योजनेचा हाप्ता देण्यासाठी 17 हजार रुपयाची लाच घेतल्याने नगरपालिकेचा कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात, संगमनेर लाचखोरीत अव्वल स्थानावर.!

 

- सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) :- 

                        संगमनेर शहरात घर बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळवण्यासाठी 17 हजार रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज बुधवार दि. 3 मे 2023 रोजी 5 वाजण्याच्या सुमारास घडला. यात एका खाजगी एजन्सी कडुन काँट्रॅक्टरवर असणारा  विकास सुरेश जोंधळे (रा. कोकणगाव, ता. संगमनेर) याला नाशिक लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. लाचखोर विकास जोंधळे यांनी ही रक्कम स्वीकारली आहे. याप्रकरणी आता विकास जोंधळे याला ताब्यात घेतले असुन त्यांची संपत्ती, बँकखाते, घरझडती या कारवाईसाठी पुढील प्रक्रीया सुरू केली आहे. लाचखोर  जोंधळे यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. तर पोलीस निरीक्षक संदिप साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी तलाठी व ग्रामसेवक आढळले नाही तेच आज पुन्हा संगमनेर नगरपालिकेतील खाजगी एजन्सीद्वारे नेमलेला कर्मचारी लाचलुचपतच्या सापळ्यात अडकला आहे त्यामुळे, इथे किरकोळ कामाचे पैसे किती स्वतःच्या घशात जात आहे हे न बोलेलं बरं.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनेक गोरगरीब जनता कागदपत्रांची पूर्तता करीत आहेत. संगमनेर शहरात देखील याचे काम सुरू आहे. अनेकांनी कागपत्रे देऊन या योजनेचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हे काम जलद गतीने व्हावा म्हणुन एक खाजगी एजन्सी नेमली आहे. त्यामध्ये संगमनेर शहरात काँट्रॅक्टबेसवर विकास जोंधळे हा एजन्सी कडुन पंतप्रधान आवास योजनेचे काम पाहत होता. त्यामुळे, संगमनेर शहरातील लोक विकास जोंधळे यांच्याकडे पंतप्रधान योजनेचा लाभ घेण्यासाठी येत. याचाच फायदा विकास जोंधळे यानी स्वतःच्या स्वार्थापोटी घेतला. मोगलपुऱ्यातील एका नागरिकाला पंतप्रधान आवास योनेचे घर मंजुर झाले. त्याचे काम देखील सुरू झाले. या घराचा पहिला हप्ता आपल्या बँक खात्यात मिळवण्यासाठी तो नगरपालिकेत विकास जोंधळेकडे जात असे. मात्र, लाचखोर विकास जोंधळे यांनी कामात वारंवार टाळाटाळ केली. संगमनेर शहरातील मोगलपुऱ्यातील राहिवस्याने सर्व कागदपत्रे देऊन काम चालू करून पहिला हप्ता येत नसल्याने तो हताश झाला. सर्व टायटल क्लेअर असताना विकास जोंधळे हा पैश्याची मागणी करू लागला. सर्व कागपत्रे असताना या विकास जोंधळेला पैसे कशासाठी द्यायचे? मात्र, ऐकतील ते जोंधळे कसले? त्यांनी तक्रादाराकडून पहिला हप्ता मिळवण्यासाठी पैश्याची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांच्या वारंवार मागणीला वैतागल्याने थेट त्यांनी नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर नाशिकचे पथक संगमनेशहरात दाखल झाले.

                दरम्यान, तक्रादार त्यांच्या मतावर ठाम होते. तक्रादाराने लाचखोर विकास जोंधळे याला हा नाही करता करता 17 हजार रुपये ठरवले. हे पैसे घेण्यासाठी तक्रादाराने तांदळाच्या दुकानात लाचखोर विकास जोंधळेला बोलवले. तेथे नाशिक विभागाचा संपला रचला. तेथे विकास जोंधळे हा लाचेची रक्कम ठरलेली घेण्यासाठी मोगलपुऱ्यातील तांदळाच्या दुकानात आला. तेथे येताच त्याने 17 हजार रुपये घेत असल्याचे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. यात आणखी कोणी आहे का? याची सखोल चौकशी नाशिक लाचलुचपत विभागाची सुरू होती. लाचखोर विकास जोंधळे याच्या घरात तसेच बँकेत किती मालमत्ता आहे अशा प्रकारची पुढील कारवाई संगमनेरात सुरू आहे.

             दरम्यान, संगमनेर महिन्याभरात हा तिसरा लाचलुचपत विभागाने छापा टाकला आहे. त्यामुळे, इथे भ्रष्टाचार किती बोकाळला आहे याची प्रचिती येऊ लागली आहे. इथे शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर खाजगी एजन्सीतील लोक कॉन्ट्रॅक्टबेसवर भरती केले ते देखील मोठ्या रक्कमा आपल्या घशात घालत आहेत. संगमनेरात शुल्लक कामासाठी हजारो लाखो रुपये घेतले जातात म्हणुन इथे गुंठेवरीची चौकशी लावली आहे. जिल्ह्यात कुठे सापडणार नाही इतका भ्रष्टाचार संगमनेरात आढळून येत आहे. त्यामुळे, येथे महिना फार होतो तेच लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकला जातो. शासकीय कर्मचारी ते अधिकारी येथे आलिशान गाडीतुन जाताना दिसतात. मात्र, गाडीच्या काचा काळ्या टाकतात.