करु जेलची वारी, त्या पिचड-पिता पुत्रावर एक गायकर भारी.! भजपाचा पुन्हा दारुण पराभव.! 11-07 वर आत्मचिंतन करावे.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
प्रचंड सस्पेन्स ठेऊन अकोले तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंड फडकला. मतदारांची पळवा-पळवी आणि कोंडा-कोंडी त्यात अर्थपुर्ण वाटाघाटी त्यामुळे, नक्की बाजी कोण मारेल यावर शंका कुशंका निर्माण होत होती. मात्र, अंतिमत: महाविकास आघाडी.! छे.! खरंतर सिताराम पा. गायकर यांनी बाजी मारली असे म्हटले जात आहे. अर्थात सर्वांना धरुन चालणे, संयमाने खेळी खेळणे आणि प्रत्येकाचे योगदान मान्य करणे हाच त्यांचा स्थायी स्वभाव आहे. मात्र, तरी देखील खरेदी विक्री संघानंतर पुन्हा गायकर हेच या विजयाचे शिल्पकार असा एकमुखी नारा पहायला मिळाला. तर, तिन उमेदवार पुर्वीच निवडून आलेल्या भाजपाने पुर्णत: कंबर कसली होती, आमचे 15 उमेदवार निवडून येतील असे म्हणत गुढग्याला बाशिंग बांधले होते. मात्र झालं काय? तिन आयते विजय मिळून सुद्धा साधे सहा उमेदवार भाजपला निवडून आणता आले नाही. त्यामुळे, काय ती त्यांची हवा, काय तो आत्मविश्वास आणि काय ते अतिशयोक्ती कार्यकर्ते....सर्व कसं धुळदान झालं. अवघे चार उमेदवार निवडून आले आणि आणून ठेवलेला गुलाल खरेदी विक्री संघाप्रमाणे पुन्हा माघारी न्यावा लागला. यात महाविकास आघाडीला 11 जागा मिळाल्या तर भाजपला 07 जागांवर समाधान मानाले लागले आहे. या निवडणुकीत सिताराम पा. गायकर साहेब म्हणाले होते. आम्हाला जेलात टाकण्याची भाषा करतात, चौकशा लावून दबाव आणतात, पण एकवेळी जेलात जाऊ पण आता यांच्या धमक्यांना बळी पडायचे नाही. वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातोय, तर आता घाबरायचे नाही. जेलात जायचे तर एकटे जाणार नाही, तुम्हाला घेऊन जाऊ असले निधड्या छातीचे बोल कार्यकर्त्यांना बळ देऊन गेले. तर, मिनानाथ पांडे यांनी पिचड साहेबांची संस्थात्मत पातळीवची पोलखोल या निवडणुकीला कलाटणी देऊन गेली असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
खरंतर, साध्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी ८५ वर्षे वयाच्या माजी मंत्र्यास मतांसाठी तालुकाभर फिरावे लागते हे किती मोठे दुर्दैव आहे. बाकी ठिकाणी अर्थात विखे पा. असो वा थोरात साहेब, कर्डीले असो वा तनपुरे यांच्याकडे पक्ष फार महत्वाचा नाही. ते उभे मैदानात उभे राहिले. तरी, जनता भरभरुन मतदान देते. तेथे विरोधकांचा धुळदान होते. येथे मात्र, साहेब गाव गाव फिरतात, नेता ना कार्यकर्त्याशी फोनवर साद घालतात. तरी देखील वारंवार पराजय पदरी पडतो. याचे फलित काय? याचे आत्मचिंतन त्यांनी केले पाहिजे. विशेषत: तीन बिनविरोध येऊनही पराभव व्हावा, यावर देखीत ते स्वत:ची पाठ थोपटून घेणार असेल. तर, येणाऱ्या निवडणुकीत ये रे माझ्या मागल्या असे झाले तर काही वावघे वाटायला नको.! आत आणखी विशेष म्हणजे येथे जातीवंत कार्यकर्ते उभे करावे लागतील, कारण, निवडणुका म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नव्हे.! यावर विशेष चिंतनाची गरज आहे. कारण, कोण आपले आणि कोण परके हे भाऊंना चांडाळ चौकटीतील काही कार्यकर्त्यांनी कधी जाणवू दिले नाही. त्यामुळे, मताला कमी अन पराभवाचे सांत्वन करायला त्यांच्याकडे खुप मोठी गर्दी असते. म्हणजे हे सात आठ पक्ष मिळून जल्लोष करायला जितके लोक विरोधकांकडे असतात. त्याच्या दोनपट लोक भाजपा कर्यालयात सांत्वन सभेला असतात. पण हे दर्दी नव्हे तर गर्दीचे असतात. म्हणून समोरच्या गटातील दुश्मण मोजण्यापेक्षा आपल्याच गटातील फितुर शोघणे गरजेचे आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने विजयपथ सोपा होईल. अन्यथा चौकशा लावणे, अर्जफाटे करणे, भाजपच्या वृत्तीचा वापर करणे, जेलात टाकण्याची भाषा करणे ही असली कृती अकोले तालुक्याच्या जनतेला फार काही रुचनारी नाही हे आता स्पष्ट झाले आहे.
हे तर लोकशाहीला प्रचंड घातक.
खरंतर, आजकाल मतदान म्हणजे आपला हक्क आणि जबाबदारी राहिली नसून ती एक पैसे कमविण्याची प्रक्रिय झाली की काय? असा प्रश्न पडला आहे. मतदान म्हणजे अगदी लिलाव पद्धतिने मांडलला बाजार ठरु लागला आहे. त्याने भाव फोडला की विरोधक पुन्हा रक्कम वाढविणार. त्यामुळे, एका मताचे मुल्य अगदी बाजारु ठरु लागले आहे. विशेषत: ठरावाची मते ही फार भयानक प्रक्रिय होऊन बसली आहे. त्यामुळे, मिरिट तथा गुणवत्तेपेक्षा पैैसा फेको अन तमाशा देखो हेच सरर्रास पहायला मिळत आहे. खरंतर, अकोले तालुक्यातील देवठाण परिसरात काल जो काही प्रकार घडला. तो अगदी दहशतवादी किंवा अगदी नक्षली पद्धतीचा होता. कारण, मतदार आदल्या रात्री उचलुन आणायचे आणि त्यांना डांबून ठेवून थेट मतदानाला आणायचे. ते ही त्यांचा कोंडवाडा करण्यासाठी एका सरकारी आणि खाजगी शाळेचा वापर होतो. हे किती मोठे दुर्दैव आहे. आपण, खरोखर पुरोगामी अकोले तालुक्यात रहातोय की गडचिरोली, भामरागड किंवा चंद्रपूर या असल्या नक्षली क्षेत्रात रहातोय हेच कळत नाही. मुळात, मतदार आणून तरर्र करुन ते कोंडायचे आणि मतदानाला न्यायचे ही ज्या व्यक्तीने संकल्पना सुचविली त्याला खर्या अर्थाने भाजपानेच एखादा चांगला परस्कार दिला पाहिजे. कारण, त्यामुळेच महाविकास आघाडीला यश मिळाले. वास्तवत: मतदार डांबल्याची बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली आणि तेव्हा खरे लोकशाहीचे मतदार जागे झाले. मीडियात नगण्या प्रतिक्रिया उमटल्या. विजयी होण्यासाठी असली दादागिरी असला उर्मटपणा आणि धटींगशाही.! त्यामुळे, कोंडले 50 पण 100 वैचारीक मतदार विरोधात गेले. अन त्यांनी दाखवून देखील दिले. की, लोकशाही म्हणजे काय? पैसा आणि भाईगिरी ही लोकशाहीच्या मतापुढे कस्पट आहे. म्हणून तर 50 खोके देऊनही ओके असे काहीच झाले नाही. त्यामुळे, येणाऱ्या काळात कोणालाही मतांची गरज पडली. तर, लोकशाही मार्गाने मत मागितल्यात मतदार राजा भरभरुन देईल. अन्यथा घरचा रस्ता कसा दाखवितात हे आज आपण पाहिले आहे.
उमेदवार निहाय पडलेली मत......
* विश्वनाथ विठ्ठल आरज,,(शेतकरी विकास)--४५७ ( विजयी)
* योगेश गजानन आरोटे,(शे.समृद्धी)-- ४९२( विजयी)
* किरण प्रताप देशमुख,(शेतकरी विकास)--४५२(पराभूत)
* अशोक कारभारी उगले,,(शेतकरी विकास)-- ४५६ (पराभूत)
* सुनील रोहिदास रंधे,,(शेतकरी विकास)---(
* कैलास गंगाधर कानवडे,,(शेतकरी विकास)-- ४४४(पराभूत)
* रामनाथ नागू भांगरे,,(शेतकरी विकास)--- ४३६ (पराभूत)
* रावसाहेब विठ्ठल वाळुंज,(शेतकरी विकास)-- ४४३ (पराभूत)
* भास्कर बाळाजी खांडगे,(शे.समृद्धी)-- ४९४ ( विजयी)
* राम बन्सी सहाणे,(शे.समृद्धी)-- ४४० (पराभूत)
* सचिन हाैशिराम रंधे,(शे.समृद्धी)-- ४६५ ( विजयी)
* ईश्वरभाऊ सोमनाथ वाकचाैरे,,(शे.समृद्धी)-- ४७५ (विजयी)
* रुपेश धोंडिबा कचरे,(शे.समृद्धी)-- ४७७ ( विजयी)
* रोहिदास जिजाबा भोर ,(शे.समृद्धी)-- ४७६ (विजयी)
* बुळे निबा सखाराम (अपक्ष) --०४ (पराभुत)
* शेणकर भाऊसाहेब महादु -(अपक्ष) --०३ (पराभूत)
* महिला राखीव मतदार संघ
सौ.नंदा सदाशिव कचरे ,(शेतकरी विकास)-- ४८० (पराभूत)
* सौ मंदा गणपत बराते,(शेतकरी विकास)-- ४७३ (पराभूत)
* साै स्वाती तुकाराम कोरडे,(शे.समृद्धी) -- ५१० (विजयी)
साै. मंगल अनिल भांगरे(शेतकरी.समृद्धी)-- ५०३ (विजयी)
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ
* अर्जुन दत्तू गावडे,,(शेतकरी विकास)-- ५१८ (पराभूत)
* संतोष रामनाथ तिकांडे,(शेतकरी विकास)--५०८ पराभूत)
* रामकृष्ण अण्णासाहेब आवारी (शे.समृद्धी)-- ५६९ (विजयी)
* भाऊसाहेब पाडुरंग नाईकवाडी(शे.समृद्धी)-- ५३४ (विजयी)
इतर मागास प्रवर्ग
* बाळासाहेब गणपत सावंत,(शेतकरी विकास)--५०२ (विजयी)
* विकास आत्माराम बंगाळ (शे.समृद्धी)-- ४८१ (पराभूत)
* सुमिरन विलास मालुंजकर (अपक्ष) ०४ (पराभूत)
आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ...
* केशव अर्जुन बोडके,(शेतकरी विकास)-- ५०४ (पराभूत)
* भानुदास बोल्हाजी तिकांडे. (शे.समृद्धी)-- ५९० (विजयी)
व्यापारी मतदार संघ
* इनामदार अब्दुल महंमद ,(शेतकरी विकास)-- १०६ (विजयी)
* किरण हरिभाऊ कानकाटे,(शेतकरी विकास)- १०८ (विजयी)
* मंगेश सुनिल नवले (शे.समृद्धी)-- ८४ (पराभूत)
* नवनाथ नाना वाळुंज (शे.समृद्धी)--९० ( पराभूत)