.! तुझा गावभर बोभाटा करतो असे म्हणत आरोपीचा अत्याचार, गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम (अकोले) :- 

                        अकोले तालुक्यातील वाघापूर येथे अवघ्या 17 वर्षाच्या शालेय मुलीवर अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती राहिली आणि तिला मुलगाही झाला. तो गुन्हा दाखल होऊन चार दिवस उलटतात कोठे नाहीतर, पुन्हा अकोल्यातील धामनगाव आवारी येथे अवघ्या 15 वर्षाच्या शालेय विद्यार्थीनीवर अत्याचार झाल्याने ती गरोदर राहिली आहे. बालपणाच्या मित्रानेच तिच्यावर बलात्कार केला असून ती आता चार महिन्याची गरोदर असल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. ही धक्कादायक घटना जानेवारी 2023 या दरम्यान घडली. पीडित मुलगी आरोपीकडे एक वही आणायला गेली असता तिच्यावर बळजबरी केली आणि हा प्रकार घडला. हा घडलेला प्रसंग जर कोणाला सांगितला. तर, तुझा बोभाटा सगळ्या गावात करेल अशी धमकी देऊन दोन वेळा तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून पीडित मुलगी गप्प राहिली. मात्र, चार महिन्यानंतर पोट दुखू लागल्याने सर्व प्रकार उघड झाला.  याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार समिर संभाजी आवारी (रा. धामनगाव आवारी, ता. अकोले) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, पीडित मुलीचे आई - वडील हे शेती व्यवसाय करतात. त्यामुळे, मोठ्या कष्टातून त्यांनी आपला संसार उभा केला आणि त्यातून ते आपल्या मुलांचे शिक्षण करत होते. पीडित मुलीने नुकतीच इयत्ता 10 वी ची परीक्षा दिली आहे. ती घरी असल्याने तिचे अन्य काय चालले हे शेतकरी आई वडिलांना फारसे माहित नव्हते. दरम्यान, पीडित मुलगी ही तिच्या गावातील समिर संभाजी आवारी याचेकडे कायम जात असे. समिर हा तिच्या लहानपणाचा मित्र आहे. लहानपनापासुन ओळख असल्याने कुटुंबाने कधी त्याच्या फातलू वागण्यावर शंका घेतली नाही. याचाच फायदा घेऊन जानेवारी 2023 मध्ये पीडित मुलगी समिर आवारी यांचे घरी पुस्तक आणायला गेली होती. तेंव्हा समिर हा घरामध्ये एकटाच होता. तेंव्हा पीडितेने त्याच्याकडे एक पुस्तक मागीतले होते. तेव्हा त्याने पुस्तक घरातील खिडकीमध्ये आहे असे म्हणून तिला आत बोलविण्याचा प्रयत्न केला. पुस्तक तु तेथुन घे असे म्हणून तिला घरात येणे भाग पाडले. ओळख असल्यामुळे, पीडित मुलीच्या मनात किंतू परंतु आले नाही. म्हणून ती घरात गेला.

           दरम्यान, पीडित मुलगी त्यांच्या घरात गेली असता खिडकीत पुस्तक घेणार तोच आरोपी समिर मागून आला आणि पीडित मुलीस मिठी मारली. पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे, शाळेत जाते असे माहित असून देखील तिच्या इच्छेविरुद्ध त्याने अत्याचार केला. पीडित मुलगी विरोध करीत होती, ओरडत होती. पण, आरोपीने धमकावत तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. जर आरडाओरड केली तर तुला इथेच ठार करीन असे म्हटल्यानंतर पीडित मुलगी घाबरुन गेली. दरम्यान, घडला प्रकार कोणाला सांगायचा नाही. असे म्हणत पीडित मुलीने सर्व काही सहन केले होते. मात्र, आरोपी समीरचा उद्योग अधिक वाढत गेला. एकदा केलेला गुन्हा दबला त्यामुळे त्याने पीडित मुलीस वारंवार आपल्या घरी बोलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्यास नकार दिला. पुन्हा असे काही नको म्हणून विनंती केली. मात्र, आरोपी याने तिला धमकी दिली आणि पुन्हा अत्याचार केला. 

             दरम्यान, वारंवार विरोध करुनही आरोपी धमकी देत होता. सदर प्रकार गावातील मुलांना सांगण्याची धमकी देत होता. त्यामुळे, पीडित मुलगी घाबरुन गेली होती. आई वडिलांची इज्जत जाऊ नये म्हणून तिने सदर प्रकाराबाबत घरी व इतर कोणालाही काही सांगीतले नाही. मात्र, जानेवारी 2023 मध्ये आरोपी समिर आवारी याने पुन्हा धमकी दिली व ब्लॅकमेल करुन अत्याचार केला. त्यानंतर, दि. 24 एप्रिल 2023 रोजी पीडित मुलीस बरे वाटत नसल्याने तिच्या आईने तिला औषधोपचारासाठी रुग्णालय दाखल केले होते. येथे तिच्यावर औषधोचार चालु असतांना दि. 29 एप्रि 2023 रोजी सकाळी तिची सोनोग्राफी केली तेंव्हा लक्षात आले. की, पीडित मुलगी नऊ आठवडे व चार दिवसाची प्रेगनेन्ट आहे. हा सर्व प्रकार डॉक्टरांनी सांगीतल्यानंतर आई वडीलांना धक्का बसला. तेव्हा त्यांनी विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर आज समिर संभाजी आवारी (रा. धामनगाव आवारी) याचे विरुद्ध कायदेशिर गुन्हा दाखल केला आहे.