अकोल्याच्या तकतराव मिरवणुकीत संगमनेरच्या तरुणांचा फुल राडा.! 10 जणांवर गुन्हे दाखल, गणोऱ्याच्या हगाम्यात चोप, पिंपळगावचे फालतू राजकारण.!

 

सार्वभौम (अकोले) :- 

                              अकोले तालुक्यात बहुतांशी ठिकाणी यात्रा सुरु आहेत. त्यामुळे, हावसे, गवसे आणि नवसे यांची तोबा गर्दी होत आहे. काही यात्रा अगदी चांगल्या पार पडल्या आहेत, तर काही ठिकाणी यात्रांना गालबोट लागल्याचे पहायला मिळाले. राजूर आणि अकोले दोन्ही परिसरात तमाशा आणि देवांच्या मिरवणुकीत रहाडे झाल्याचे पहायला मिळाले. मात्र, काही ठिकाणी प्रश्न सामोपचाराने मिटला, तर काही ठिकाणी थेट गुन्हे दाखल झाले. त्यामुळे, असाच गालबोट लागणारा प्रकार गणोरे गावच्या यात्रेत घडला. हिवरगाव आंबरे येथून तकतराव यांची मिरवणुक सुरु असताना संगमनेर तालुक्यातील काही कॉलज तरुण त्यात सहभागी झाले. नाचणे किंवा दर्शन घेणे सोडून त्यांनी कॉलेजमध्ये घडलेल्या जुन्या वादातून भर मिरवणुकीत राडा सुरु केला. आठ ते दहा जणांनी मिळून तेथे हाणामारी सुरु केली. त्यामुळे, तकतराव मिरवणुकीत एकच गदोरोळ पेटला. यात काही तरुण जखमी झाले आहेत. मात्र, संगमनेरच्या तरुणांना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला असून त्यांच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केेला आहे. विशेष म्हणजे याच तरुणांनी मागीलवर्षी देखील राडा घातला होता. मात्र, तेव्हा त्यांना समझ देऊन सोडले होते. यंदा मात्र त्यांची यात्रा थेट पोलीस ठाण्यात पोहच केली आहे.                 

याबाबत सविस्तर माहिती आशी. की, गणोरे येथे आंबिका माता यात्रा उत्सव असल्याने तेथील पंचक्रोशी तथा तालुक्यातू हजारो व लाखो भाविक तेथे दाखल होतात. हिवरगाव येथून तकतकार यांची मिरवणूक गणोऱ्यात दाखल होते आणि त्याच ठिकाणी विसर्जीत होते. या मिरवणुकीत प्रचंड गर्दी आणि भाविक भक्तांचा लावाजमा असतो. मात्र, काही बाहेरुन आलेले तरुण मुद्दाम या कार्यक्रमास कायम गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. गेल्या वर्षी असा प्रकार झाला आणि त्याच तरुणांनी यंदा देखील तोच पाढा गिरविला आहे. या घटनेत प्रतीक खर्डे,  नवनीत कदम, अक्षय गांडोळे (सर्व रा. साईखिंडी, तालुका संगमनेर), अभिजीत रावसाहेब साळुंखे (रा. हिवरगाव आंबरे, विजय अशोक उगले (रा. डोंगरगाव ता. अकोले जि. अ.नगर) व अन्य अनोळखी 5 इसम यांनी यात्रेच्या मिरवणुकीत प्रवेश केला आणि जुन्या वादातून हाणामारी सुरु केली.

               दरम्यान, संबंधित तरुणांचा राडा घालणे हे पुर्वनियोजित असल्याचे पोलिसाचे मत आहे. जेव्हा मिरवणुक सुरु होती तेव्हा अगदी शुल्लक बाचाबाची झाली होती. मात्र, धक्का लागण्याचे कारण थेट धक्काबुक्कीवर जाऊन पोहचले. गर्दी मोठ्या प्रमाणावर असल्याने काही क्षणात लोकांनी तोबा गर्दी केली. त्यामुळे, कोण कोणाला मारतय हेच समझले नाही. मात्र, दादागिरी आणि दुसऱ्याच्या गावात जाऊन आम्ही भाई  आहोत हे सांगू पाहणाऱ्यांना जनतेने यथेच्च चोप दिला. यात एका तरुणास जास्तच मार लागला आहे. तर, कोणीतरी फायटर आणले होते, त्याने मारहाण केल्याचे बोलले जाते. हा सर्व राडा सुरु असताना गावातील काही व्यक्तींनी मध्यस्ती करत सामंजस्याची भुमीका घेतली. त्यामुळे गेंड्यासारखे एकमेकांना भिडणारे दोन्ही गट शांत झाले. मात्र, गावात येऊन दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तीना पोलिसांच्या ताब्यात देण्याचे ठरविले असता काही क्षणात तरुणांनी घटनास्थळाहून पळ काढली. कॉलेजमध्ये झालेल्या जुन्या वादाहून यात्रेत वारंवार वाद घालणे आणि धार्मिक कामास गालबोट लावणे हे कितपत योग्य आहे? परके सोडा.! आपल्याच तालुक्यातील काही लोक त्यांना सपोर्ट करीत असतील तर यापेक्षा दुसरे मोठे दुर्दैव नाही. हे असले वाद वारंवार होऊ नये त्यासाठी, हिवरगाव तंटामुक्ती अध्यक्ष यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, गणोेरे यात्रेत हगामा सुरु असताना पोलिसांनी एकाचा सांगलाच समाचार घेतला. पंच नेमण्याहून झालेला वाद चोप देईपर्यंत गेला आणि तो वाद तेथेच शमला. पण यात्रा सुसुत्रबद्ध व शांततेर पार पडली.

           तर, पिंपळगाव निपाणी ही यात्रा देखील तालुक्याच्या मोठ्या प्रतिष्ठेची समजली जाते. परंतु, तेथील ट्रस्टींच्या वादामुळे यात्रेला हवे तसे रुप आले नाही. या गावात तमाशा म्हणजे बसण्यास जागा रहात नाही. पिंपळगावचा हगामा नावाजलेला आहे. मात्र, दुर्दैवाने देवीच्या यात्रेत देखील राजकारण आणि व्यक्तीप्रतिष्ठा दिसून आली. ट्रस्टीचा अध्यक्ष कोण आणि सचिव कोण, खरी ट्रस्ट कोणाची आणि त्यात व्यावहार कोणी पहायचा? याहून हा वाद थेट कोर्टात गेला आहे. मात्र, यांच्या हमरी-तुमरीत सामान्य ग्रामस्त आणि भाविक यांचा फार मोठा तोटा झाल्याच्या भावना व्यक्त केल्या गेल्या आहेत. कारण, गाव एकसंघ होऊन प्रचंड मोठी होणारी यात्रा यंदा दोन गटात विभागल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे, ना हगामा, ना तमाशा अशा पद्धतीची अर्धवट यात्रा भाविकांनी पहिल्यांदा अनुभवली. पिंपळगाव ट्रस्टचा वाद हा टोकाला गेला असून त्यासाठी खुद्द प्रशासनाने लक्ष घातले होते. म्हणून यात्रेला कोणतेही गालबोट लागले नाही. मात्र, नियमित प्रमाणे सर्व कार्यक्रम न झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. किमान येणाऱ्या काळात देवी दोन्ही गटांना शहाणपण देईल अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे. या सगळ्यात यात्रा शांततेत पार पडली. तर, अकोले शहरात झालेल्या पीर यात्रेत देखील अगदी अंतीम क्षणी राडा झाला होता. मात्र, काही व्यक्तींनी त्यात मध्यस्ती केल्याने प्रश्न जाग्यावर मिटला.