नवऱ्याचं लफडं बायकोने पकडलं, सासुला सांगताच तिघांनी गळा दाबला.! वकील असूनही ती हतबल झाली, तिघांवर गुन्हा दाखल.!


 सार्वभौम (संगमनेर) :- 

                       माझ्या नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध आहे. त्यांना तुम्ही समजावून सांगा असे सासुला सांगितले असता. 31 वर्षीय महिलेला पतीने बेदम मारहाण करून गळा दाबुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 31 वर्षीय महिला बेशुद्ध झाली होती. ही धक्कादायक घटना घुलेवाडी परिसरात दि. 4 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली.  या 31 वर्षीय पिडीत महिलेला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी घेतलेल्या हॉस्पिटलमधील जबाबावरून नवरा, सासु, सासरा आशा तिघा जणांवर 307 प्रमाणे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस संगमनेर शहर पोलीस करत आहे.

              याबाबत सविस्तर माहिती अशी की, 31 वर्षीय पिडीत महिला ही वकिलीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करते. त्यांच्या घरात सासु, सासरा, नवरा, दिर असे मिळुन घुलेवाडी परिसरात ते राहतात. दि. 4 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या दरम्यान 31 वर्षीय पिडीत महिलेने आपल्या सासुला नवऱ्याची तक्रार केली. सासुला पिडीत महिला म्हणाली की, तुमच्या मुलाचे बाहेर अनैतीक संबंध आहे. त्यांना तुम्ही समजावुन सांगा. असे म्हणताच सासुने आपला मुलगा व नवऱ्याला बोलावुन घेतले. पिडीत महिलेचा नवरा घरी आल्यानंतर त्यांनी पिडीत महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पिडीत महिलेला सासु -सासऱ्यांनी बेड मध्ये ओढत नेले व मारहाण करण्यात सुरवात केली. मारत असताना घराचे दरवाजे व खिडक्या बंद केल्या. पिडीत महिलेच्या नवऱ्याने तिला खाली पाडले व वरून बसुन दोन्ही हाताने गळा दाबला. पिडीत महिलेचे सासु सासरे म्हणत होते की, तिला आज जिवंत ठेऊ नको तिचा गळा दाबुन मारून टाक.

             दरम्यान, या झटापटीत पिडीत महिलेच्या चेहऱ्यावर,पोटावर, गळ्यावर मार लागला आहे. पिडीत महिलेचा गळा दोन्ही हाताने दाबल्यानंतर गुदमरल्यासारखे झाले. पिडीत महिलेच्या सासऱ्याने पाय धरून इकडे तिकडे ओढले त्यामुळे मार लागला. पिडीत महिला त्यांना विनंती करत होती. पाया पडत होती. तरी देखील त्यांनी ऐकले नाही. नंतर पिडीत महिलेला मार अधिक लागल्याने व मानसिक त्रास झाल्याने ती बेशुद्ध पडली. नंतर पिडीत महिला शुद्धीवर आल्यानंतर अगदी कोणाला न कळत अलगद उठली व हळुच घराच्या बाहेर आली. पिडीत महिलेने आपल्या जवळच्या माणसांना फोन लावला व हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. पुढील उपचारासाठी ते खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. 31वर्षीय पिडीत महिलेच्या जबाबावरून नवरा, सासु, सासरा यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.